मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Yoga Mantra: रोज 'या' योगासनांचा सराव केल्याने थायरॉईडची समस्या होईल दूर

Yoga Mantra: रोज 'या' योगासनांचा सराव केल्याने थायरॉईडची समस्या होईल दूर

Feb 27, 2024, 08:22 AM IST

    • Thyroid Problem: थायरॉईडची समस्या असेल तर त्यामुळे इतर अनेक आरोग्य समस्या निर्माण होतात. थायरॉईडची समस्या दूर करण्यासाठी तुम्ही काही योगासन रोज केली पाहिजे.
सर्वांगासन

Thyroid Problem: थायरॉईडची समस्या असेल तर त्यामुळे इतर अनेक आरोग्य समस्या निर्माण होतात. थायरॉईडची समस्या दूर करण्यासाठी तुम्ही काही योगासन रोज केली पाहिजे.

    • Thyroid Problem: थायरॉईडची समस्या असेल तर त्यामुळे इतर अनेक आरोग्य समस्या निर्माण होतात. थायरॉईडची समस्या दूर करण्यासाठी तुम्ही काही योगासन रोज केली पाहिजे.

Yoga Poses to Cure Thyroid Problem: थायरॉईडची समस्या महिलांमध्ये अधिक पाहायला मिळते. थायरॉईडची समस्या असेल तर त्यामुळे शरीराचे वजन अचानक वाढू लागते आणि सुस्ती, थकवा, केस गळणे अशी लक्षणे दिसू लागतात. थायरॉईडची समस्या असल्यास हेल्दी लाइफस्टाईल फॉलो करणे महत्वाचे आहे. या योगासनांचा दररोज सराव केल्यास थायरॉईडच नव्हे तर इतर आजारांपासूनही आराम मिळतो.

ट्रेंडिंग न्यूज

Kedarnath Yatra: केदारनाथच्या आजूबाजूला आहेत ही सुंदर ठिकाणं, ती पाहिल्याशिवाय अपूर्ण राहील ट्रीप

Onion Pickle: जेवणासोबत सर्व्ह करा टेस्टी कांद्याचे लोणचे, प्रत्येक जण विचारेल रेसिपी

High Blood Pressure: अनियंत्रित रक्तदाबामुळे होऊ शकतात या समस्या, वेळीच घ्या काळजी

Health Tips: तेल वारंवार गरम केल्याने वाढतो कर्करोगाचा धोका, आयसीएमआरचा इशारा, किती दिवस जुने तेल वापरता येते?

कपालभाती

कपालभाती हा अतिशय फायदेशीर योग आहे. हे केल्याने रोगप्रतिकार शक्ती तर वाढतेच पण पोटाचे स्नायूही मजबूत होतात. त्याचबरोबर शरीरातील सर्व अशुद्ध घटक बाहेर पडतात आणि थायरॉईडपासून मुक्त होण्यास मदत होते.

उज्जायी

यामध्ये श्वासावर लक्ष केंद्रित केले जाते. उज्जयी प्राणायाम करण्यासाठी सर्वप्रथम श्वास घशात भरून ओमचा जप करावा. अशा प्रकारे थायरॉईड ग्रंथीला विश्रांती मिळते आणि ती सुरळीतपणे कार्य करण्यास मदत करते. हे दररोज ८-१२ वेळा करता येते. सुरुवातीला तुम्ही ते कमी वेळा करण्याचा प्रयत्न करा.

भ्रस्त्रिका प्राणायाम

भ्रस्त्रिका प्राणायाम करण्याचे तीन मार्ग आहेत. या तीन प्रकारे हळूहळू सराव करण्याचा प्रयत्न करा. सर्वप्रथम द्रुत श्वास घ्या आणि श्वास सोडा. त्यानंतर सुमारे अडीच सेकंद श्वास घ्या आणि अडीच सेकंद धरून ठेवा. मग श्वास सोडा. अडीच सेकंद श्वास रोखून ठेवण्याचा सराव झाल्यावर साधारण पाच सेकंद श्वास घ्या आणि पाच सेकंद श्वास रोखून धरा. हे आसन सतत पाच मिनिटे करता येते.

सर्वांगासन

हे आसन केल्याने थायरॉईड ग्रंथीवर दबाव येतो आणि ती व्यवस्थित काम करू लागते. तसेच हे आसन केल्याने मज्जासंस्था देखील व्यवस्थित काम करते. ज्यामुळे पिट्यूटरी ग्रंथी आणि पाइनल ग्रंथी थायरॉईड ग्रंथींवर योग्य नियंत्रण ठेवतात आणि थायरॉईडची समस्या कमी होते.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

विभाग

पुढील बातम्या