spain tourist gangraped in jharkhand dumka : झारखंडच्या दुमका येथे एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. स्पेनच्या एका महिला पर्यटकावर ७-८ तरुणांनी सामूहिक बलात्कार केला आहे. एवढेच नाही तर नराधमांनी तिला बेदम मारहाण देखील केली. यात ही महिला गंभीर जखमी झाली आहे. पीडितेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
झारखंडमधील दुमका जिल्ह्यातील हंसदिहा पोलीस स्टेशन हद्दीतील कुरुमहाट येथील एका स्पॅनिश परदेशी महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. मात्र, या प्रकरणाला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. ज्यांची चौकशी केली जात आहे. उर्वरित आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, स्पेनमधून एक महिला आणि एक सहकारी पर्यटक दोन वेगवेगळ्या बाइकवरून दुमका येथे आले होते. संध्याकाळची वेळ असल्याने दोघेही हंसदिहा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुरमहाटजवळ विश्रांतीसाठी थांबले होते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रात्री उशिरा १० वाजण्याच्या सुमारास ७ ते ८ या संख्येतील तरुण तेथे आले आणि त्यांनी प्रथम तिला मारहाण केली आणि नंतर महिलेवर बलात्कार केला. या घटनेत दोघेही जखमी झाले आहेत.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी रात्री घटनास्थळ गाठून दोघांनाही सरैयाहाट सामुदायिक आरोग्य केंद्रात भरती करण्यात आले. या ठिकाणी महिलेवर उपचार सुरू आहेत. सरैयाहाट रुग्णालयाबाहेर सुरक्षेसाठी पोलीस तैनात आहेत. रुग्णालयात कोणालाही प्रवेश दिला जात नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेत पोलिसांनी हंसदिहा पोलीस स्टेशन हद्दीतील कुंजी गावातील चार तरुणांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे. या घटनेची माहिती मिळताच एसपी पीतांबर सिंह खेरवार, जारमंडीचे एसडीपीओ संतोष कुमार आणि दुमका डीएसपी रात्रीपासून हंसदिहामध्ये तळ ठोकून आहेत. माहिती मिळताच पोलिसांनी श्वानपथक पथकासह रात्रीच बचावकार्य केले.
संबंधित बातम्या