मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune hadapsar Fire : हडपसरमध्ये ११ मजली सोसायटीतील फ्लॅटला भीषण आग; संसाराची झाली राख रांगोळी

Pune hadapsar Fire : हडपसरमध्ये ११ मजली सोसायटीतील फ्लॅटला भीषण आग; संसाराची झाली राख रांगोळी

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Mar 03, 2024 06:34 PM IST

Pune hadapsar Fire : पुण्यात हडपसर (Hadapasr News) येथील सॉलिटियर वाधवा या अकरा मजली सोसायटीच्या एका फ्लॅटमध्ये भीषण आग लागली. या आगीत घरातील साहित्याचे मोठे नुकसान झाले.

हडपसरमध्ये ११ मजली सोसायटीतील फ्लॅटला भीषण आग लागल्याने संपूर्ण सदनिकेतील साहित्य भस्मसात झाले.
हडपसरमध्ये ११ मजली सोसायटीतील फ्लॅटला भीषण आग लागल्याने संपूर्ण सदनिकेतील साहित्य भस्मसात झाले.

Pune hadapsar Fire : पुण्यात फ्लॅटमध्ये आग लागण्याच्या घटना वाढल्या आहेत. कोंढवा खुर्द येथील गंगाधाम सोसायटीतील एका फ्लॅटला आग लागल्याची गहटण ताजी असतांना आज दुपारी २ वाजता हडपसर येथील अमनोरा पार्कच्या मागील बाजूस असलेल्या सॉलिटियर वाधवा या ११ मजली इमारतीतच्या एका फ्लॅटला भीषण आग लागली. या घटनेत फ्लॅटमधील सर्व साहित्य जळून खाक झाले. सुदैवाने या घटनेत जीवित हानी झाली नाही. ही आग नेमकी कशामुळे लागली हे समजू शकले नाही. अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जात आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठी दुर्घटना टळली.

Uddhav Thackeray : EVM घोटाळा करून ते जिंकलेच तर देशात मोठा असंतोष उसळेल, उद्धव ठाकरेंचा इशारा

दुपारी दीडच्या सुमारास एका सदनिकेत आग लागल्याची वर्दि अग्निशमन दल नियंत्रण कक्षाला मिळाली. यानंतर हडपसर व बी टी कवडे रोड अग्निशमन केंद्र येथून अग्निशमन काही वाहने घटनास्थळी रवाना करण्यात आली.

घटनास्थळी पोहोचताच जवानांनी पाहिले की, इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर सदनिका क्रमांक ४ मध्ये आग लागली होती. तसेच ही सदनिका आग लागली त्यावेळी सदनिकेत कोणी नसल्याने बंद अवस्थेत होती. त्यानंतर सदनिकेचे मालक यांनी चावीच्या साह्याने मुख्य दरवाजा उघडला असता आग मोठ्या स्वरूपात भडकली असल्याचे दिसले. तसेच धुराचे प्रमाण ही जास्त असल्याचे जाणवले. अग्निशामक दलाच्या जवानांनी तातडीने आतमध्ये कोणी नसल्याची खाञी करत आगीवर पाण्याचा मारा सुरु करत आग शेजारील इतर सदनिकेत पसरणार नाही याची दक्षता घेत सुमारे तीस मिनिटात आग आटोक्यात आणली.

Prakash Ambedkar on modi : नरेंद्र मोदींनी माझ्याविरोधात अकोल्यातून निवडणूक लढवावी; प्रकाश आंबेडकरांचं थेट आव्हान

यानंतर कुलिंग ऑपरेशन सुरुकरून आग पुर्ण विझवली. या ठिकाणी दलाची मदत पोहोचण्यापुर्वी अमनोरा पार्क येथील एक अग्निशमन वाहन त्याठिकाणी दाखल होत आग विझवण्याचे प्रयत्न करीत होते. सदनिकेत आग ही इलेक्ट्रिक शॉर्टसर्किटमुळे लागल्याची शक्यता वर्तवण्यात आली असून सुदैवाने कोणी ही जखमी वा जिवितहानी झाली नाही. घटनेवेळी इमारतीत असलेली स्थायी अग्निशमन यंञणा कार्यान्वित नसल्याचे निदर्शनास आले. या आगीत गृहपयोगी साहित्य तसेच लाकडी सामान व विद्युत उपकरणे जळाली असून मोठे नुकसान झाले आहे.

ही आग विझवण्यासाठी अग्निशमन अधिकारी अनिल गायकवाड तसेच तांडेल अंबादास दराडे, वाहनचालक निलेश भोसले, चंद्रकांत जगताप व फायरमन दत्तात्रय माने, प्रदिप सावंत, वैभव भोसले, अनिल हाके, घुले यांनी सहभाग घेतला.

IPL_Entry_Point