मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  SC to Ajit Pawar : शरद पवारांचा फोटो आणि नाव वापरू नका; सुप्रीम कोर्टाने अजित पवारांना फटकारले!

SC to Ajit Pawar : शरद पवारांचा फोटो आणि नाव वापरू नका; सुप्रीम कोर्टाने अजित पवारांना फटकारले!

Mar 14, 2024, 02:26 PM IST

  • supreme court to Ajit pawar Party : शरद पवार यांनी सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी झाली. यात सुप्रीम कोर्टाने अजित पवार  गटाला खडसावले आहे.

शरद पवारांचा फोटो, नाव वापरू नका! लोकसभेचा प्रचार सुरू होण्याआधीच सुप्रीम कोर्टाने अजित पवारांना फटकारले

supreme court to Ajit pawar Party : शरद पवार यांनी सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी झाली. यात सुप्रीम कोर्टाने अजित पवार गटाला खडसावले आहे.

  • supreme court to Ajit pawar Party : शरद पवार यांनी सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी झाली. यात सुप्रीम कोर्टाने अजित पवार  गटाला खडसावले आहे.

supreme court to Ajit pawar Group : अजित पवार यांच्या बंडामुळे राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये फुट पडली. राष्ट्रवादी कॉँग्रेस विभागली जाऊन अजित पवार गट आणि शरद पवार गट तयार झाले. दरम्यान, निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी हे पक्ष नाव आणि घडयाळ हे चिन्ह अजित पवार गटाला बहाल केले तर शरद पवार गटाला शरदचंद्र पवार राष्ट्रवादी कॉँग्रेसहे नाव देत तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह बहाल केले. या विरोधात शरद पवार गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. अजित पवार गट हा शरद पवार यांचे नाव नाव आणि फोटो वापरत असल्याचा आरोप करण्यात आला होता. यावरून कोर्टाने अजित पवार यांना खडसावले असून शरद पवार यांचे नाव आणि फोटो वापरण्यास मनाई करत फटकारले आहे.  शरद पवार गटासाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Maharashtra Weather Update : कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात अवकाळी पावसाचा तर मुंबई, ठाण्यात उष्णतेचा यलो अलर्ट!

रिक्षाचालकाने भाडे नाकारले, जादा भाडे घेतल्यास करा व्हॉट्सअ‍ॅपवर तक्रार, तातडीने होणार कारवाई

Chiplun Cloudburst Rains: चिपळूणच्या अडरे गावात ढगफुटी! अर्ध्या तासात धडकी भरवणारा पाऊस, मे महिन्यातच नद्यांना पूर

Mumbai Lok sabha : मतदानाच्या पूर्वसंध्येलाच मुंबईत प्रिसायडिंग ऑफिसरचा मृत्यू, होमगार्डला हृदयविकाराचा धक्का

south mumbai lok sabha : ठाकरेंच्या शिवसेनेचा मुंबईतील एकमेव खासदार पाडण्यासाठी भाजपची खेळी; 'ती' जागा मनसेला सोडणार

निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. दरम्यान, या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पाडली. कोर्टात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या बाजूने वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी युक्तिवाद करत शरद पवार यांची बाजू मांडली. मोठा युक्तिवाद करत अजित पवार गट शरद पवार यांचे नाव तसेच फोटो वापरत असल्याचा आरोप सिंघवी यांनी करत यावर आक्षेप नोंदवला. याचा पुरावा अभिषेक मनु सिंघवी यांनी कोर्टात दिला.

viral news : वराला पाहून भडकली वधू! लग्नाला नकार देत केले असे काही की....

सिंघवी म्हणाले, अजित पवार गटाचे हे पोस्टर्सवर न्यायालयाने पहावे. त्यावर शरद पवारांचे फोटो आणि नाव आहे. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीचे नाव आणि चिन्ह दिल्यावर अजित पवार गट शरद पवारांचा फोटो आणि घड्याळ चिन्ह कसे वापरू शकतात असा सवाल करत त्यांना आमचा फोटो, घड्याळ वापरण्याची परवानगी देऊ नये अशी मागणी सिंघवी यांनी कोर्टापुढे केली.

सुप्रीम कोर्टाने याची दाखल घेतली असून अजित पावर गटाला चांगलेच फटकारले. शरद पवार यांचे नाव आणि फोटो वापरता येणार नाही असे म्हणत ते न वापरण्या संदर्भात असं लेखी देण्याचे न्यायालयाने म्हटले आहे. या बाबत तुमच्या कार्यकर्त्यांना सूचना देणीयचे देखील कोर्टाने म्हटले आहे. दरम्यान, या प्रकरणाची पुढील सुनावणी ही १८ मार्च रोजी घेतली जाणार आहे.

पुढील बातम्या