मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  आमदारांची दादागिरी सुरूच! भाजपच्या एका मंत्र्यावर मारहाणीचा आरोप; पदाधिकाऱ्याने केली पोलिसांत तक्रार

आमदारांची दादागिरी सुरूच! भाजपच्या एका मंत्र्यावर मारहाणीचा आरोप; पदाधिकाऱ्याने केली पोलिसांत तक्रार

Mar 02, 2024, 05:51 PM IST

    • BJP News : मंत्री दादा भुसे आणि आमदार महेंद्र थोरवे यांची मंत्रिमंडळाच्या लॉबीमध्ये मारहाण झाल्याची घटना ताजी असतांना आता आणखी एका आमदाराने (BJP) आपल्याच पदाधीकाऱ्याला मारहाण केल्याच  धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी मुंबईच्या मरीनड्राइव्ह पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
भाजपच्या एका मंत्र्यावर मारहाणीचा आरोप

BJP News : मंत्री दादा भुसे आणि आमदार महेंद्र थोरवे यांची मंत्रिमंडळाच्या लॉबीमध्ये मारहाण झाल्याची घटना ताजी असतांना आता आणखी एका आमदाराने (BJP) आपल्याच पदाधीकाऱ्याला मारहाण केल्याच धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी मुंबईच्या मरीनड्राइव्ह पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

    • BJP News : मंत्री दादा भुसे आणि आमदार महेंद्र थोरवे यांची मंत्रिमंडळाच्या लॉबीमध्ये मारहाण झाल्याची घटना ताजी असतांना आता आणखी एका आमदाराने (BJP) आपल्याच पदाधीकाऱ्याला मारहाण केल्याच  धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी मुंबईच्या मरीनड्राइव्ह पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

BJP News : शिंदे गटाचे आमदार दादा भुसे आणि आमदार महेंद्र थोरवे यांच्यात हाणामारीची घटना ताजी असतांनाच आता आणखी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका भाजप आमदाराने आपल्याच पदाधिकाऱ्याला मारहाण केली. मारहाण झालेल्या भाजपच्या पदाधिकाऱ्याने या प्रकरणी मुंबईतील मरीनड्राइव्ह पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai Weather Update: मुंबई, ठाण्यात आज उष्णतेची लाट! मतदारांनो सकाळच्या सत्रात उरकून घ्या मतदान

Maharashtra Weather Update : कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात अवकाळी पावसाचा तर मुंबई, ठाण्यात उष्णतेचा यलो अलर्ट!

रिक्षाचालकाने भाडे नाकारले, जादा भाडे घेतल्यास करा व्हॉट्सअ‍ॅपवर तक्रार, तातडीने होणार कारवाई

Chiplun Cloudburst Rains: चिपळूणच्या अडरे गावात ढगफुटी! अर्ध्या तासात धडकी भरवणारा पाऊस, मे महिन्यातच नद्यांना पूर

spain tourist gangraped : संतापजनक! झारखंडच्या दुमका येथे स्पॅनिश महिलेवर सामूहिक बलात्कार

मंत्री अतुल (mla atul save) सावे असे मारहाण करणाऱ्या आमदाराचे नाव आहे. तर आसाराम डोंगरे असे मारहाण झालेल्या पदाधिकाऱ्याचे नाव आहे. डोंगर यांनी या प्रकरणी कारवाईची मागणी केली आहे. तक्रारदार आसाराम डोंगरे हे मंत्री अतुल सावेंना भेटायल गेले होते. यावेळी सावे यांनी 'तू देवेंद्र फडणवीस व बावणकुळेंच्या संपर्कात राहतोस असे म्हणत मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. सावे यांच्यासह त्यांच्या दोन स्वीय सहाय्यकांनीही डोंगर यांना मारहाण केली. यामुळे सावे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी तक्रारदार डोंगरे यांनी केली आहे.

Jamnagar airport : अनंत अंबानींच्या प्री-वेडिंग सोहळ्यासाठी जामनगर विमानतळाला आंतरराष्ट्रीय दर्जा

डोंगर हे औरगाबाद येथील रहिवासी आहेत. ते भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहेत. त्यांचे श्री देवेंद्र फडणवीस प्रतिष्ठान असून ते त्यांचे अध्यक्ष आहेत. डोंगर हे १ मार्चला कॅबीनेट मंत्री अतुल सावे यांना कामानिमित्त भेटायला गेले होते. सावे यांनी त्यांना या बद्दल जाब विचारत तू इथे कशाला आलास, मी तुझे कुठलेच काम करणार नाही. तू देवेंद्र फडणवीस काय, श्री नरेंद्र मोदी किंवा अमित शहा यांना सांगितले तरी मी तुझे काम करणार नाही असे म्हणत डोंगर यांनी आणलेल्या निवेदनाच  कागद फेकून देऊन त्यांना मारहाण केली.

यावेळी सावे यांचे पीए प्रविण चव्हाण तसेच दुसरा पीए अशोक शेळके यांनी सुद्धा डोंगरे यांना मारहाण केली. तू देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळेच्या संपर्कात राहतोस. एवढा मोठा झालास का, तुझी औकात काय असे म्हण  शिवीगाळ करून त्यांना मारहाण करण्यात आली. एवढेच नाही तर त्यांना त्यांच्या कार्यालयातून हाकलून दिले. सावे यांनी या आधीही मारहाण आणि अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप डोंगर यांनी केला.

पुढील बातम्या