मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  PM Narendra Modi : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वत: आले तरी संविधान संपवू शकणार नाहीत, पंतप्रधान मोदींचं विधान

PM Narendra Modi : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वत: आले तरी संविधान संपवू शकणार नाहीत, पंतप्रधान मोदींचं विधान

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Apr 13, 2024 12:19 AM IST

PM Narendra Modi : इंडिया आघाडीकडून भाजपावर संविधान धोक्यात आल्याची टीका करण्यात येत आहे. विरोधकांच्या या टीकेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका रॅलीला संबोधित करताना प्रत्युत्तर दिले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वत: आले तरी संविधान संपवू शकणार नाहीत, पंतप्रधान मोदींचं विधान
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वत: आले तरी संविधान संपवू शकणार नाहीत, पंतप्रधान मोदींचं विधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी देशाच्या संविधानाला (Pm modi ON Constitution) केंद्र सरकारसाठी 'गीता, रामायण, महाभारत आणि कुरान संबोधत म्हटले की, बाबासाहेब आंबेडकर स्वत: आले तरी संविधान संपवू शकणार नाहीत. विरोधी पक्षाकडून भाजपवर संविधान नष्ट करण्याच्या प्रयत्न सुरू असल्याचा आरोप केला जातो. यावर पलटवार करताना मोदींनी हे विधान केले. त्यांनी म्हटले की, आमच्यासाठी आपलं संविधान सर्वोपरी आहे. मोदी आज बाडमेरमध्ये भारतीय जनता पार्टी (भाजपा) च्या निवडणूक प्रचारसभेत संबोधित करत होते. पंतप्रधान मोदींनी आरोप केला की, काँग्रेस देश-विरोधी शक्तीसोबत उभी आहे. त्यांनी इंडिया आघाडीवर देशाचे विभाजन करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप केला.

ट्रेंडिंग न्यूज

काँग्रेसवर हल्लाबोल करताना मोदी म्हणाले की, अनेक दशकांपासून गरीब वएससी, एसटी, ओबीसींवर अन्याय करणारी काँग्रेस आजकाल एक रेकॉर्ड वाजवत आहे. कुठलीही निवडणूक आल्यावर संविधानाच्या नावावर खोटे बोलणे इंडिया आघाडीची फॅशन झाली आहे. ज्या काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकर हयात असताना त्यांना निवडणुकीत हरवले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना काँग्रेसने भारतरत्न मिळू दिला नाही. ज्या काँग्रेसने देशात आणीबाणी लावली, संविधान संपवण्याचा प्रयत्न केला, आज तीच काँग्रेस मला शिव्या देण्यासाठी संविधान नष्ट करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे म्हणत खोटं बोलत आहे.

मात्र देशात पहिल्यांदा संविधान दिवस साजरा करण्याची सुरुवात करणाराही मोदीच आहे. संविधानावरून गळा काढणाऱ्या काँग्रेसनेच संविधान दिवस साजरा करायला विरोध केला होता. याबाबतचे त्यांचे संसदेमध्ये भाषणदेखील उपलब्ध आहे. मग हा डॉ. आंबेडकरांचा अपमान नाही का? हा संविधानाचा अपमान आहे की नाही? इतकेच नाहीहे ते मोदी आहेत, ज्यांनी डॉ. आंबेडकर यांच्याशी संबंधित पंचतीर्थांचा विकास केला. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानाचा अपमान करणाऱ्या काँग्रेस आणि इंडिया आघाडीच्या खोटेपणापासून सावध राहण्याची गरज आहे.

काँग्रेसल्यांनी हे अवश्य लक्षात ठेवावे की, ४०० पारचे ध्येय जनतेने यासाठी ठेवले की, गेल्या १० वर्षात तुम्ही मला संसदेत चांगले काम करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे देश काँग्रेसला शिक्षा देण्याच्या मनस्थितीत आहे. जनता काँग्रेसला देशातून साफ कण्याचा प्रयत्न करत आहे. जेथे संविधानाचा प्रश्न आहे तेथे तुम्ही माझे शब्द लिहून ठेवा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वतः आले तरी ते संविधान संपवू शकत नाहीत.

संविधान सरकारसाठी गीता, रामायण, महाभारत, बायबल, कुराण आहे.  इंडिया आघाडीवाले द्वेषाने भरलेले आहेत, त्यांना देशात फूट पाडायची आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

IPL_Entry_Point