मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Nagpur Airport Bomb Threat: नागपूर विमानतळावर बॉम्ब ठेवल्याचा मेल; सुरक्षा यंत्रणा अलर्ट; प्रवाशांमध्ये भिती

Nagpur Airport Bomb Threat: नागपूर विमानतळावर बॉम्ब ठेवल्याचा मेल; सुरक्षा यंत्रणा अलर्ट; प्रवाशांमध्ये भिती

Apr 29, 2024, 06:45 PM IST

    • Nagpur Airports Receive Bomb Threat Emails: नागपूर विमानतळावर बॉम्ब ठेवल्याचा मेल आल्यानंतर सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाली.
नागपूरसह देशातील अनेक विमानतळं बॉम्बने उडवून देण्याचा मेल आला.

Nagpur Airports Receive Bomb Threat Emails: नागपूर विमानतळावर बॉम्ब ठेवल्याचा मेल आल्यानंतर सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाली.

    • Nagpur Airports Receive Bomb Threat Emails: नागपूर विमानतळावर बॉम्ब ठेवल्याचा मेल आल्यानंतर सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाली.

Airport Bomb Threat News: नागपूरसह (Nagpur) जयपूर (Jaipur), कानपूर (Kanpur), गोवा (Goa) यासह देशातील अनेक विमानतळांना बॉम्बने उडवून देणारा मेल आला. या धमकीच्या मेलनंतर विमानतळावर मोठा गोंधळ निर्माण झाला. नागपूर विमानतळ प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी १०.०० वाजताच्या सुमारास त्यांना धमकीचा ईमेल आला. विमानतळ संचालक आबिद रुई यांच्या मेल आयडीवर हा ईमेल आला. विमानतळाच्या वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्यांना याबाबत माहिती देण्यात आली. या धमकीच्या ईमेलची तक्रार विमानतळ प्रशासनाने नागपुरातील सोनेगाव पोलीस ठाण्यात केली. विमानतळाची सुरक्षा वाढवण्यात आली.

ट्रेंडिंग न्यूज

रिक्षाचालकाने भाडे नाकारले, जादा भाडे घेतल्यास करा व्हॉट्सअ‍ॅपवर तक्रार, तातडीने होणार कारवाई

Chiplun Cloudburst Rains: चिपळूणच्या अडरे गावात ढगफुटी! अर्ध्या तासात धडकी भरवणारा पाऊस, मे महिन्यातच नद्यांना पूर

Mumbai Lok sabha : मतदानाच्या पूर्वसंध्येलाच मुंबईत प्रिसायडिंग ऑफिसरचा मृत्यू, होमगार्डला हृदयविकाराचा धक्का

Monsoon Update : आनंदाची बातमी! मान्सून अंदमानात दाखल, महाराष्ट्रात कधी धडकणार मोसमी वारे?

Modi Pagdi : पंतप्रधान मोदींसाठी एयर कंडीशन पगडी! चांदीच्या कोयऱ्या व डायमंडचा सूर्य असलेली 'दिग्विजय योद्धा पगडी' तयार

हा बनावट ईमेल असल्याचा पोलिसांना संशय असून अधिकाऱ्यांनी सांगितले की, ईमेल पाठवणाऱ्याचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हे बनावट ईमेल असून दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने पाठवण्यात आल्याचा पोलिसांना संशय आहे. दोन दिवसांपूर्वी, कोलकातासह देशातील अनेक विमानतळांवर अशाच प्रकारचे ईमेल आले होते, जे तपासात बनावट असल्याचे निष्पन्न झाले.

Maharashtra Weather Update:मुंबई, ठाणेकरांनो आज घराबाहेर पडणे टाळा! उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट; विदर्भात पावसाची शक्यता

गोव्याच्या दाबोलीम विमानतळाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी

गोव्याच्या दाबोलीम विमानतळाला त्यांच्या अधिकृत ईमेलवर बॉम्बची धमकी मिळाली. विमानतळ अधिकाऱ्यांनी पोलिसांत तक्रार दिल्यानंतर बॉम्बशोधक पथकाने विमानतळाची झडती घेतली. मात्र, काहीही संशयास्पद आढळले नाही. धमकीच्या मेलनंतर विमानतळावर सुरक्षा वाढवण्यात आली. महत्त्वाचे म्हणजे, या धमकीच्या मेलचा विमानसेवेवर कोणताही परिणाम झाला नाही.

Mumbai-Pune Expressway Bus Fire: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खाजगी बसला भीषण आग, अग्निशमन दल घटनास्थळी

जयपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर बॉम्ब ठेवल्याचा मेल

आज सकाळी राजस्थानच्या जयपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावरही हा ईमेल आला असून शोध मोहिमेनंतर आतापर्यंत काहीही संशयास्पद आढळले नाही. एका अधिकाऱ्याने सांगितले की, 'धमकीचे ईमेल पाठवणाऱ्या आरोपींचा शोध घेण्यासाठी आम्ही वेगवेगळ्या राज्यांतील आमच्या समकक्षांना सहकार्य करत आहोत. पोलिसांचा तांत्रिक विभागही या प्रकरणाचा सक्रियपणे तपास करत आहे.

मुंबई विमानतळावर बॉम्ब ठेवल्याचा फोन

याआधी शनिवारी (२७ एप्रिल २०२४) मुंबई विमानतळावर बॉम्ब ठेवल्याचा अज्ञात फोन आला होता.विमानतळावर काम करणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्याला शनिवारी विमानतळाच्या गेट नंबर १ (टर्मिनल-१) वर बॉम्ब ठेवल्याचा अज्ञात व्यक्तीचा फोन आला. बॉम्ब शोधक पथकाने तपास केला असता त्यांना विमानतळावर कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी फोन करणाऱ्या व्यक्तीविरोधात भादंवि कलम ५०५ (१) (ब), ५०६ (२) आणि ५०७ अन्वये गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवात केली.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या