Siddharth Jadhav Viral Video: अभिनेता सिद्धार्थ जाधव हा आपल्या दमदार अभिनयाने मराठीसोबतच हिंदी प्रेक्षकांचे देखील भरपूर मनोरंजन करत आहे. हिंदी चित्रपटांमध्ये झळकल्यानंतर आता सिद्धार्थ जाधव हिंदी प्रेक्षकांचा देखील लाडका झाला आहे. मात्र, नुकताच सिद्धार्थ जाधव याला त्याच्या विमान प्रवासादरम्यान एका अतिशय वाईट अनुभवाला सामोरं जावं लागलं आहे. या विमान प्रवासात नेमकं काय घडलं, हे त्याने व्हिडीओ शेअर करून सांगितलं आहे.