Bhivandi Crime : भिवंडी हादरले! क्रिकेटच्या वादातून चाकू हल्ला! १ ठार तर ६ जखमी-bhiwandi knife attack 1 died 6 injured two group fighting over cricket ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Bhivandi Crime : भिवंडी हादरले! क्रिकेटच्या वादातून चाकू हल्ला! १ ठार तर ६ जखमी

Bhivandi Crime : भिवंडी हादरले! क्रिकेटच्या वादातून चाकू हल्ला! १ ठार तर ६ जखमी

Apr 03, 2024 10:53 AM IST

Bhivandi Crime news : भिवंडी येथे क्रिकेट खेळण्याच्या वादातून एका टोळक्याने चाकू हल्ला केला. यात १ जण ठार झाला तर ६ जण गंभीर जखमी झाले आहेत.

क्रिकेटच्या वादातून चाकू हल्ला! १ ठार तर ६ जखमी
क्रिकेटच्या वादातून चाकू हल्ला! १ ठार तर ६ जखमी

Bhivandi Crime news : भिवंडी येथे क्रिकेट खेळण्याच्या जुन्या वादातून दोन गटाने एकमेकांवर चाकू हल्ला केला. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण आहे. ही घटणा मंगळवारी घडली असून यात एक जण ठार झाला आहे. तर सह जण गंभीर जखमी झाले आहेत. भिवंडी येथील शांतीनगरच्या के. जी. एन चौकात ही घटना घडली.

Punit Goenka : झी एंटरटेनमेंटचे एमडी आणि सीईओ पुनित गोएंका यांना वर्षाला ३५ कोटी पगार

या हल्ल्यात जुबेर शोएब शेख (वय ४६) याचा गंभीर जखमी झाल्याने मृत्यू झाला आहे. तर अबू हमजा शेख, इस्तियाक शोएब शेख (वय ३२), साजिद वहाब शेख (वय ३३), आसिफ वहाब शेख (वय ३६), शेहबाज सोहेल शेख (वय ३४), नोयेब सोहेल शेख हे गंभीर जखमी झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही वर्षांपूर्वी भिवंडी येथे दोन गटात, क्रिकेट खेळण्याच्या वादातून हाणामारी झाली होती. त्यावेळी या प्रकरणात गुन्हा देखील दाखल झाला होता. या घटनेचा राग मनात ठेवून एका गटाने धारदार शस्त्राने दुसऱ्या गटावर चाकू हल्ला केला. या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.

IPS Abdur Rahman : धुळ्याच्या 'वंचित'च्या उमेदवाराची गोची; सरकारने फेटाळला IPS च्या राजीनाम्याचा अर्ज

आरोपींनी एकमेकांना मिळेल त्या साधनाने मारहाण केली. . चाकू हल्ल्यानंतर गंभीर जखमी झाल्याने तिघे जण रक्ताच्या थारोळ्यात पडले असतांना स्थानिकांनी त्यांना ऊचलून तातडीने रुग्णालयात दाखल केले. या हल्ल्यात सात जण जखमी झाले असून यातील एका जखमीचा रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला तर काही जणांची प्रकृती ही गंभीर असल्याचे समजते. या घटनेमुळे शांतीनगर परिसरात दहशतीचे वातावरण आहे.

या घटनेची माहिती मिळाल्यावर पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहे. या ठिकाणी त्यांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन सांगळे, शांतीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड हे येथील परिस्थितीवर नियंत्रण ठेऊन आहेत.

Whats_app_banner