Vasai Murder: वसईच्या खदानीत आढळलेल्या मृतदेहाचं गूढ उकळलं; उधारीचे पैसे मागितल्यानं हत्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Vasai Murder: वसईच्या खदानीत आढळलेल्या मृतदेहाचं गूढ उकळलं; उधारीचे पैसे मागितल्यानं हत्या

Vasai Murder: वसईच्या खदानीत आढळलेल्या मृतदेहाचं गूढ उकळलं; उधारीचे पैसे मागितल्यानं हत्या

Apr 09, 2024 01:55 PM IST

Vasai Man Kills Colleague Over Monetary Dispute: वसई येथील खदानीत आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकळले असून आर्थिक वादातून संबंधित व्यक्तीची हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली.

वसई येथील खाणीत आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकळण्यास वसई पूर्व पोलिसांना यश मिळाले.
वसई येथील खाणीत आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकळण्यास वसई पूर्व पोलिसांना यश मिळाले.

Vasai Murder News: वसई येथील खाणीत आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलण्यास वसई पूर्वे पोलिसांना यश आले. मृत व्यक्ती घसरून खाली पडल्याने त्याचा मृत्यू झाला, असा अंदाज व्यक्त केला जात असताना त्याची हत्या झाल्याचे पोलीस चौकशीत निष्पन्न झाले. आर्थिक वादातून संबंधित व्यक्तीची हत्या झाली असून याप्रकरणी पोलिसांनी एकास अटक केली आहे. बलराम उर्फ बळीराम असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ जानेवारी २०२४ रोजी धानीव पांढरीपाडा येथील खाणीत ब्रिजेश चौरसिया (वय, ४१) याचा मृतदेह आढळल्याची माहिती पेल्हार पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांनी मिळाली, जो जवळच्या एका कारखान्यात कामाला होता. मृताच्या डोक्याला मार लागल्याने आणि प्रत्यक्षदर्शी नसल्याने पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.

Mumbai Firing : मुंबई हादरली! सायन कोळीवाडा परिसरात पहाटे ठोठावले दार; उघडताच गोळीबार, एक जखमी

या घटनेचा प्रत्यक्षदर्शी नसल्याने मृत व्यक्ती घसरून खाली पडल्याने त्याचे डोके दगडावर आदळल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. चौरसिया यांचा शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर त्यांची हत्या झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला. मंगळवारी (२ एप्रिल २०२४) मृताची बहीणीने पोलिसांना आरोपी बळीराम आणि चौरसिया यांच्या पैशांमुळे वाद झाल्याची माहिती दिली.

Pune Kondhva Gate Accident : 'ते' दोघे फिरायला गेले अन्...! पुण्यातील थरारक अपघाताचा व्हिडिओ व्हायरल

यानंतर पोलिसांनी बळीरामचा शोध घेऊन त्याला पेल्हार येथील त्याच्या घरातून ताब्यात घेतले. पोलिसांनीआर्थिक व्यवहारांबाबत चौकशी केली असता बळीरामने चौरसियाकडून ५५ हजार रुपये घतेल्याचे चौकशीत उघड झाले. यातील २२ हजार बळीरामने चौरसियाला परत दिले होते. दरम्यान, चौरसियाने त्याच्या मित्राच्या दुकानात बळीरामला बोलावून स्टॅम्प पेपरवर स्वाक्षरी करून तीन लाख रुपये थकीत असल्याचे सांगितले. परंतु, बळीरामने स्वाक्षरी करण्यास नकार दिल्याने चौरसियाने त्याला मारहाण करत डांबून ठेवले.

याच रागातून बळरामने चौरसियाला धानीव पांढरीपाडा येथील खाणीत बोलावले आणि त्याच्या डोक्यात दगड घातला. त्यानंतर चौरसिया खडकावरून खाणीत ढकलून दिले. भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ अन्वये बळीरामला खुनाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे, असे पोलिसांनी सांगितले.

Whats_app_banner
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर