मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Yoga Mantra: पोटाची चरबी कमी करण्यासाठी प्रभावी आहेत ही योगासनं, नियमित सराव केल्याने मिळेल फायदा

Yoga Mantra: पोटाची चरबी कमी करण्यासाठी प्रभावी आहेत ही योगासनं, नियमित सराव केल्याने मिळेल फायदा

Hiral Shriram Gawande HT Marathi
Feb 26, 2024 08:12 AM IST

Yoga For Belly Fat: वाढलेल्या वजनाप्रमाणेच पोटावर जमा झालेली चरबी सुद्धा कमी करणे अवघड असते. पण हे काही योगासन यासाठी प्रभावी आहेत. यांचा नियमित सराव करावा.

त्रिकोनासन
त्रिकोनासन

Yogasana to Reduce Belly Fat: आपल्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य्साठी योगासन प्रभावी आहेत. तसेच ते वजन कमी करण्यासाठी आणि पोटावर जमा झालेली हट्टी चरबी कमी करण्यासाठी सुद्धा प्रभावीपणे काम करते. अशी अनेक योगासने आहेत जे तुम्ही बेली फॅट कमी करण्यासाठी करू शकता. विशेष म्हणजे ही सर्व आसने तुम्ही उभे राहून करू शकता. चला तर मग जाणून घ्या पोटाची चरबी कमी करण्यासाठी कोणते योगासन करावे.

त्रिकोनासन

त्रिकोनासन हे अगदी सुरुवातीच्या लेव्हलसाठी अतिशय सोपे आसन आहे. हे आसन विन्यास शैलीचे आसन मानले जाते. हे करण्याचा कालावधी ३० सेकंदांचा आहे. याची पुनरावृत्ती एका पायाने दररोज ३-५ वेळा करता येते. त्रिकोनासनाच्या सततच्या सरावाने घोटे, मांड्या आणि गुडघे मजबूत होतात.

तिर्यक ताडासन

बद्धकोष्ठता, कंबरे जवळ जमा झालेली चरबी आणि शरीर लवचिक बनवण्यासाठी तुम्ही तिर्यक ताडासनाचा सराव करू शकता. कधी कधी आतड्यांच्या कमकुवतपणामुळे शरीरातून घन मल बाहेर पडणे कठीण होते. त्यामुळे शरीरात विषारी पदार्थ जमा होऊ लागतात. पचनसंस्था बिघडते. त्यामुळे बद्धकोष्ठता निर्माण होते. तिर्यक ताडासनामुळे या समस्यांपासून आराम मिळतो.

पादहस्तासन

या आसनाचा सराव करताना डोके हृदयाच्या खाली असते. त्यामुळे रक्ताचा प्रवाह पायात न राहता डोक्याकडे सुरू होतो. त्यामुळे मेंदूपर्यंत लक्षणीय प्रमाणात रक्त आणि ऑक्सिजन पोहोचू लागते.

प्रसरिता पादोत्तानासन

प्रसरिता पादोत्तानासन हे योग विज्ञानाच्या विन्यास शैलीचे योगासन आहे. हे करण्यासाठी वेळ ३० ते ६० सेकंद असावे. या आसनाचा नियमित सराव केल्याने पाठीमागचा भाग आणि हॅमस्ट्रिंग्स मजबूत होतात. तर बरगड्या आणि पायांना चांगला ताण येतो.

कोनासन

कोनासन केल्याने रक्तप्रवाह सुधारतो. पाठीचा कणा लवचिक होतो. कफ निघून जातो. चेहरा तेजस्वी होतो, शरीर चपळ होते आणि पायांचे स्नायू बळकट होतात. फुफ्फुसे मजबूत होतात.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel

विभाग