मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Flowers Face Pack: ग्लोइंग स्किनसाठी फुलांपासून बनवा इंस्टंट फेस पॅक, कमी प्रयत्नात मिळेल सुंदर त्वचा

Flowers Face Pack: ग्लोइंग स्किनसाठी फुलांपासून बनवा इंस्टंट फेस पॅक, कमी प्रयत्नात मिळेल सुंदर त्वचा

May 31, 2023, 11:16 AM IST

    • Skin Care with Flowers: चमकदार, बेदाग आणि ग्लोइंग स्किनसाठी तुम्ही तुमच्या स्किन केअर रूटीनमध्ये फुलांचा समावेश करू शकता. फुलांपासून इंस्टंट फेस पॅक कसे बनवायचे ते पाहा.
फुलांपासून इंस्टंट फेस पॅक (pexel)

Skin Care with Flowers: चमकदार, बेदाग आणि ग्लोइंग स्किनसाठी तुम्ही तुमच्या स्किन केअर रूटीनमध्ये फुलांचा समावेश करू शकता. फुलांपासून इंस्टंट फेस पॅक कसे बनवायचे ते पाहा.

    • Skin Care with Flowers: चमकदार, बेदाग आणि ग्लोइंग स्किनसाठी तुम्ही तुमच्या स्किन केअर रूटीनमध्ये फुलांचा समावेश करू शकता. फुलांपासून इंस्टंट फेस पॅक कसे बनवायचे ते पाहा.

Instant Flower Face Pack for Glowing Skin: सुंदर त्वचेसाठी मॉर्निंग आणि नाइट स्किन केअर रुटीन अनेक जण फॉलो करतात. जर तुमची स्किन चांगली आणि हेल्दी असेल तर एक वेगळ्या प्रकारचा कॉन्फिडन्स येतो. तुम्हाला वाटत असेल की अशी चांगली स्किन मिळवण्यासाठी पार्लरमध्ये महागड्या क्लिनअप आणि फेशियल करावे लागेल. तर असे अजिबात नाहीये. तुम्ही हे अगदी तुमच्या बजेट मध्ये आणि कमी मेहनत करून हे मिळवू शकता. तुम्ही तुमच्या स्किन केअर मध्ये फुलांचा समावेश करून ग्लोइंग आणि ब्राइट स्किन मिळवू शकता. चला तर जाणून घेऊया फुलांपासून घरच्या घरी फेस पॅक कसे बनवावे.

ट्रेंडिंग न्यूज

ICMR weight loss Tips : वजन कमी करण्याची योग्य पद्धत कोणती? आयसीएमआरनं दिला 'हा' सुरक्षित वीकली प्लान

Ajwain Water Benefits: ओव्याचे पाणी पिण्याचे ‘हे’ जबरदस्त फायदे तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या...

Tamarind Benefits: केवळ जीभेचे चोचले पुरवत नाही, तर आरोग्यासाठीही लाभदायी आहेत चिंच! ‘असा’ करा वापर

PCOS Problem: मासिक पाळी नियमित आल्यानंतरही असून शकते पीसीओसची समस्या! जाणून घ्या काय आहेत लक्षणं

झेंडू

घराची सजावट असो वा कोणती पूजा, सगळ्यात नेहमी उपयोगी पडणाऱ्या झेंडूच्या फुलांनी तुम्ही फेस पॅक देखील बनवू शकता. हे बनवण्यासाठी झेंडूच्या फुलांच्या पाकळ्या, आवळा पावडर, दही आणि लिंबूचा रस घेऊन नीट मिक्स करून घ्या. त्याची पेस्ट तयार करून घ्या. ही पेस्ट चेहऱ्यावर आणि मानेवर लावून घ्या. साधारण १५ ते २० मिनीटांनंतर चेहरा धुवून घ्या.

गुलाब

स्किन केअरमध्ये फुलांचा विषय निघाला तर सर्वप्रथम गुलाब येतो. याचा फेसपॅक बनवण्यासाठी गुलाबाच्या पाकळ्या, चंदन पावडर आणि दूध घ्या. सर्वप्रथम गुलाबाच्या पाकळ्या काही वेळ पाण्यात उकळून घ्या. असे केल्याने ते बारीक करणए सोपे जाते. गुलाबाच्या पाकळ्या ब्लेंड केल्यानंतर त्यात चंदन पावडर आणि दुध मिक्स करून त्याची पेस्ट बनवून घ्या. ही पेस्ट चेहरा आणि मानेवर अप्लाय करा. काही वेळाने हा पॅक सुकल्यानंतर कोमट पाण्याने धुवून घ्या. हा तुम्हाला फ्लोलेस लूक देण्यासोबतच ऑइली स्किनमधून एक्स्ट्रा ऑइल काढण्यास मदत करतो.

चमेली

आपल्या सुंगधाने सगळ्यांचे मन प्रसन्न करणाऱ्या चमेलीच्या फुलांचा वापर फेसपॅक बनवण्यासाठी करता येतो. ते बनवण्यासाठी फुलांच्या पाकळ्या नीट मॅश करा. नंतर त्यात दही आणि साखर मिक्स करा. ही पेस्ट स्वच्छ चेहऱ्यावर लावा आणि १५ मिनिटांनी चेहरा स्वच्छ धुवून घ्या.

लॅव्हेंडर

लॅव्हेंडरच्या फुलाचा रंग प्रत्येकाला आकर्षित करतो. या फुलांच्या पाकळ्यांमध्ये ओट्स मिक्स करून ते वापरता येते. यासाठी पाकळ्या उकळून घ्या आणि ब्लेंड करून घ्या. आता त्यात ओट्स टाकून ते सुद्धा ब्लेंड करून घ्या. हे तयार झालेली पेस्ट चेहऱ्यावर आणि मानेवर लावा. काही वेळाने पाण्याने धुवून घ्या.

जास्वंद

सौंदर्य वाढवण्यासाठी हिबिस्कस म्हणजेच जास्वंदाच्या फुलाचा खूप उपयोग होतो. हा पॅक बनवण्यासाठी जास्वंदाचे फूल, गुलाब, दही आणि मुलतानी माती एकत्र करून पेस्ट तयार करा. नंतर चेहऱ्यावर लावा. ५ मिनिटांनंतर चेहर्‍याला सर्कुलर मोशनमध्ये मसाज करा आणि नंतर चेहरा धुवा.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

विभाग

पुढील बातम्या