मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Married Life: वैवाहिक जीवनात येणाऱ्या या समस्या बिघडवू शकतात तुमचे नाते

Married Life: वैवाहिक जीवनात येणाऱ्या या समस्या बिघडवू शकतात तुमचे नाते

Apr 10, 2023, 09:42 PM IST

    • Relationship Tips: नवरा बायकोचे नाते कितीही चांगले दिसत असले तरी काही काळानंतर त्यात मतभेद, वाद निर्माण होतात. हे वाद तुमचे नाते बिघडवू शकतात. जाणून घ्या याबाबत सविस्तर.
वैवाहिक जीवनात येणाऱ्या समस्या

Relationship Tips: नवरा बायकोचे नाते कितीही चांगले दिसत असले तरी काही काळानंतर त्यात मतभेद, वाद निर्माण होतात. हे वाद तुमचे नाते बिघडवू शकतात. जाणून घ्या याबाबत सविस्तर.

    • Relationship Tips: नवरा बायकोचे नाते कितीही चांगले दिसत असले तरी काही काळानंतर त्यात मतभेद, वाद निर्माण होतात. हे वाद तुमचे नाते बिघडवू शकतात. जाणून घ्या याबाबत सविस्तर.

Problems in Married Life: नवरा- बायकोचे नाते खूप नाजूक असते. हल्लीचे रिलेशन पाहिले तर कधी कधी एखादी छोटीशी गोष्ट खूप मोठी होते, ज्यामुळे कपल्समध्ये भांडण सुरू होते. कधी कधी नात्यातील समस्या एवढ्या वाढतात की त्यामुळे नाते देखील तुटते. तुमच्या रिलेशनमध्ये सुद्धा असे काही समस्या असतील तर आजच काळजी घ्या आणि वेळेत सोडवा.

ट्रेंडिंग न्यूज

World Telecommunication Day 2024: जागतिक दूरसंचार दिवस साजरा करण्याचा उद्देश काय? काय आहे यावर्षीची थीम?

joke of the day : मूडमध्ये असलेल्या नवऱ्यानं बनवलेल्या जेवणाला बायकोनं कशी दाद दिली पाहाच!

National Endangered Species Day 2024: राष्ट्रीय लुप्तप्राय प्रजाती दिन साजरा करण्याचा इतिहास काय आहे? जाणून घ्या या दिवस

World Hypertension Day 2024: का साजरा केला जातो वर्ल्ड हायपरटेन्शन डे? जाणून घ्या इतिहास आणि यावर्षीची थीम

तणाव सहन करण्याची क्षमता

नात्यामध्ये कधी कधी असे वळण येते की तुम्हाला कळतच नाही की आता पुढे काय होणार आहे. अशा वेळी ज्या लोकांमध्ये तणाव सहन करण्याची क्षमता नसते ते लोक या सिच्युएशनपासून पळू लागतात. हे सुद्धा नाते खराब करण्याचे कारण होऊ शकते.

असुरक्षित असणे

जर तुमचा पार्टनर तुम्हाला तुमच्या गोष्टी करण्यापासून थांबवत असेल तर त्याला तुमच्यासोबत असुरक्षितता वाटू शकते. कधीकधी असे घडते जेव्हा पार्टनरचा तुमच्यावर विश्वास कमी असतो. तसेच कधी कधी हे यामुळे सुद्धा होऊ शकते जेव्हा तुमच्या पार्टनरला असे वाटू लागते की तुमचे ध्येय तुम्हाला खूप यशस्वी करेल की तो तुम्हाला इतके पुढे पाहू शकत नाही.

कुटूंबाच्या गरजा पूर्ण करण्यात अयशस्वी

लग्न तुमच्यावर अनेक जबाबदाऱ्या घेऊन येते. आणि जर तुम्ही या जबाबदाऱ्या पूर्ण करू शकले नाही तर कपल्समध्ये भांडणे होऊ लागतात.

वेळेची कमतरता

नवरा असो वा बायको दोघांनाही आपल्या पार्टनरच्या वेळेची गरज असते. पण अनेक वेळा तुम्ही दोघे एवढे बिझी असता की आउटिंगला जाणे किंवा फिरायला जाण्यासाठी एकत्र वेळ घालवू शकत नाही. अशावेळी कपल्स नात्यातील स्पार्क मिस करू लागतात.

रिस्पेक्टची कमतरता

प्रत्येकाला त्याचा आदर, मान देणे गरजेचे असते. प्रत्येकाला वाटते की ते आपल्याला मिळायला हवे. पण अनेक वेळा दुसऱ्याला सन्मान देण्यात कुठेतरी आपण मागे राहतो.

इतर लोकांचा हस्तक्षेप

बऱ्याच वेळा वैवाहिक जीवन तेव्हा खराब होते जेव्हा तिसरा व्यक्ती त्यात हस्तक्षेप करु लागतो. हे लोक कोणी पण असू शकतात, नातेवाईक, मित्र किंवा तुमच्या जवळपास राहणारे लोक. ते तुम्हाला खूप सल्ले देतील आणि तुमच्याशी लॉयल असल्याप्रमाणे वागतील. पण तुम्हाला हे लक्षात ठेवावे लागेल की हेच लोक तुमचे नाते खराब करू शकतात. त्यामुळे लक्षात ठेवा की, तुमच्या आजूबाजूच्या लोकांशी तुमच्या नात्याविषयी चर्चा करण्याऐवजी एखाद्या काउंसलर कडे जा.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

विभाग

पुढील बातम्या