मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune bypoll : हक्काच्या मतदारांची भाजपकडे पाठ; सदाशिव, शनिवार पेठेतून धंगेकरांना पसंती

Pune bypoll : हक्काच्या मतदारांची भाजपकडे पाठ; सदाशिव, शनिवार पेठेतून धंगेकरांना पसंती

Mar 03, 2023, 12:14 PM IST

    • Pune bypoll : अवघ्या राज्याचे लक्ष लागून असलेल्या कसबा पेठ विधानसभा मतदार संघाच्या चुरशीच्या लढतीत महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी भापजचे उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव करून भाजपच्या गडाला खिंडार पाडले. भाजपच्या सदाशिव आणि शनिवार पेठे प्रभागातील मतदारांनी रासने यांना मते दिली असली तरी तब्बल १४ हजार मतदारांनी रविंद्र धंगेकर यांना पसंती दर्शवत मते दिली आहे.
Ravindra Dhangekar In Kasba Peth Bypoll (HT)

Pune bypoll : अवघ्या राज्याचे लक्ष लागून असलेल्या कसबा पेठ विधानसभा मतदार संघाच्या चुरशीच्या लढतीत महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी भापजचे उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव करून भाजपच्या गडाला खिंडार पाडले. भाजपच्या सदाशिव आणि शनिवार पेठे प्रभागातील मतदारांनी रासने यांना मते दिली असली तरी तब्बल १४ हजार मतदारांनी रविंद्र धंगेकर यांना पसंती दर्शवत मते दिली आहे.

    • Pune bypoll : अवघ्या राज्याचे लक्ष लागून असलेल्या कसबा पेठ विधानसभा मतदार संघाच्या चुरशीच्या लढतीत महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी भापजचे उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव करून भाजपच्या गडाला खिंडार पाडले. भाजपच्या सदाशिव आणि शनिवार पेठे प्रभागातील मतदारांनी रासने यांना मते दिली असली तरी तब्बल १४ हजार मतदारांनी रविंद्र धंगेकर यांना पसंती दर्शवत मते दिली आहे.

पुणे : भाजपचा गड असणाऱ्या कसबा पेठेतील मतदारांनी भाजपला नाकारत महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांना पसंती दिली. या मतदार संघातील सदाशिव आणि शनिवार पेठे प्रभाग हा भाजपचा गड असून सर्वाधिक मतदान याच प्रभागातून भाजपला होत होते. मात्र, या निवडणुकीत हेमंत रासने यांना रविंद्र धंगेकर यांच्या पेक्षा अधिक मते मिळाली असली तरी, १४ हजार ५००च्या आसपास मते ही धंगेकर यांना मिळाल्याने हक्काच्या प्रभागातून मते न मिळाल्याने या निवडणुकीत भाजपला मोठा फटका बसला आहे. यात ब्राम्हण उमेदवार डावलल्याने मतदार विभागल्या गेल्याचे दिसून आले.

ट्रेंडिंग न्यूज

Lok Sabha Election : मुंबई व उपनगरात २० मे रोजी दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी धावणार मोफत बस

Weather Update : राज्यात अवकाळी पावसाचा मुक्काम आठवडाभर वाढणार; मान्सूनबाबतही गुड न्यूज

Akola Accident: अकोल्यात अरुंद पुलावर ओव्हरटेक करताना तांदळाने भरलेली ट्रक पलटली, कारमधील ४ जण दबले

Godan Express : गोदान एक्स्प्रेसच्या डब्याखालून येऊ लागला धूर, घाबरलेल्या प्रवाशांच्या रेल्वेतून उड्या

पुण्यातील कसबा व चिंचवड पोटनिवडणुकीतील निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले होते. कसब्यात भाजपला पराभवाचा धक्का बसला असून तब्बल २८वर्षांनी कसबा पेठ मतदारसंघ भाजपच्या हातातून निसटला आहे. कसब्यात काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी ११ हजार ४०० मतांच्या फरकाने भाजप उमेदवार हेमंत रासने यांना धूळ चारली. भाजपचा पारंपरिक मतदार संघ असतांना देखील मोठी ताकद भाजप पक्ष प्रमुखांना या मतदार संघात लावली लागली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष बावणकुळे, पालक मंत्री चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन हे या मतदार संघात तळ ठोकून होते. या निवडणुकीत सर्व प्रकारचे हातखंडे भाजपने वापरल्याचा आरोप होत आहे. स्वत: रविंद्र धंगेकर यांनी देखील मोठ्या प्रमाणात पैसे वाटल्याचा आरोप केला होता. मात्र, भाजपचा हक्काचा मतदार संघ असतांना हा पराभव का स्वीकारावा लागला याचे आत्मचिंतन करण्याची वेळ भाजपवर आली आहे.

या मतदार संघातील प्रभागात भाजपला मिळालेल्या मतदानाची आकडेवारी पहिली असता, पारंपरिक मतदारांनी रविंद्र धंगेकर यांना पसंती दिल्याचे दिसत आहे. भाजपचे उमेदवार हेमंत रासने हे नगर सेवक असणाऱ्या शनिवार सदाशिव पेठ मतदार संघातून त्यांना जास्त मते मिळाली असली तरी मोठ्या मतदारांनी रविंद्र धंगेकर यांना पसंती दिली आहे.

कसबा पेठे मतदार संघात शनिवार पेठे - सदाशिव (प्रभाग क्र १५), कसबा पेठ-सोमवार पेठ (प्रभाग १६), रास्ता पेठ-रविवार पेठ (प्रभाग १७) खडकमाळ महात्मा फुले पेठ (प्रभाग १८), लोहिया नगर कासेवाडी (प्रभाग १९), नवी पेठ-पर्वती (प्रभाग २९) अशी या मतदार संघाची रचना आहे. विशेष म्हणजे या चारही प्रभागात भाजपचे नगरसेवक आहेत. असे असतांना देखील त्यांचा उमेदवाराचा पराभव झाला आहे. भाजपचे उमेदवार हेमंत रासने हे सदाशिव आणि शनिवार पेठ मतदार संघातून नगरसेवक असतांना त्यांना २६ हजार मते मिळाली होती. मात्र, या निवडणुकीत रासने यांना २१ हजार ७६३ मते मिळाली. तर रविंद्र धंगेकर यांना १४ हजार ५०० मते मिळाली आहे. त्यामुळे या मताचा फटका रासने यांना बसला आहे.

भाजपला प्रभाग क्रमांक २९ (नवी पेठ-पर्वती) मधून चांगली मते मिळन्याची अपेक्षा होती. या मतदार संघात एकूण १९ हजार ७३ मतदान झाले. यातिल १० हजार १७६ मते ही रविद्र धंगेकर यांना मिळाली. तर रासने यांना केवळ ८ हजार ४९८ मते मिळाली. या मतदार संघात भाजपचे नगर सेवक धीरज घाटे असतांना देखील ते त्यांच्या उमेडवरला या मतदार संघातून मताधिक्य देऊ शकले नाही. उलट दोन हजार कमी मते रासने यांना मिळाली.

कसबा पेठ मतदारसंघाच्या पूर्व भागात रविंद्र धंगेकर यांच्या विरोधात मोठी फौज भाजपने लावली होती. याचा थोडा फटका रविंद्र धंगेकर यांना बसला. रासने यांना या मतदार संघातून १० हजार ७१४ मते मिळाली तर ६ हजार ४४ मते मिळाली. रस्ता पेठ रविवार पेठ प्रभागातून धंगेकर यांना १६ हजार ७१४ तर रासने यांना १० हजार ६३९ मते मिळाली. तर खंडकमाळ महात्मा फुले पेठे मधून धंगेकर यांना १५ हजार ३६० मते मिळाली तर रासने यांना १० हजार ८८० मते मिळाली. लोहिया नगर कासेवाडी येथे देखील धंगेकर यांना ५ हजार ७९३ तर रासने यांना ४४३१ मते मिळाली. या मतांची आकडेवारी पहिली असता भाजपचा गड असलेल्या या मतदार संघात उमेदवारांनी धंगेकर यांना पसंती दिली असल्याचे दिसते. यामुळे मतदारांची भाजपवर असलेली नाराजी दिसून येते.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या