Yoga Asana for Sound Sleep: बऱ्याच लोकांना निद्रानाशाची समस्या असते. तर काही लोकांची झोप ही गाढ नसते, मध्ये मध्ये त्यांना जाग येतो. रात्रीची झोप नीट झाली नाही तर दुसऱ्या दिवशीची सुरुवात चांगली होत नाही. तुम्हाला रात्री चांगली झोप हवी असेल तर आरामदायी स्थितीत झोपणे महत्त्वाचे आहे, जे तुमच्या स्लीप सायकल मध्ये मदत करते आणि शरीराला रिलॅक्स स्थितीत ठेवते. रात्री शांत झोप लागावी यासाठी तुम्ही काही योगासन करू शकता. या योगासनांचा नियमित सराव केल्याने तुम्हाला शांत झोप लागेल.
पहिल्या पद्धतीत पद्मासन सारख्या ध्यानाच्या आसनात बसा आणि पाठ सरळ ठेवा. तुमच्या अंगठ्याच्या आणि अनामिकेच्या टिपांना एकमेकांना स्पर्श करा. आपल्या उर्वरित बोटांना सरळ ठेवा. हे दोन्ही हातांनी करा आणि हात गुडघ्यावर ठेवा. आपले डोळे बंद करा आणि लक्ष आपल्या श्वासावर केंद्रित करा. तुम्ही सकाळी एकदा आणि झोपण्यापूर्वी एकदा याचा सराव करू शकता.
दुसरी पद्धत करण्यासाठी प्रथम आपल्या पाठीवर झोपा. आपले हात पसरवा. तुमचे तळवे वरच्या दिशेला ठेवा. दीर्घ श्वास घ्या आणि फुफ्फुसे हवेने भरा. तुम्ही श्वास सोडत असताना तुमच्या घशातून मधमाशीसारखा आवाज करा. याला बी ब्रीथ असेही म्हणतात.
तिसरा प्रकार करण्यासाठी अर्ध-स्क्वॅट स्थितीत बसा. कोणतेही आसन किंवा व्यायामाची पहिली अट म्हणजे आराम आहे. हे आसन करण्यासाठी बेडवर आरामदायी स्थितीत बसा. तुम्ही तुमचे डोळे बंद करू शकता. जेणेकरून तुम्ही अधिक लक्ष केंद्रित करू शकाल. अंगठा आणि करंगळी एकत्र जोडून ध्यान करा.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)