मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  बीबीसीच्या डॉक्यूमेंट्रीवरून जेएनयूत पुन्हा राडा; विद्यार्थांची एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी

बीबीसीच्या डॉक्यूमेंट्रीवरून जेएनयूत पुन्हा राडा; विद्यार्थांची एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Jan 26, 2023 11:47 PM IST

Controversy On BBC documentary In JNU : गुजरात दंगलीवर आधारित डॉक्यूमेंट्रीच्या स्क्रिनींगवरून जेएनयूतील विद्यार्थी संघटना पुन्हा आमने-सामने आल्याची घटना समोर आली आहे.

Controversy On BBC documentary In JNU
Controversy On BBC documentary In JNU (HT)

BBC Documentary On Gujarat Riots : गुजरात दंगलीवर आधारित असलेली बीबीसीच्या बीबीसीच्या डॉक्यूमेंट्रीची स्क्रिनींग करणाऱ्या विद्यार्थ्यांवर जवाहरलाल नेहरू विद्यापीठात दगडफेक करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच आता जेएनयूत पुन्हा विद्यार्थी संघटनांमध्ये वाद झाल्याची घटना समोर आली आहे. डॉक्यूमेंट्रीची स्क्रिनींग सु्रू असतानाच उजव्या आणि डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थी संघटनांमध्ये वाद झाला असून विद्यार्थ्यांनी एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी केल्याची माहिती आहे. त्यानंतर दिल्ली पोलीस तातडीनं जेएनयूत दाखल झाले असून त्यानंतर प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे. त्यामुळं आता बीबीसीच्या डॉक्यूमेंट्रीवरून गेल्या आठवड्याभरात तिसऱ्यांदा जेएनयूत वाद झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात बीबीसीच्या डॉक्यूमेंट्रीची स्क्रिनींग करण्याचा प्रयत्न AISA आणि SFI या विद्यार्थी संघटना करत होत्या. त्यावेळी अभाविपने या स्क्रिनींगवर आक्षेप घेतला. त्यानंतर विद्यार्थी संघटनांमध्ये शाब्दिक चकमक झाली. वादावादी झाल्यानंतर दोन्ही संघटनांच्या विद्यार्थ्यांनी एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी करायला सुरुवात केली. त्यामुळं जेएनयूतील वातावरण पुन्हा तापलं असून परिसरात तणाव निर्माण झाला आहे. या वादानंतर जेएनयू प्रशासनानं अद्याप कोणतीही स्पष्टीकरण दिलेलं नाही.

गुजरात दंगलीवर बीबीसीनं प्रदर्शित केलेल्या डॉक्यूमेंट्रीचा पहिला भाग काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर शेयर करण्यात आला होता. केंद्र सरकारनं त्यावर बंदी घातल्यानंतर आता विरोधी पक्षाच्या नेत्यांनी माहितीपटाच्या दोन्ही भागाच्या लिंक्स सोशल मीडियावर शेयर केल्या आहेत. त्यामुळं आता बीबीसीच्या माहितीपटावरून दिल्लीत केवळ सत्ताधारी आणि विरोधकच नाही तर विद्यापीठातील विद्यार्थी संघटनांमध्ये मोठा संघर्ष होत असल्याचं दिसून येत आहे.

WhatsApp channel