मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Iisrael Iran Tension : गाझा नंतर आता इस्रायल-इराण संघर्ष पेटला! इराणी लष्करी अधिकाऱ्यांच्या मृत्यूनंतर युद्धाचे सावट!

Iisrael Iran Tension : गाझा नंतर आता इस्रायल-इराण संघर्ष पेटला! इराणी लष्करी अधिकाऱ्यांच्या मृत्यूनंतर युद्धाचे सावट!

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Apr 06, 2024 08:08 AM IST

Israel Iran Tension : हमास नंतर (Israel hamas war) आता इस्रायलचा इराण (Iran)सोबत तणाव वाढला असून दोन्ही देशात युद्धजन्य स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे इस्रायलमध्ये (Israel) जीपीएस आणि नेव्हिगेशन यंत्रणा बंद करण्यात आली आहे. तर जवानांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत.

गाझा नंतर आता इस्रायल-इराण संघर्ष पेटला! इराणी लष्करी अधिकाऱ्यांच्या मृत्यूनंतर युद्धाचे सावट!
गाझा नंतर आता इस्रायल-इराण संघर्ष पेटला! इराणी लष्करी अधिकाऱ्यांच्या मृत्यूनंतर युद्धाचे सावट!

Iisrael Iran Tension : सीरियामध्ये इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात अनेक इराणी लष्करी अधिकाऱ्यांच्या मृत्यूझाल्यामुळे इराण संतत्प झाला आहे. यामुळे दोन्ही देशात तणाव वाढला असून युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आयाटा आणखी एक युद्ध पेटण्याची शक्यता आहे. इराणकडून हल्ल्याच्या भीतीने इस्रायलने क्षेपणास्त्र रोखण्यासाठी जीपीएस यंत्रणा बंद करण्याचे आदेश दिले आहेत. तर सैनिकांच्या सुट्ट्या देखील रद्द करण्यात आल्या आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

Pune Kondhva Gate Accident : 'ते' दोघे फिरायला गेले अन्...! पुण्यातील थरारक अपघाताचा व्हिडिओ व्हायरल

इराण ५ एप्रिलनंतर कधीही हल्ला करू शकतो, असे इस्रायलला वाटत असून इराण ५ एप्रिल हा जेरुसलेम दिन म्हणून साजरा करतो. सीरियाच्या राजधानीत इराणच्या राजनैतिक संकुलावर झालेल्या हवाई हल्ल्यात इराणी लष्कराचे कमांडर जनरल मोहम्मद रजा जाहेदी यांचा मृत्यू झाला. २०२० मध्ये अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात मारले गेलेले मेजर जनरल कासिम सुलेमानी यांच्यानंतर इराण लष्कराचा मोठा जनरल ठार मारल्या जाण्याची ही पहिलीच वेळ आहे.

solapur highest temperature : देशातील सर्वाधिक हॉट शहरांमध्ये सोलापूर; ४३.१ डिग्री सेल्सिअस तापमानची नोंद

आत्तापर्यंत गाझामध्ये हमाससोबत सुरू असलेल्या युद्धात इराण अप्रत्यक्षपणे इस्रायलच्या विरोधात उभा राहिला आहे. मात्र, या हल्ल्यानंतर दोन्ही देश आता आमनेसामने येण्याची शक्यत असून युद्ध पेटण्याची शक्यता आहे. यामुळे आता मध्य आशियात तणाव वाढणार असून अस्थिर वातावरण होऊ शकते. इराणकडून हल्ल्याच्या भीतीने इस्रायलनेही तयारी सुरू केली आहे. अशा स्थितीत इराणनेही आता प्रत्युत्तर दिल्यास दुसरे युद्ध सुरू होईल, अशी शक्यता समारीक तज्ञ व्यक्त करत आहेत.

Maharashtra Weather Update : राज्यावर दुहेरी संकट! उष्णतेच्या लाटेबरोबर अवकाळी पावसाची शक्यता; गुडीपाडव्याला हलक्या सरी

अशी आहे इस्रायलची तयारी!

इस्रायलने इराणचे लक्षरी हल्ले टाळण्यासाठी जीपीएस आणि नेव्हिगेशन प्रणाली बंद करण्यास सुरुवात केली आहे. इस्रायल मार्गदर्शित क्षेपणास्त्रे किंवा ड्रोनने हल्ला करू शकतो, अशी भीती इस्रायलची आहे. बीबीसीच्या रिपोर्टनुसार, तेल अवीव आणि जेरुसलेमच्या लोकांनी लोकेशन बेस्ड ॲप वापरता येत नसल्याची तक्रार केली आहे. याशिवाय इस्रायलने लष्करातील सर्व लढाऊ तुकड्यांचे पत्ते देखील डिलीट केले आहेत. या शिवाय सैनिकांच्या सुट्ट्या देखील रद्द करण्यात आल्या असून इस्रायलच्या सीमेवर सैनिक आणि शस्त्रास्त्रांची तैनाती वाढवण्यात आली आहे.

इस्रायलच्या तयारीमुळे येथील लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. परदेशी नागरिकांना त्यांच्या दूतावासांकडून सतर्क करण्यात आल्याचे स्थानिक माध्यमांचे म्हणणे आहे. नागरिकांना देखील राशन घरात भरून ठेवण्यास संगितले आहे. इस्त्रायलने या हल्ल्याची अधिकृतपणे जबाबदारी घेतलेली नाही. दरम्यान, इराणचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद रायसी यांनी या हल्ल्याला उत्तर दिले जाईल, असे म्हटले आहे.

इराणी लोक ५ एप्रिलला कुर्द दिवस साजरा करतात. या दिवशी पॅलेस्टिनींच्या समर्थनार्थ रॅलीही काढली जाते. दरम्यान, इस्रायलमध्ये लोकेशन सिस्टम व्यवस्थित काम करत नसल्याचे सोशल मीडियावरील लोकांचे म्हणणे आहे.

IPL_Entry_Point