मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Nagpur Murder: नागपूर येथे पैशांच्या वादावरून दोन गटात हाणामारी; तरुणाची चाकू भोसकून हत्या

Nagpur Murder: नागपूर येथे पैशांच्या वादावरून दोन गटात हाणामारी; तरुणाची चाकू भोसकून हत्या

Apr 04, 2024, 07:43 PM IST

    • Youth Dies in Clash Between Two Groups:नागपूरमध्ये दोन गटांत झालेल्या हाणामारीत एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे.
नागपुरात पैशांच्या वादातून एका तरुणाची हत्या करण्यात आली.

Youth Dies in Clash Between Two Groups:नागपूरमध्ये दोन गटांत झालेल्या हाणामारीत एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे.

    • Youth Dies in Clash Between Two Groups:नागपूरमध्ये दोन गटांत झालेल्या हाणामारीत एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे.

Nagpur Murder News: नागपुरातील (Nagpur) सीताबर्डी परिसरात (Sitabuldi) बुधवारी झालेल्या गोळीबारप्रकरणी पोलिसांनी आठ जणांना अटक केली. या घटनेला काहीच तास झाले असता शांतीनगर पोलीस ठाण्याच्या (Shantinagar Police Station) हद्दीतील भारतीय आखाडा परिसरात पैशांच्या वादावरून दोन गटात हाणामारी झाली. या घटनेत एका तरुणाचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Chiplun Cloudburst Rains: चिपळूणच्या अडरे गावात ढगफुटी! अर्ध्या तासात धडकी भरवणारा पाऊस, मे महिन्यातच नद्यांना पूर

Mumbai Lok sabha : मतदानाच्या पूर्वसंध्येलाच मुंबईत प्रिसायडिंग ऑफिसरचा मृत्यू, होमगार्डला हृदयविकाराचा धक्का

Pune Crime : धक्कादायक.. प्रेयसीने मोबाईल नंबर ब्लॉक केल्याच्या रागातून प्रियकराने झाडल्या बहिणीवर गोळ्या

Pune Weather Updates: उष्णतेच्या लाटेनंतर पुण्यातील तापमानात घट, मे महिन्यात सरासरीपेक्षा कमी तापमानाची नोंद!

Ambarnath News : अंबरनाथमध्ये पाण्याची टाकी साफ करताना विजेचा धक्का; ३ कामगारांचा मृत्यू

विजय चव्हाण असे भोकसून हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीसांनी हर्षल कातळे नावाच्या आरोपीला अटक केली असून त्याचा साथीदार सागर यादवचा शोध सुरू आहे. आरोपी सागर हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे. त्याच्यावर खुनाचा प्रयत्न आणि प्राणघातक हल्ला असे सुमारे ११ गुन्हे दाखल आहेत. आरोपी सागरने सुजल नावाच्या तरुणामध्ये पैशांच्या व्यवहारावरून वाद होता. याच वादातून सुजल त्याचा मित्र विजय चव्हाण आणि दोन मित्रासोबत सागरच्या घरी गेले. दरम्यान, दोन गटात हाणामारी झाली. त्यावेळी सागरने त्याच्या जवळील चाकूने विजयला भोकसले. या हल्ल्यात सागरचा जागीच मृत्यू झाला.

Sai resort demolition : शिंदे गटाच्या नेत्यावर आरोप केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी अनिल परब यांच्या रिसॉर्टवर हातोडा

या हत्येची माहिती मिळताच स्थानिक पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. याप्रकरणी पोलिसांनी बुधवारी रात्री उशीरा हर्षलला अटक केली. सागर फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. नागपूर शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारींच्या घटनेत वाढ होऊ लागली आहे.

Bhivandi Crime : भिवंडी हादरले! क्रिकेटच्या वादातून चाकू हल्ला! १ ठार तर ६ जखमी

हत्येच्या आरोपीला २९ वर्षांनंतर अटक

पालघर जिल्ह्यात आपल्या सहकाऱ्याची हत्या करून सुमारे तीन दशकांपासून फरार असलेल्या एका व्यक्तीला गुजरात राज्यातून अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी बुधवारी ही माहिती दिली. हरेश बाबू पटेल उर्फ ​​नायिका (वय,५५) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी २९ वर्षांपूर्वी मोहन सुकूर दुबली (वय, ५०) याची हत्या करून फरार झाला होता.दोघेही पालघरमधील सफाळेजवळील जीवदानीपाडा येथे एका बांधकाम साइटवर गवंडी म्हणून काम करत होते. त्यावेळी दोघांमध्ये किरकोळ कारणांवरून वाद झाला. ज्यामुळे हा धक्कादायक प्रकार घडला. हत्येच्या २९ वर्षानंतर आरोपीला अटक करण्यात आल्याने अनेकजण पोलीस प्रशासनाकडे बोट दाखवत आहे.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या