मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Nagpur News : पुण्यानंतर आता नागपुरातही पोलीस कर्मचाऱ्यांची डोक्यात गोळी झाडून आत्महत्या; कामाचा ताण की…

Nagpur News : पुण्यानंतर आता नागपुरातही पोलीस कर्मचाऱ्यांची डोक्यात गोळी झाडून आत्महत्या; कामाचा ताण की…

Apr 07, 2024, 12:03 AM IST

  • Nagpur News : नागपुरातील सुराबर्डीत एका पोलीस कर्मचाऱ्याने (Policeman committed  suicide) डोक्यात गोळी झाडून आपले जीवन संपवले. ही खळबळजनक घटना शनिवारी सायंकाळच्या ५ वाजण्याच्या सुमारास घडली.

पोलीस कर्मचाऱ्यांची डोक्यात गोळी झाडून आत्महत्या

Nagpur News : नागपुरातील सुराबर्डीत एका पोलीस कर्मचाऱ्याने (Policemancommitted suicide) डोक्यात गोळी झाडून आपले जीवन संपवले. ही खळबळजनक घटना शनिवारी सायंकाळच्या ५ वाजण्याच्या सुमारास घडली.

  • Nagpur News : नागपुरातील सुराबर्डीत एका पोलीस कर्मचाऱ्याने (Policeman committed  suicide) डोक्यात गोळी झाडून आपले जीवन संपवले. ही खळबळजनक घटना शनिवारी सायंकाळच्या ५ वाजण्याच्या सुमारास घडली.

पुण्यातील खडक पोलीस ठाण्यात एका पोलीस शिपायाने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याची (Policeman committed  suicide) घटना ताजी असतानाच आता तशीच घटना नागपुरातील सुराबर्डीत घडली आहे. यामुळे पोलिसांवर कामाचा तणाव वाढल्याची चर्चा पुन्हा ऐरणीवर आली आहे. सुराबर्डीत एका पोलीस कर्मचाऱ्याने डोक्यात गोळी झाडून आपले जीवन संपवले. ही खळबळजनक घटना शनिवारी सायंकाळच्या ५ वाजण्याच्या सुमारास घडली. मंगेश मस्की असे गोळी झाडून आत्महत्या केलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.

ट्रेंडिंग न्यूज

रिक्षाचालकाने भाडे नाकारले, जादा भाडे घेतल्यास करा व्हॉट्सअ‍ॅपवर तक्रार, तातडीने होणार कारवाई

Chiplun Cloudburst Rains: चिपळूणच्या अडरे गावात ढगफुटी! अर्ध्या तासात धडकी भरवणारा पाऊस, मे महिन्यातच नद्यांना पूर

Mumbai Lok sabha : मतदानाच्या पूर्वसंध्येलाच मुंबईत प्रिसायडिंग ऑफिसरचा मृत्यू, होमगार्डला हृदयविकाराचा धक्का

Monsoon Update : आनंदाची बातमी! मान्सून अंदमानात दाखल, महाराष्ट्रात कधी धडकणार मोसमी वारे?

मिळालेल्या माहितीनुसार मंगेश मस्की राज्य राखीव पोलीस दलात (एसआरपीएफ) अंमलदार पदी कार्यरत होते. मस्की सध्या डेप्युटेशनवर सुराबर्डीत अपारंपरिक प्रशिक्षण केंद्रात (युओटीसी) सेवा बजावत होते. तेथे त्यांना गार्ड ड्युटीवर तैनात करण्यात आले होते. त्यांची पत्नीही नागपूर पोलीस दलात कार्यरत असून वाडी पोलीस ठाण्यात सेवा बजावत आहे. ते पोलीस क्वार्टरमध्ये रहात होते. त्यांना दोन मुले आहेत.

मंगेशला दारुचे व्यसन होते. काही दिवसांपासून तो तणावात असल्याचे दिसत होते. शनिवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास कर्तव्यावर असताना एसएलआर बंदुकीने डोक्यात गोळी घालून त्यांनी आत्महत्या केली. 

फायरिंगचा आवाज ऐकताच अन्य कर्मचाऱ्यांनी त्यांच्याकडे धाव घेतली असते मंगेश रक्ताच्या धारोळ्यात पडलेले दिसले. दरम्यान त्यांनी आत्महत्या का केली याची माहिती मिळू शकली नाही. मस्की यांनी कामाच्या ताणातून आत्महत्या केली की दुसरे काही कारण आहे, याचा वाडी पोलीस तपास करत आहेत.

पुण्यातही पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या -

पुणे पोलीस दलात खळबळ उडवणारी एक घटना शुक्रवारी उघडकीस आली आहे. खडक पोलिस ठाण्यातील एका पोलिस शिपायाने आज पहाटेच्या सुमारास त्याच्या कार्बाइन मधून चार गोळ्या स्वत:वर झाडून आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. त्याने हे टोकाचे पाऊल का उचलले या बाबत माहिती मिळू शकली नाही. पोलीस अंमलदार भारत दत्ता आस्मर असे आत्महत्या केलेल्या पोलिस अंमलदाराचे नाव आहे. 

भारत दत्ता आस्मर हे खडक पोलीस ठाण्यात कामाला होते. त्यांनी शुक्रवारी पहाटे लोहिया नगर पोलीस चौकीत स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. पोलीस चौकीमध्ये कोणी नसताना येथील आराम खोलीत जात खोलीचे दार आतून बंद करून त्याने कार्बाइनच्या साह्याने स्वत:वर चार गोळ्या झाडल्या. यात त्याचा जागेवरच मृत्यू झाला. भारत अस्मार हा काही वर्षांपूर्वीच पोलिस दलात दाखल झाला होता. पोलीस चौकीमध्येच घडलेल्या या प्रकारामुळे पुणे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

 

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या