मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  BBC Documentary : 'बीबीसी'च्या मोदींवरील माहितीपटाचे राज्यातही पडसाद; माहितीपट दाखवण्यास मुंबईतील ‘टीस’चा नकार

BBC Documentary : 'बीबीसी'च्या मोदींवरील माहितीपटाचे राज्यातही पडसाद; माहितीपट दाखवण्यास मुंबईतील ‘टीस’चा नकार

Jan 28, 2023, 08:56 AM IST

    • BBC Documentary Screening Row  : 'बीबीसी'चा मोदींवरील माहितीपटाचे जेएनयू आणि जामिया विद्यापीठात झालेल्या स्क्रीनिंगवरुन मोठा गदारोळ झाला. याचे लोण महाराष्ट्रातही पोहचले आहे. हा माहितीपट टीसने दाखवण्यास नकार दिला आहे.
BBC Documentary Screening Row

BBC Documentary Screening Row : 'बीबीसी'चा मोदींवरील माहितीपटाचे जेएनयू आणि जामिया विद्यापीठात झालेल्या स्क्रीनिंगवरुन मोठा गदारोळ झाला. याचे लोण महाराष्ट्रातही पोहचले आहे. हा माहितीपट टीसने दाखवण्यास नकार दिला आहे.

    • BBC Documentary Screening Row  : 'बीबीसी'चा मोदींवरील माहितीपटाचे जेएनयू आणि जामिया विद्यापीठात झालेल्या स्क्रीनिंगवरुन मोठा गदारोळ झाला. याचे लोण महाराष्ट्रातही पोहचले आहे. हा माहितीपट टीसने दाखवण्यास नकार दिला आहे.

मुंबई : गुजरातमधील दंगलीवर आधारित बीबीसीच्या डॉक्यूमेंट्रीवरून देशातील अनेक विद्यापीठांमध्ये विद्यार्थी संघटनांमध्ये चांगलाच संघर्ष होताना दिसत आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठ आणि जामिया विद्यापीठात झालेल्या वादानंतर दिल्ली विद्यापीठातही विद्यार्थी संघटनांमध्ये काल जोरदार राडा पाहायला मिळाला. आता याचे लोण महाहाराष्ट्रात देखील पोहचले असून हा माहितीपट मुंबईतील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सने (टीस) मध्ये आज दाखवला जाणार होता. मात्र, याला टीस प्रशासनाने नकार दिला आहे. यावरून वाद होण्याची शक्यता आहे. हा माहिती पट दाखवण्यास संबंधित विद्यार्थ्यांवर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai News : मुंबईकरांचे हृदय नाजुक! तब्बल १७ हजार नागरिकांना उच्चरक्कदाबाचा आजार; तपासणीत धक्कादायक माहिती उघड

Fact Check: ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार अनिल देसाई यांच्या रोड शोमध्ये पाकिस्तानचा झेंडा? हे खरं आहे काय?

Bank Holidays : बँकेची कामे आताच उरकून घ्या; ‘या’ कारणांमुळे पुढच्या आठवड्यात ४ दिवस बँका बंद

Mumbai Pune expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेने प्रवास करताय? शनिवारी व रविवारी 'या' वेळेत दोन तासांचा मेगा ब्लॉक

बीबीसीच्या डॉक्यूमेंट्रीवरून जेएनयू आणि जामिया विद्यापीठात राडा झाल्यानंतर आता दिल्ली विद्यापीठातील विद्यार्थी संघटनांमध्येही वाद झाल्याची घटना समोर आली आहे. दिल्ली विद्यापीठातही विद्यार्थी संघटनांमध्ये शुक्रवारी मोठा राडा झाला. डाव्या संघटनांनी बीबीसीच्या डॉक्यूमेंट्रीची स्क्रिनींग ठेवली होती, त्यावर उजव्या विचारधारेच्या संघटनांनी आक्षेप घेतल्यानंतर दोन्ही संघटनांच्या विद्यार्थ्यांनी एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

दरम्यान, महाराष्ट्रातील मुंबईतील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्समध्ये (टीस) हा माहितीपट आज दाखवला जाणार होता. ने नकार दिला आहे. मात्र, टीस प्रशासाने याला विरोध केला असून हा माहितीपट दाखवण्यास परवानगी नाकारली आहे. विद्यार्थ्यांच्या मागणी नाकारण्यात आली आहे.

'टीस'ने या संदर्भात एक परिपत्रक काढले आहे. या परिपत्रकानुसार इन्स्टिट्यूटमधील काही विद्यार्थी मोंदीवरील माहितीपट संस्थेच्या प्रांगणात दाखवण्याची तयारी करत करून या माहितीपटावरून देशातील काही संस्थेत अशांतता निर्माण झाली आहे. त्यामुळे हा माहितीपट दाखवला जाणार नाही. जर कुणी तसा प्रयत्न केल्यास किंवा अशा कोणत्याही कृतीत सहभागी झाल्यास विद्यार्थ्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल असा इशारा देण्यात आला आहे.

TISS विद्यार्थी संघटनेचे नेता प्रतीक परमे म्हणाला की, संस्थेतील विद्यार्थ्यांनी अशा कोणत्याही माहितीपटाचे स्क्रिनिंग करण्याची योजना आखलेली नाही. माहितीपटाबद्दल आम्हाला संचालकांकडून नियमावली मिळाली आहे. परंतु आम्ही असा कोणताही माहितीपट प्रदर्शित करण्याचा विचार करत नाही.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या