ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. अंबरनाथ शहराच्या जवळील जांभूळ (jambhul village) गावात तीन कामगारांचा मृत्यू झाला आहे. पाण्याची टाकी साफ करत असताना विजेचा धक्का लागून तीन कर्मचारी कोसळले, त्यातच त्यांचा मृत्यू झाला. पाण्याच्या टाकीचे काम सुरू असताना हा अपघात झाला.
अंबरनाथजवळच्या जांभुळ गावात गुरुवारी सकाळी ही घटना घडली. पाण्याची टाकी साफ करताना करंट लागल्याने तीन मजुरांचा मृत्यू झाला. पोलिसांनी तिन्ही मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. या दुर्घटनेमुळे अंबरनाथ परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
गुलशन मंडल, राजन मंडल आणि शालिग्राम कुमार मंडल अशी या दुर्घटनेत मृत झालेल्या कामगारांची नावे आहेत. या तिघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयात आणण्यात आले आहेत.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार अंबरनाथ जवळच्या जांभूळ गावात पाण्याच्या टाकीचे काम सुरू होते. तेथे अनेक कर्मचारी काम करत होते. टाकीतून पाणी उपसण्याचे काम सुरू होते. पाणी उपसा करणासाठी विद्युत मोटार लावली होती. मोटारमधून विद्युत प्रवाह टाकीतील पाण्यात उतरला. पाण्यात विद्युत प्रवाह उतरल्यामुळे कामगारांना विजेचा तीव्र धक्का बसला. यामध्ये तीन कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू झाला.
भिवंडी येथे क्रिकेट खेळण्याच्या जुन्या वादातून दोन गटाने एकमेकांवर चाकू हल्ला केला. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण आहे. ही घटणा मंगळवारी घडली असून यात एक जण ठार झाला आहे. तर सह जण गंभीर जखमी झाले आहेत. भिवंडी येथील शांतीनगरच्या के. जी. एन चौकात ही घटना घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही वर्षांपूर्वी भिवंडी येथे दोन गटात, क्रिकेट खेळण्याच्या वादातून हाणामारी झाली होती. त्यावेळी या प्रकरणात गुन्हा देखील दाखल झाला होता. या घटनेचा राग मनात ठेवून एका गटाने धारदार शस्त्राने दुसऱ्या गटावर चाकू हल्ला केला. या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.
आरोपींनी एकमेकांना मिळेल त्या साधनाने मारहाण केली. . चाकू हल्ल्यानंतर गंभीर जखमी झाल्याने तिघे जण रक्ताच्या थारोळ्यात पडले असतांना स्थानिकांनी त्यांना ऊचलून तातडीने रुग्णालयात दाखल केले. या हल्ल्यात सात जण जखमी झाले असून यातील एका जखमीचा रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला.