मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Weather Update: विदर्भ, मराठवाड्यातील 'या' जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! राज्यात आज असे असेल हवामान

Maharashtra Weather Update: विदर्भ, मराठवाड्यातील 'या' जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! राज्यात आज असे असेल हवामान

Apr 13, 2024, 06:51 AM IST

    • Maharashtra Weather Update: राज्यात आज देखील काही जिल्ह्यात पावसाचा इशारा देण्यात आला (IMD Alert) आहे. या सोबतच काही जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याच्या देखील इशारा देण्यात आला आहे.
विदर्भ, मराठवाड्यातील 'या' जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! राज्यात आज असे असेल हवामान (Shyamal Maitra)

Maharashtra Weather Update: राज्यात आज देखील काही जिल्ह्यात पावसाचा इशारा देण्यात आला (IMD Alert) आहे. या सोबतच काही जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याच्या देखील इशारा देण्यात आला आहे.

    • Maharashtra Weather Update: राज्यात आज देखील काही जिल्ह्यात पावसाचा इशारा देण्यात आला (IMD Alert) आहे. या सोबतच काही जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याच्या देखील इशारा देण्यात आला आहे.

Maharashtra Weather Update : राज्यावर आज देखील अवकाळी पावसाचे संकट कायम आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात आज वादळी वाऱ्यासह मेघ गर्जना, वीजांच्या कडकडाट, गारपीटीसह पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विदर्भातील काही जिल्ह्यात यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, व यवतमाळ या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्चना विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह पाऊस व गारा पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे तेथे ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. राज्यात तापमानात थोडी घट झाली असली तरी १५ एप्रिल नंतर पावसाची शक्यता कमी होणार असल्याने तापमानात पुन्हा वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

तुमच्या शहरातील हवामान जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
ट्रेंडिंग न्यूज

रिक्षाचालकाने भाडे नाकारले, जादा भाडे घेतल्यास करा व्हॉट्सअ‍ॅपवर तक्रार, तातडीने होणार कारवाई

Chiplun Cloudburst Rains: चिपळूणच्या अडरे गावात ढगफुटी! अर्ध्या तासात धडकी भरवणारा पाऊस, मे महिन्यातच नद्यांना पूर

Mumbai Lok sabha : मतदानाच्या पूर्वसंध्येलाच मुंबईत प्रिसायडिंग ऑफिसरचा मृत्यू, होमगार्डला हृदयविकाराचा धक्का

Monsoon Update : आनंदाची बातमी! मान्सून अंदमानात दाखल, महाराष्ट्रात कधी धडकणार मोसमी वारे?

PM Narendra Modi : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वत: आले तरी संविधान संपवू शकणार नाहीत, पंतप्रधान मोदींचं विधान

पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार, वातावरणाच्या खालच्या थरातील वाऱ्यांची द्रोणीका रेषा ही सौराष्ट्र कच्छ लगतच्या भागावर असलेल्या चक्रीय स्थिती पासून ते कर्नाटक पर्यंत जात आहे. तसेच ही रेषा मध्य महाराष्ट्रातून देखील जाते. त्यामुळे राज्यातील किनारपट्टीवर पावसाची शक्यता नाही. तसेच कोकण, गोव्यात देखील पावसाची शक्यता नाही.

Prakash Ambedkar : 'महाराष्ट्रातील ‘या’ २० जागांवर मॅच फिक्सिंग', प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप

मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज मध्य महाराष्ट्रातील जळगाव, अहमदनगर, सांगली, सोलापूर, येथे, तर उर्वरित राज्यात पुढील दोन ते तीन दिवस मेघगर्चना विजांचा कडकडाट व वादळीवारासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आहे. 15 एप्रिल नंतर राज्यात सर्वत्र पावसाची शक्यता कमी आहे. आज मराठवाड्यातील बीड, नांदेड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी तर विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली व यवतमाळ या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्चना विजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह पाऊस व गारा पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे तेथे ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

Uddhav Thackeray : नकली शिवसेना म्हणायला ती काय तुमची डिग्री आहे का? भाडXX जनता पक्ष, उद्धव ठाकरेंचा मोदींवर पलटवार

पुण्यात असे असेल हवामान

पुणे व परिसरात १४ एप्रिलपर्यंत आकाश अंशतः ढगाळ राहील व १५ एप्रिलला आकाश अंशत: ढगाळ राहून हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. पुण्यात शुक्रवारी तापमान ३८ डिग्री सेल्सिअस होते. दिवसा हवामान ढगाळ असल्याने उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला.

राज्यात मालेगाव सर्वाधिक उष्ण

राज्यभरात काहीसे ढगाळ वातावरण राहणार आहे. राज्यात शुक्रवारी सर्वाधिक तापमान हे मालेगाव येथे नोंदवल्या गेले. येथे शुक्रवारी ४०.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. विदर्भात अवकाळी, गारपीट, ढगाळ हवामानामुळे कमाल तापमान घट होऊन तापमान सरासरी ३३.० अंशांवर स्थिर राहिले. मराठवाड्यात तापमान हे सरासरी ३५.५, तर मध्य महाराष्ट्रात सरासरी तापमान हे ३८.० डिग्री सेल्सिअस एवढे राहिले.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या