Jamnagar airport gets international status : देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी त्यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी (Anant Ambani pre-wedding) हा लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. तो राधिका मर्चंडशी लग्न करणार आहे. सध्या त्यांचे प्री-वेडींग सेलिब्रेशन जामनगर येथे सुरु आहे. या सेलिब्रेशनला अनेक कलाकारांनी हजेरी लावली आहे. तसेच जगभरातील प्रसिद्ध व्यक्ती, राजकीय नेते या कार्यक्रमाला हजर असल्याचे पाहायला मिळाले. या प्री-वेडींग सेलिब्रेशनमुळे जामनगर विमानतळाचा कायापालट झाला असून त्याला आंतरराष्ट्रीय विमातळाचा दर्जा मिळाला आहे.
जामनगर येथे अनंत अंबानीचा प्री वेडिंग सेलिब्रेशन सुरू आहे. या साठी जगभरातील दिग्गज, सेलिब्रेटी, उद्योगपती, अभिनेते, खेळाडू यांनी हजेरी लावली आहे. यात बिल गेट्स, मार्क झुकेरबर्ग, रिहाना, इव्हांका ट्रम्प आणि अनेक माजी पंतप्रधानांनी हजेरी लावली. दरम्यान, या मान्यवरांचे स्वागत अंबानी कुटुंबियांना करता यावे या साठी जामनगर विमानतळाला १० दिवसांसाठी आंतरराष्ट्रीय विमानतळ घोषित करण्यात आले आहे.
जामनगर विमानतळ २५ फेब्रुवारी ते ५ मार्च या कालावधीत आंतरराष्ट्रीय विमानतळ राहणार आहे. यावेळी या ठिकाणी अनेक आंतरराष्ट्रीय विमाने, खाजगी विमाने उतरली असून त्यामुळे या विमानतळाला हा दर्जा देण्यात आल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, या ठिकाही या दर्जाच्या सुविधा उभारण्यासाठी केंद्र सरकारचे आरोग्य मंत्रालय, वित्त मंत्रालय आणि गृह मंत्रालयाने विमानतळावर कस्टम, इमिग्रेशन आणि क्वारंटाईन (CIQ) सुविधा उभारण्यासाठी संसाधनांवर दबाव आणल्याची माहिती आहे.
जामनगर येथे हवाई दलाचा महत्वाचा तळ आहे. असे असतांना या विमानतळावरून व्यावसायिक उड्डाणांना आधीच परवानगी देण्यात आली आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (AAI) या उद्देशासाठी एक प्रवासी टर्मिनल इमारत देखील या ठिकाणी उभारली आहे. तथापि, अब्जाधीश मुकेश अंबानी यांच्या धाकट्या मुलाच्या सेलिब्रेशनसाठी या सुविधा उभारण्यात आल्या आहेत. दरम्यान भारतीय हवाई दलाने या विमानळाच्या संवेदनशील आणि तांत्रिक परिसरात प्रवेश करण्याची देखील परवानगी दिली आहे.
द हिंदू या वृत्तपत्राला एका विमानतळाच्या अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, एका ठराविक वेळेत या ठिकाणी तीन विमाने उभी केली जाऊ शकतात. विमानतळाच्या नागरी क्षेत्रामध्ये फाल्कन-२०० सारखी सहा लहान विमाने किंवा एअरबस ए३२० सारखी तीन मोठी विमाने बसू शकतात. शुक्रवारी, एकूण १४० विमानांची उड्डाने आणि लँडिंग या ठिकाणी झाले.
विमानतळावर शुक्रवारी कतारचे पंतप्रधान शेख मोहम्मद बिन अब्दुलरहमान अल थानी, तसेच सौदी अरामकोचे चेअरपर्सन यासिर अल-रुमायान, डिस्नेचे सीईओ बॉब इगर, अमेरिकन अब्जाधीश उद्योजक आणि जागतिक गुंतवणूक व्यवस्थापन कंपनी ब्लॅकरॉकचे अध्यक्ष लॅरी फिंक आणि माजी यू.एस. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी इवांका ट्रम्प. या यादीत भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक, ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान केविन रुड आणि कॅनडाचे माजी पंतप्रधान स्टीफन हार्पर यांची विमाने उतरली. तर भारतीय सेलिब्रिटींमध्ये दीपिका पदुकोण, रणवीर सिंग, शाहरुख खान, एम.एस. धोनी, सानिया नेहवाल आणि इतर देखील विशेष विमानांनी या ठिकाणी आलेत.
मोठ्या प्रमाणात आलेल्या या मान्यवर पाहुण्यांचे स्वागत करण्यात यावे या साठी भारतीय विमानतळ प्राधिकरणाने प्रवासी इमारतीचा आकार देखील ४७५ sq.m वरून ९०० sq.m पर्यंत वाढवला होता. ज्यामुळे ती पूर्वीच्या १८० च्या तुलनेत गर्दीच्या वेळेत जवळपास ३६० प्रवाशांना सामावून घेण्याची क्षमता या ठिकाणी वाढली. या विमानळाच्या विस्ताराची कामे नियोजित होती परंतु अंबानी यांच्या मुलाच्या कार्यक्रमासाठी ही कामे आणखी वेगाने पूर्ण करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.
विमानतळाने या ठिकाणी मनुष्यबळ देखील वाढवले होते. राज्य सरकारने सुरक्षा कर्मचाऱ्यांची तैनाती ३५ वरून ७० केली आहे तर ग्राउंड हँडलिंग एजन्सींनी त्यांच्या कर्मचाऱ्यांची संख्या ६५ वरून १२५ केली आहे. त्याचप्रमाणे भारतीय हवाई दलाने हवाई वाहतूक नियंत्रण टॉवरवर अधिक लष्करी जवान तैनात केले आहेत.
विमानतळावरील स्वच्छतागृहांचे नूतनीकरण करण्यात आले असून रंगरंगोटीही करण्यात आली आहे. जगभरातून आणि देशातून पाहुणे आणलेल्या अनेक खाजगी जेट विमानांव्यतिरिक्त, एअर इंडिया एक्सप्रेसने तीन १८० आसनी बोईंग ७३७ विमाने देखील या ठिकाणी आली आहे. तब्बल १८ उड्डाणे ही विमाने करणार आहेत. बंगळुरू-आधारित प्रादेशिक वाहक स्टार एअरने पाहुण्यांना नेण्यासाठी त्यांचे ७६ आसनी एम्ब्रेर ई १७५ विमान देखील या ठिकाणी तैनात करण्यात आले आहेत. ४ मार्च हा विमानतळासाठी सर्वात मोठा व्यस्त दिवस असेल जेव्हा बहुतेक पाहुणे पुन्हा माघारी जाणे अपेक्षित आहे.
संबंधित बातम्या