मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Yoga Mantra: प्रेग्नेंट महिलांनी करावे हे योगासन, आईसोबत गर्भातील बाळही राहील फिट

Yoga Mantra: प्रेग्नेंट महिलांनी करावे हे योगासन, आईसोबत गर्भातील बाळही राहील फिट

Hiral Shriram Gawande HT Marathi
Feb 25, 2024 08:18 AM IST

Yoga for Mother and Baby: गर्भवती महिला तंदुरुस्त राहण्यासाठी काही योगासन करू शकतात. आई आणि बाळासाठी उत्तम असलेले योगासन जाणून घ्या.

प्रेग्नेंसी मध्ये करता येणारे योगासन
प्रेग्नेंसी मध्ये करता येणारे योगासन

Yoga Poses For Pregnant Woman: प्रेग्नेंसीच्या काळात महिलांना आपल्या आरोग्याची खूप काळजी घ्यावी लागते. या काळात आईच्या शरीरात अनेक बदल होत असतात. त्याचा त्यांच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यावर परिणाम होत असतो. गर्भधारणेदरम्या येणाऱ्या समस्यांना सामोरे जाण्यासाठी योग उत्तम आहे. योगासन मानसिक, भावनिक आणि आध्यात्मिक कल्याणाच्या सर्व पैलूंशी संबंधित आहे. गर्भधारणे दरम्यान योगासन हा केवळ सुरक्षित मानले जात नाही तर व्यायामाचा एक प्रकार सुद्धा मानला जातो. काही योगासन हे करु शकता. हे फक्त प्रेग्नेंट महिलांसाठी नाही तर गर्भातील बाळासाठी सुद्धा फायदेशीर आहेत.

बद्धकोणासन

हे आसन करण्यासाठी दंडासनाने सुरुवात करा. त्यानंतर पाय दुमडताना पायाचे तळवे एकत्र जोडून घ्या. तुमची टाच तुमच्या श्रोणीच्या दिशेनेवर उचला. हळू हळू गुडघे खाली करा. आपल्या पोटातून हवा बाहेर काढा. नंतर ही स्थिती १५ ते २० सेकंद धरून ठेवा. हे ३ किंवा त्यापेक्षा अधिक वेळा करा.

बालासन

हे आसन करण्यासाठी चटईवर गुडघे टेकून आणि टाचांवर बसा. श्वास घ्या आणि डोक्याच्या वर हात वर करा. श्वास सोडा आणि तुमचे तळवे जमिनीवर ठेवून तुमचे वरचे शरीर पुढे वाकवा. श्रोणी टाचांवर आरामात असावी. काळजी घ्या की तुमची पाठ वाकलेली नाहीये. तुम्ही तुमच्या गुडघ्याखाली घोंगडी किंवा उशी ठेवू शकता.

ताडासन

हे आसन करण्यासाठी तुमच्या टाचांवर बसा आणि तुमचे गुडघे आरामदायी अंतरावर पसरवा. श्वास घेताना, आपले हात आपल्या डोक्यावर वर करा. श्वास सोडताना, तुमचे तळवे जमिनीवर ठेवा आणि तुमचे वरचे शरीर पुढे वाकवा. टाचांना ओटीपोटाचा आधार द्या. आपल्या नितंब किंवा गुडघ्याखाली एक घोंगडी किंवा ब्लँकेट ठेवू शकता.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel

विभाग