मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  अखेर मुहूर्त ठरला! ‘या’ दिवसापासून धावणार नदीच्या खाली बनवलेली देशातील पहिली मेट्रो

अखेर मुहूर्त ठरला! ‘या’ दिवसापासून धावणार नदीच्या खाली बनवलेली देशातील पहिली मेट्रो

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Mar 03, 2024 11:23 PM IST

Kolkata under water metro : कोलकातामध्ये नदीच्या खाली बनवलेली देशातील पहिल्या भुयारी मेट्रोचे (Underwater Metro) उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सहा मार्च रोजी होणार आहे.

कोलकाता अंडर वॉटर मेट्रो
कोलकाता अंडर वॉटर मेट्रो

India's First Underwater Metro Run: ज्याची गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षा होती तो दिवस आला आहे. कोलकाता शहरातील लोक अनेक वर्षापासून नदीच्या खालून धावणाऱ्या मेट्रो ट्रेनची (Underwater Metro) प्रतीक्षा करत होते. आता रेल्वेने या देशातील पहिल्याच अंडर वॉटर रेल्वेचे काम पूर्ण केले आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी शनिवारी सांगितले की, कोलकातामध्ये नदीच्या खाली बनवलेली देशातील पहिल्या भुयारी मेट्रोचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सहा मार्च रोजी केली जाईल.

कोलकाता मेट्रो देशातील अशी पहिलीच मेट्रो-
रेल्वेमंत्री वैष्णव यांनी सांगितले की, कोलकाता मेट्रोचे काम १९७० च्या दशकात सुरू झाले होते. मात्र मोदी सरकारच्या गेल्या १० वर्षाच्या कार्यकाळात या प्रकल्पावर वेगाने काम झाले. मागील ४० वर्षाच्या तुलनेत या १० वर्षात अधिक काम झाले. रेल्वेमंत्र्यांनी सांगितले की, देशातील पायाभूत सुविधा वाढवण्यावर पंतप्रधान मोदी यांचा भर आहे. या कामामुळे २०४७ पर्यंत भारत विकसित होईल. कोलकाता मेट्रोचे काम अनेक टप्प्यात करण्यात आले आहे. या प्रकल्पात शहराच्या पूर्व-पश्चिम मेट्रो मार्गासाठी नदीच्या खालून भूयार खोदण्यात आले आहे.

एस्प्लेनेड ते हावडा मैदानापर्यंत भूयार - 
यापूर्वी वृत्त होते की, एस्प्लेनेड ते हुगली नदी दरम्यान टनेलच्या माध्यमातून हावडा मैदानापर्यंत मेट्रोचे ट्रायल रन केले गेले आहे. नदीच्या खाली बनवण्यात आलेल्या मेट्रो भुयाराचे काम युद्धपातळीवर सुरू होते. नदीच्या खाली मेट्रो सुरू झाल्यानंतर ईस्ट-वेस्ट मेट्रो हावड़ा मैदान ते हुगली नदीत बनवलेल्या टनेलच्या माध्यमातून साल्ट लेक सेक्टर पाच पर्यंत पोहोचले जाऊ शकते. याची एकूण लांबी जवळपास १६.५  किमी आहे. यातील १०.८ किलोमीटरचा मार्ग जमिनीच्या आतून जाणार आहे. उर्वरित ५.७५ किमी प्रकल्प जमिनीच्या वरती करण्यात आला आहे. या मेट्रोमुळे लोकांचा प्रवासाचा वेळ वाचणार आहे.

IPL_Entry_Point