मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Yoga Mantra: कंबर आणि खालच्या भागात लवचिकता निर्माण करण्यासाठी करा हे ३ हिप फ्लेक्सर योगासन

Yoga Mantra: कंबर आणि खालच्या भागात लवचिकता निर्माण करण्यासाठी करा हे ३ हिप फ्लेक्सर योगासन

Mar 04, 2023, 08:29 AM IST

    • हिप फ्लेक्सरमधील वाढता कडकपणा दूर करण्यासाठी आणि शरीरात लवचिकता आणण्यासाठी योगाभ्यास खूप फायदेशीर आहे. या ३ हिप फ्लेक्सर्स योगासनांचा तुम्ही नियमित सराव करु शकता.
नौकासन (HT)

हिप फ्लेक्सरमधील वाढता कडकपणा दूर करण्यासाठी आणि शरीरात लवचिकता आणण्यासाठी योगाभ्यास खूप फायदेशीर आहे. या ३ हिप फ्लेक्सर्स योगासनांचा तुम्ही नियमित सराव करु शकता.

    • हिप फ्लेक्सरमधील वाढता कडकपणा दूर करण्यासाठी आणि शरीरात लवचिकता आणण्यासाठी योगाभ्यास खूप फायदेशीर आहे. या ३ हिप फ्लेक्सर्स योगासनांचा तुम्ही नियमित सराव करु शकता.

Yoga Poses for Tight Hip Flexors: जर तुमच्या दिवसातील बहुतांश वेळ ऑफिसच्या खुर्चीवर बसून काम करण्यात जात असेल तर हिप फ्लेक्सर वेदना आणि ताण ही एक सामान्य समस्या आहे. बराच वेळ बसल्याने हिप फ्लेक्सर्समध्ये कडकपणा आणि वेदना होऊ शकतात. त्यामुळे हळूहळू संपूर्ण शरीर थकल्यासारखे वाटू लागते. त्यामुळे हिप एरियाच्या स्नायूंवर परिणाम होतो आणि हालचाल करताना त्रास जाणवू लागतो. जाणून घेऊया, नितंबांचे असे काही व्यायाम ज्यामुळे तुमचे शरीर लवचिक होईल. यासोबतच लोअर बॅक शोल्डरमध्ये येणारा घट्टपणाही निघून जाईल.

ट्रेंडिंग न्यूज

Sandalwood Face Pack: उन्हाळ्यात घामोळ्या आणि पिंपल्सपासून आराम देईल चंदन, पाहा कसा बनवायचा फेस पॅक

Yoga Mantra: उन्हाळ्यात तुमचे शरीर थंड ठेवतील ही ३ योगासनं, जाणून घ्या फायदे आणि करण्याची योग्य पद्धत

Kedarnath Yatra: केदारनाथच्या आजूबाजूला आहेत ही सुंदर ठिकाणं, ती पाहिल्याशिवाय अपूर्ण राहील ट्रीप

Onion Pickle: जेवणासोबत सर्व्ह करा टेस्टी कांद्याचे लोणचे, प्रत्येक जण विचारेल रेसिपी

हिप फ्लेक्सर आपल्याला चालणे, व्यायाम आणि स्क्वॅट करण्यास मदत करते. जर तुम्ही उठण्या-बसण्याचे तंत्र बदलले नाही तर तुमचे शरीर अनेक आजारांना बळी पडू शकते. वास्तविक, हिप फ्लेक्सर्स हे असे स्नायू आहेत, जे आपल्या धडाला लोअर बॉडीशी जोडण्याचे काम करतात.

या ३ योगासनांचा सराव करून वाढवा हिप्स फ्लेक्सर्समध्ये लवचिकता

१. नौकासन

ही एक अशी मुद्रा आहे, जी तुम्हाला सरळ उभे राहण्यास मदत करते. याशिवाय पोटाचे स्नायू मजबूत होतात. यासाठी सर्वप्रथम दंडासनात बसावे. त्यानंतर श्वास घेताना पाठीचा कणा सरळ करा. आता दोन्ही पाय हवेत पुढे करा आणि दोन्ही हात गुडघ्याजवळ आणा. तुम्ही हे दोन ते तीन वेळा पुन्हा करा. आपण हे नियमितपणे केल्यास धावणे किंवा रॉक क्लाइंबिंगसारखे इतर अॅक्टिव्हिटी सहज करू शकता. या आसनामुळे सांधे, कंबर तसेच पाठीच्या खालच्या भागाच्या स्नायूंनाही फायदा होतो. हे नियमित केल्याने तणावापासून आराम मिळतो. पचनसंस्थेला ताकद मिळते.

२. धनुरासन

हे शरीराच्या मागच्या आणि पुढच्या भागाला ताणून ठेवणारे आसन आहे. पाठीच्या समस्यांशिवाय पचनाचे विकारही या आसनाने दूर होतात. हे आसन करण्यासाठी सर्वप्रथम मकरासनमध्ये म्हणजेच पोटावर झोपावे. त्यानंतर हात शरीराला चिकटवा. आता दोन्ही पाय मागून वरच्या बाजूला न्या. गुडघे वाकवताना हात मागे ताणा. आता उजव्या हाताने उजवा पाय ओढा आणि डाव्या हाताने डावा पाय ओढण्याचा प्रयत्न करा. या आसनात तुमचे संपूर्ण शरीर ताणलेले दिसते. या योगामुळे मानसिक तणाव दूर होण्यास मदत होते. असे नियमित केल्याने भूक न लागण्याची समस्या दूर होते. हे पाय आणि हातांमध्ये साठलेली अतिरिक्त चरबी काढून टाकते. महिलांना मासिक पाळी दरम्यान पोटदुखीच्या समस्येपासूनही आराम मिळतो. या योगाने रक्ताभिसरण नियमित होते.

३. मंडुकासन

हे आसन प्रामुख्याने पोट आणि त्याच्या खालच्या भागावर परिणाम करते. असे केल्याने लठ्ठपणाची समस्या दूर होते. यासोबतच मधुमेहाची समस्याही टाळता येते. पोटातील चरबीची समस्या दूर होते. या योगाच्या मदतीने तुम्ही हिप, कंबर आणि सांधेदुखीच्या समस्येपासून मुक्त होऊ शकता. तणाव दूर होतो आणि मन शांत राहू लागते. अॅसिडिटीच्या समस्येपासून आराम मिळतो. मंडुकासनमुळे हृदयरोग्यांना फायदा होतो. हे आसन करण्यासाठी सर्व प्रथम वज्रासनात बसावे. त्यानंतर दीर्घ श्वास घेताना दोन्ही हातांच्या मुठी करा आणि अंगठे आतून वळवा. आता पुढे वाकून छाती बाजूला ठेवा आणि मांड्यांवर टेका घ्या. यानंतर श्वास घ्या आणि सोडा. ही प्रक्रिया ४ ते ५ मिनिटे करा.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

विभाग

पुढील बातम्या