PM Modi Pagadi : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुण्यात रेस कोर्स येथे मोठी प्रचार सभा होणार आहे. पुणे, बारामती, शिरूर, मावळ या मतदार संघातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मोदी पुण्यात येणार आहे. या या सभेची जोरदार तयारी करण्यात आली आहे. पुण्यात भाजप नेते मोदी यांचे जंगी स्वागत करणार आहेत. पंतप्रधान मोदी यांच्यासाठी खास एयर कंडीशन पगडी तयार करण्यात आली आहे. या पंगडीवर पगडी चांदीच्या कोयऱ्या व डायमंडचा सूर्य असून या पंगडीचे नाव 'दिग्विजय योद्धा पगडी' ठेवण्यात आले आहे. पुण्यातील प्रसिद्ध मुरुडकर झेंडेवाले यांच्यातर्फे ही पगडी तयार करण्यात आली आहे. या पूर्वी देखील मुरुडकर झेंडेवाले यांनी पंतप्रधान मोदी यांच्यासाठी पगड्या तयार केल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज पासून महाराष्ट्र दौरा सुरू झाला आहे. आज आणि उद्या मोदी हे राज्यात सहा ठिकाणी सभा घेणार आहेत. पुण्यातील रेस कोर्स मैदानावर या सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. मोदी यांच्या सुरक्षेसाठी चोख व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. तब्बल ५ हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, ही सभा ५.४५ ला होणार असून या सभेत पुणे शहर भाजप आणि जिल्हा भाजपच्य वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भव्य सत्कार करण्यात येणार आहे. या साठी खास पगडी तयार करण्यात आली आहे. मोदी यांच्या साठी तयार करण्यात आलेल्या पगडीवर मराठी संस्कृती किंवा महाराष्ट्राच्या संस्कृतीचं रेखाटन करण्यात आले आहे. ही पगडी पुण्यातील प्रसिद्ध मुरुडकर झेंडेवाले यांनी तयार केली आहे. या पूर्वी देखील झेंडेवाले यांनी मोदी यांच्यासाठी पगड्या तयार केल्या आहेत. यावेळी झेंडेवाले यांनी मोदी यांच्या साठी दिग्विजय योद्धा पगडी तयार केली आहे.
मोदी यांच्या स्वागतासाठी झेंडेवाले यांनी तयार केलेली पगडी ही एयर एअर कंडीशन आहे. पुण्यात मोठा उकाडा असून मोदी यांना याचा त्रास होऊ नये या दृष्टीने ही पगडी तयार करण्यात आली आहे. ही पगडी एअर कंडिशन असून तिचे खास वैशिष्ठ देखील आहेत.
ही पगडी पूर्णपणे कॉटनने तयार करण्यात आली आहे. तसेच ती हाताने तयार करण्यात आली आहे. या पगडीत हवा खेळती राहणार आहे. ऐवढेच नाही तर ही पगडी तयार करतांना .पंचधातूचा वापर करण्यात आला आहे. या पगडीवर ऐतिहासिक कोयऱ्या चांदीचे गोल्ड प्लेट्स लावण्यात आल्या आहेत. तर पगडीच्या शिरोभागी आई तुळजाभवानीची प्रतिमा लावण्यात आली आहे. या पगडीला दिग्विजी पगडी असे नाव देण्यात आले आहे. सात घोड्यांचा राजेशाही स्टॅन्ड असणारी मराठा युद्धांच्या पराक्रमाची साक्ष देणारी ही मराठा दिग्विजय पगडी आहे.
पंतप्रधान विविध कार्यक्रमांसाठी या पूर्वी पुण्यात आले आहे. त्यांच्या अनेक सभा पुण्यात झाल्या आहेत. या वेळी देखील झेंडेवाले यांनी मोदी यांच्यासाठी पगडी तयार केल्या आहेत. मुरुडकर झेंडेवाले हे पुण्यातील पगडी व फेट्याचे व्यापारी असून त्याच्याकडे विविध प्रकारचे फेटे व पगड्या तयार करण्यात येतात. यासाठी त्यांच्याकडे खास टीम आहे. झेंडेवाले यांनी यापूर्वी मोदी यांच्यासाठी २० वेळा पगडी तयार केली आहे.