मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pandharpur News : विठ्ठल भक्तांसाठी आनंदाची बातमी! चैत्री यात्रेनिमित्त मंदिर प्रशासनाने घेतला मोठा निर्णय

Pandharpur News : विठ्ठल भक्तांसाठी आनंदाची बातमी! चैत्री यात्रेनिमित्त मंदिर प्रशासनाने घेतला मोठा निर्णय

Apr 04, 2024, 08:37 PM IST

  • Pandharpur News : पंढरपूरच्या चैत्री यात्रा काळात भाविकांना पहाटे पाच वाजल्यापासून रात्री १२ वाजेपर्यंत म्हणजे संपूर्ण दिवसभर विठुरायाचे मुखदर्शन घेता येणार आहे.

विठ्ठल भक्तांसाठी आनंदाची बातमी

Pandharpur News : पंढरपूरच्या चैत्री यात्रा काळात भाविकांना पहाटे पाच वाजल्यापासून रात्री १२ वाजेपर्यंत म्हणजे संपूर्ण दिवसभर विठुरायाचे मुखदर्शन घेता येणार आहे.

  • Pandharpur News : पंढरपूरच्या चैत्री यात्रा काळात भाविकांना पहाटे पाच वाजल्यापासून रात्री १२ वाजेपर्यंत म्हणजे संपूर्ण दिवसभर विठुरायाचे मुखदर्शन घेता येणार आहे.

 Pandharpur Chaitri yatra : पंढरपूरच्या (Vitthal Rukmini Mandir Pandharpur) चैत्री यात्रेनिमित्त मंदिर प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. १५ ते २१ एप्रिल दरम्यान पंढरपुरात चैत्री यात्रा (Pandharpur Chaitri yatra) भरणार आहे. यात्राकाळात भाविकांना पहाटे पाच वाजल्यापासून रात्री १२ वाजेपर्यंत म्हणजे संपूर्ण दिवसभर विठुरायाचे मुखदर्शन घेता येणार आहे. चैत्री यात्रेच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी प्रशासनाची बैठक बोलावून याबाबत सूचना दिल्या आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai: मुंबईतील करी रोड, माटुंगा, महालक्ष्मी उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद होणार, जाणून घ्या कारण

Mumbai Dry days List: मुंबईत 'या' महिन्यात कोणकोणत्या दिवशी मिळणार नाही दारू, किती दिवस दुकान बंद?

mumbai water cut : मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा! येत्या २२ तारखेला 'या' भागातील पाणीपुरवठा १६ तासांसाठी बंद

Fact Check: लोकसभा निवडणुकीनंतर ठाकरे आणि शिंदे गट भाजपमध्ये विलिन होणार? सत्य काय? वाचा!

पंढरपुरच्या विठ्ठल मंदिरात संवर्धनाचे काम सुरु असून विठ्ठल मूर्ती काचेच्या पेटीत बंद असून देवाच्या पायावरील दर्शन पूर्ण बंद करण्यात आले आहे. यात्रा काळात पहाटे पाच ते रात्री १२ वाजेपर्यंत मुखदर्शन घेता येणार आहे. सध्या ते पहाटे पाच ते सकाळी १० वाजेपर्यंतच भाविकांना मुखदर्शनाचा लाभ घेता येतो. 

प्रशासनाच्या निर्णयाने लाखोंच्या संख्येने चैत्री यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांची सोय झाली आहे. यात्रा कालावधीमध्ये म्हणजे १५ ते २१ एप्रिल दरम्यान विठुरायाचे मुखदर्शन रात्री १२ वाजेपर्यंत घेता येणार आहे. रात्री १२ ते पहाटे पाच या काळात केवळ मुखदर्शन बंद ठेवण्यात येणार आहे. दर्शन रांगेसाठी गोपाळपूर येथे पत्र्याचे शेड उभारण्याचे काम सुरु आहे. सध्या तापमान वाढल्याने दर्शन रांगेत पंखे, कुलर आणि थंड पाणी पुरवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. 

चैत्री एकादशी १९ एप्रिल रोजी असल्याने या दिवशी भाविकांची संख्या सर्वाधिक असण्याची शक्यता आहे. भाविकांना वाढत्या उन्हाचा त्रास होऊ नये, यासाठी प्रशासनाने आवश्यक उपययोजना केल्या आहेत. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व औषधोपचाराची सुविधा उपलब्ध केली आहे.

प्रशासनाच्या बैठकीत खालील उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या -

  • मंदिर समितीने दर्शन रांग व पत्र्याच्या शेडमध्ये पंखे, कुलर्स, व पेयजलाची व्यवस्था करावी.
  • भाविकांना तात्काळ व सुलभ दर्शन व्यवस्थेबाबत दर्शन रांगेचे नियोजन करावे.
  • यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांना मुबलक व स्वच्छ पाणी पुरवठा करण्याचे नगरपालिकेने नियोजन करावे.
  • पिण्याच्या पाण्याची टँकरची संख्या वाढवावी.
  • नदीपात्रातील व घाटाची स्वच्छता करावी
  • अग्निशमन व्यवस्था उपलब्ध करावी.
  • तात्पुरते शौचालयाचे उभारणीचे नियोजन करावे.
  • वारी कालावधीत व वारीनंतर अस्वच्छतेमुळे त्रास होणार याची दक्षता घ्यावी.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या