मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Navratri Falahar Recipe: नवरात्रीच्या उपवासात बनवा शिंगाड्याची बर्फी, नोट करा रेसिपी

Navratri Falahar Recipe: नवरात्रीच्या उपवासात बनवा शिंगाड्याची बर्फी, नोट करा रेसिपी

Apr 09, 2024, 05:38 PM IST

    • Chaitra Navratri Fasting: नवरात्रीमध्ये दुर्गा देवीच्या नैवेद्यासोबतच उपवासाच्या वेळी खाण्यासाठी फराळी बर्फी सहज बनवता येते. शिंगाड्याच्या पीठाची बर्फी कशी बनवायची ते जाणून घ्या.
Navratri Falahar Recipe: नवरात्रीच्या उपवासात बनवा शिंगाड्याची बर्फी, नोट करा रेसिपी

Chaitra Navratri Fasting: नवरात्रीमध्ये दुर्गा देवीच्या नैवेद्यासोबतच उपवासाच्या वेळी खाण्यासाठी फराळी बर्फी सहज बनवता येते. शिंगाड्याच्या पीठाची बर्फी कशी बनवायची ते जाणून घ्या.

    • Chaitra Navratri Fasting: नवरात्रीमध्ये दुर्गा देवीच्या नैवेद्यासोबतच उपवासाच्या वेळी खाण्यासाठी फराळी बर्फी सहज बनवता येते. शिंगाड्याच्या पीठाची बर्फी कशी बनवायची ते जाणून घ्या.

Singhara Barfi Recipe: चैत्र नवरात्रीत दुर्गा देवीच्या उपासनेसोबतच उपवास करण्याचाही नियम आहे. अनेक भाविक संपूर्ण ९ दिवस उपवास करतात. तर काही लोकांना पहिल्या दिवशी आणि अष्टमीचा उपवास करणे आवडते. नवरात्रीच्या  उपवासाच्या दिवशी मातेला नैवेद्य अर्पण करण्याबरोबरच उपवासासाठी फराळी बर्फी बनवायची असेल, तर शिंगाड्याच्या पीठापासून टेस्टी बर्फी तयार करा. ही बर्फी खायला टेस्टी आणि बनवायला सोपी आहे. जाणून घ्या याची सोपी रेसिपी.

ट्रेंडिंग न्यूज

World Telecommunication Day 2024: जागतिक दूरसंचार दिवस साजरा करण्याचा उद्देश काय? काय आहे यावर्षीची थीम?

joke of the day : मूडमध्ये असलेल्या नवऱ्यानं बनवलेल्या जेवणाला बायकोनं कशी दाद दिली पाहाच!

National Endangered Species Day 2024: राष्ट्रीय लुप्तप्राय प्रजाती दिन साजरा करण्याचा इतिहास काय आहे? जाणून घ्या या दिवस

World Hypertension Day 2024: का साजरा केला जातो वर्ल्ड हायपरटेन्शन डे? जाणून घ्या इतिहास आणि यावर्षीची थीम

शिंगाड्याच्या पीठाची बर्फी बनवण्यासाठी साहित्य

- एक कप शिंगाड्याचे पीठ

- देशी तूप ८० ग्रॅम

- अर्धा कप किसलेले खोबरं

- अर्धा लिटर दूध

- ३/४ कप साखर

- ४ छोटी वेलची

- बदाम, काजू, अक्रोड, किशमिश बारीक चिरून

शिंगाड्याच्या पीठाची बर्फी बनवण्याची पद्धत

सर्वप्रथम कढईत ३-४ चमचे देशी तूप घालून गरम करा. तूप गरम झाल्यावर त्यात शिंगाड्याचे पीठ घालून मंद आचेवर भाजून घ्या. तूप कमी असल्यास जास्त घालावे. शिंगाड्याचे पीठ चांगले भाजून होईपर्यंत नीट भाजा. पीठ भाजण्यासोबत किसलेले खोबरं घाला. एक मिनिट परतून झाल्यावर त्यात बदाम आणि ड्रायफ्रुट्स पावडर टाकून भाजून घ्या. गॅस बंद करा आणि एका प्लेटमध्ये पीठ काढा. त्याच पॅनमध्ये अर्धा लिटर फुल क्रीम दूध घालून घट्ट होईपर्यंत शिजवा. दूध घट्ट होऊ लागले की साखर घाला. साखर विरघळल्यानंतर त्यात पीठ घाला. मंद आचेवर मिक्स करून घट्ट करा. थोडी जाडसर बारीक केलेली वेलची घालून मिक्स करा. मिश्रण घट्ट झाल्यावर गॅस बंद करा. 

एका ट्रेला तुपाने ग्रीस करून हे मिश्रण त्यात पसरवा. वरून ड्रायफ्रूटचे तुकडे टाका आणि थंड होऊ द्या. दोन तासांत ते नीट गोठल्यावर हव्या त्या आकारात कापून घ्या. 

तुमची फराळी शिंगाड्याची बर्फी तयार आहे. देवीला नैवेद्याला अर्पण करा आणि सर्वांना खायला द्या.

पुढील बातम्या