मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Gudi Padwa : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घरी उभी राहणार कल्याणची गुढी! पर्यावरण रक्षणाचा देणार संदेश

Gudi Padwa : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घरी उभी राहणार कल्याणची गुढी! पर्यावरण रक्षणाचा देणार संदेश

Apr 06, 2024, 08:49 AM IST

    • kalyan woman send gudi to PM Modi : कल्याण येथील एका महिलेने एक पर्यावरणपूरक गुढी (gudi padwa 2024) तयार केली असून ही गुढी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिल्लीतिल घरी पाडव्याच्या दिवशी उभारली जाणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घरी उभी राहणार कल्याणची गुढी! पर्यावरण रक्षणाचा देणार संदेश

kalyan woman send gudi to PM Modi : कल्याण येथील एका महिलेने एक पर्यावरणपूरक गुढी (gudi padwa 2024) तयार केली असून ही गुढी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिल्लीतिल घरी पाडव्याच्या दिवशी उभारली जाणार आहे.

    • kalyan woman send gudi to PM Modi : कल्याण येथील एका महिलेने एक पर्यावरणपूरक गुढी (gudi padwa 2024) तयार केली असून ही गुढी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिल्लीतिल घरी पाडव्याच्या दिवशी उभारली जाणार आहे.

kalyan woman send gudi to PM Nnarendra Modi : कल्याण (kalyan) येथील एका महिलेने एक पर्यावरणपूरक गुढी (gudi padwa 2024) तयार केली असून ही गुढी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिल्लीतिल घरी पाडव्याच्या दिवशी उभारली जाणार आहे. ही गुडी पर्यावरणपूरक पद्धतीने तयार करण्यात आली असून पर्यावरण रक्षणाचा संदेश ही गुढी देणार आहे. देशात राम मंदिराची उभारणी केल्याबद्दल आणि देशाच्या संस्कृतीचे संवर्धन केल्याबद्दल आदरभाव व्यक्त करण्यासाठी ही गुढी टपालाने पाठववण्यात आल्याची माहिती, गुढी व्यवसायाच्या मुख्य प्रवर्तक मेधा मोहन आघारकर यांनी दिली.

ट्रेंडिंग न्यूज

रिक्षाचालकाने भाडे नाकारले, जादा भाडे घेतल्यास करा व्हॉट्सअ‍ॅपवर तक्रार, तातडीने होणार कारवाई

Chiplun Cloudburst Rains: चिपळूणच्या अडरे गावात ढगफुटी! अर्ध्या तासात धडकी भरवणारा पाऊस, मे महिन्यातच नद्यांना पूर

Mumbai Lok sabha : मतदानाच्या पूर्वसंध्येलाच मुंबईत प्रिसायडिंग ऑफिसरचा मृत्यू, होमगार्डला हृदयविकाराचा धक्का

Monsoon Update : आनंदाची बातमी! मान्सून अंदमानात दाखल, महाराष्ट्रात कधी धडकणार मोसमी वारे?

Iisrael Iran Tension : गाझा नंतर आता इस्रायल-इराण संघर्ष पेटला! इराणी लष्करी अधिकाऱ्यांच्या मृत्यूनंतर युद्धाचे सावट!

मेधा मोहन आघारकर या कल्याण शहरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्या आहेत. त्यांनी त्यांच्या घरी गुढी तयार करण्याच्या व्यवसाय सुरू केला आहे. त्यांनी तयार केलेली गुढी ही पर्यावरणपूरक आणि सुंदर असून ही गुढी पंतप्रधान नरेंद्र मोदी चैत्र पाडव्याच्या दिवशी त्यांच्या घरी उभारणार आहेत.

Maharashtra Weather Update : राज्यावर दुहेरी संकट! उष्णतेच्या लाटेबरोबर अवकाळी पावसाची शक्यता; गुडीपाडव्याला हलक्या सरी

मेधा आघारकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबतच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील ही गुढी टपालाने पाठवली आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात तसेच अनेक जण कामाच्या व्यापात असल्याने त्यांना त्यांच्या घरी गुढी उभारणे शक्य होत नाही. तसेच या सणाची माहिती देखील अनेकांना माहिती नसते. यामुळे या सणाचे महत्व टिकून राहावे आणि याची माहिती सर्वांना मिळावी व त्या माध्यमातून संस्कृती रक्षण व्हावे या हेतूने मेधा आघरकर या गेल्या १५ वर्षापासून त्यांच्या घरी कागद, कपड्याच्या पर्यावरणपूरक गुढ्या तयार करत आहेत. या व्यवसायाची सुरुवात त्यांनी दोन ते तीन महिलांच्या साह्याने सुरूवात केली होती. आज त्यांच्या कडे १५ महिला ही पर्यावरण पूरक गुढी तयार करण्याचे काम करतात. त्यांनी या माध्यमातून रोजगाराचे साधन तयार केले आहे. यातून त्या राज्याची संस्कृती देखील पुढे घेऊन जात आहे.

solapur highest temperature : देशातील सर्वाधिक हॉट शहरांमध्ये सोलापूर; ४३.१ डिग्री सेल्सिअस तापमानची नोंद

या गुढ्या त्या त्यांच्या ओळखीतील लोकांना विकतात. यातून त्यांच्या कडे काम करणाऱ्या महिलांची मजुरी निघते. साधारण, डिसेंबरपासून गुडी तयार करण्याच्या कामाला सुरूवात केली जाते. तब्बल २ हजार छोट्या आकाराच्या गुढ्या त्या तयार करून विकतात. माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी बाजपेयी यांनी देखील त्यांच्या गुढीचे कौतुक केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या १० वर्षात अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहेत. अयोध्येत राम मंदिर उभारूणीचे काम सुरू आहे. त्यांच्या या संस्कृती रक्षणाच्या कार्याचे कौतुक करण्यासाठी आणि ही पर्यावरण पूरक गुढी त्यांनी घरात उभारून आनंदोत्सव साजरा करावा, या उहेतूने त्यांना ही गुढी पाठवण्यात आल्याचे असे आघारकर यांनी सांगितले.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या