farrukhabad uttar pradesh viral news : लग्न ठरण्याआधी बैठक घेऊन मुलाला आणि मुलीला एकमेकांची माहिती दिली जाते. एकमेकांच्या पसंतीने घरची मंडळी विवाह उरकत असतात. मात्र, उत्तर प्रदेशातील फर्रुखाबाद जिल्ह्यात एका वधूने आपल्या वराला पाहून मोठा गोंधळ घातला. वर पाहून ही वधू चांगलीच भडकली तिने लग्न न करण्याचा निर्णय घेत मंडपातून बाहेर पाडली. यामुळे दोन्ही पक्षात मोठा वाद झाला. अखेर पोलिसांना यात हस्तक्षेप करावा लागला.
उत्तर प्रदेशातील फर्रुखाबाद जिल्ह्यात वराचे वय जास्त असल्याने वधूने लग्न करण्यास नकार दिला. त्यावरून दोन्ही पक्षांमध्ये मोठा वाद झाला. लग्न मंडपात मोठी मारामारी सुरू झाली. यावर वराच्या बाजूच्या लोकांनी ११२ ला या घटनेची माहिती देत पोलिसांना बोलावले. पोलिस पथक मंडपात दाखल झाले. यावेळी घटणस्थळ पाहून पोलीसही चक्रावले. अखेर दोन्ही बाजूच्या लोकांची बाजू त्यांनी ऐकली. त्यांना पोलिसानी समजावून सांगितले. यानंतर हा विवाह पार पडला आणि वधूला निरोप देण्यात आला.
एटा येथील कोतवाली अलीगंज येथे मंगळवारी एका गावात ही घटना घडली. वराची मिरवणूक गावात आली. यावेळी वराचे वय पाहून वधूने त्याच्याशी लग्न करण्यास नकार दिला. एवढ्यावरच हा कार्यक्रम थांबला. लग्नातील काही पाहुण्यांनी काही खाल्ले देखील नव्हते.
वधूने लग्न नकार देताच घरात आणि लग्नाच्या मिरवणुकीत गोंधळ सुरू झाला. दोन्ही पक्षात बाचाबाचीला सुरुवात झाली. वराच्या बाजूच्या लोकांनी पोलीस चौकीला माहिती दिली. तर वधू पक्षानेही पोलिसांना पाचारण केले. वादाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून दोन्ही पक्षांना शांत केले. दोन्ही बाजूंच्या नातेवाईकांनी सल्लामसलत केली . यानंतर वधूची देखील समजूत काढण्यात आली. आणि यानंतर सकाळी लग्नाचे विधी पूर्ण करून वधूला निरोप देण्यात आला. वराने वधूला आपल्या घरी नेले. रात्री नऊ ते पहाटे अडीच वाजेपर्यंत हा गोंधळ सुरू होता. बुधवारी पहाटे तीन वाजता पोलिसांच्या उपस्थितीत वधूला शांत करून निरोप देण्यात आला.