मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Unemployment: बेरोजगारीचे संकट आणखी गडद, एकापाठोपाठ मोठ्या कंपन्याकडून नोकरकपात

Unemployment: बेरोजगारीचे संकट आणखी गडद, एकापाठोपाठ मोठ्या कंपन्याकडून नोकरकपात

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Jan 27, 2023 07:42 AM IST

Unemployment: जगभरात आर्थिक मंदीची चाहूल लागली असून एकापाठोपाठ मोठ्या कंपन्या नोकरकपात करताना दिसत आहे. ज्यामुळे जगभरातील बेरोजगारीचे संकट आणखी गडद होत चालले आहे.

Unemployment
Unemployment

Unemployment: जगभरात आर्थिक मंदीची चाहूल लागली असून एकापाठोपाठ मोठ्या कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांची कपात करत आहेत. अशातच जर्मनी सॉफ्टवेअर कंपनी सॅप (SAP) त्यांच्या तीन हजार कर्मचाऱ्यांना नोकरीतून काढण्याच्या तयारीत आहे. आपल्या मुख्य व्यवसायावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी आम्ही टारगेटेड रिस्ट्रक्चरींगची योजना तयार केल्याचे सांगत कंपनी नोकरकपात करणार आहे. कंपनीच्या या निर्णायामुळे बेरोजगारीच्या संख्येत आणखी वाढ होऊ शकते.

मिळालेल्या माहितीनुसार, सॅप कंपनीकडून गेल्या वर्षीचा एक अहवाल सादर करण्यात आला, ज्यात अडीच टक्के कर्मचाऱ्यांची नोकरी जाऊ शकते, असे नमूद करण्यात आले. या कंपनीत एक लाख २० हजार कर्मचारी कार्यरत आहेत. या संख्येची अडीच टक्के गृहीत धरली तर कंपनी साधारण ३ हजार कर्मचाऱ्यांना नारळ देण्याच्या तयारीत आहे असं दिसतं आहे.

गुगलच्या १२ हजार कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची टांगती तलवार

गूगलची पॅरेंट कंपनी अल्फाबेट इंक (GOOGL.O) मध्ये नोकरकपात केली जाणार आहे. कंपनी जवळपास १२,००० कर्मचाऱ्यांवर नोकरी गमावण्याची टांगती तलवार आहे. अल्फाबेट इंकमध्ये होणारी नोकरकपात टेक सेक्टरमध्ये मोठा झटका मानला जात आहे. आर्थिक मंदीच्या शक्यतेने जगभरातील कंपन्यांमध्ये २०२२ पासून नोकरकपातीचे सुरू झालेले सत्र यावर्षीय कायम आहे.

मायक्रोसॉफ्ट १० हजार कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढण्याचा तयारीत

मायक्रोसॉफ्ट (Microsoft) कंपनी तब्बल १० हजार कर्मचाऱ्यांना नारळ देण्याची तयारी सुरू केली आहे. कंपनीचे घटता महसूल काळजीचे कारण सांगितले जात आहे. मायक्रोसॉफ्ट (Microsoft) कंपनीच्या आधी अमेझॉन, सेल्सफोर्स सारख्या कंपन्यांनीही कर्मचारी कपात केली आहे. याच आठवड्याच्या सुरुवातीला भारताची स्टार्ट अप कंपनी शेयरचॅटनेही ६०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले होते.

IPL_Entry_Point

विभाग