Poha and Rava Steamed Vada Recipe: सकाळचा नाश्ता सगळ्यांना टेस्टी आणि चटपटीत हवा असतो. जर तुम्ही तुमच्या आरोग्याबाबत काळजी घेत असाल आणि काही हेल्दी फूड खायचे असेल तर रवा आणि पोह्यांपासून बनवलेला हा टेस्टी नाश्ता तयार करू शकता. विशेष म्हणजे पोहे आणि रव्यापासून हे वडे बनवण्यासाठी तुम्हाला तेलाची आवश्यकता नाही. तुम्ही ते वाफवून सहज बनवू शकता. चला तर मग जाणून घ्या, पोहे आणि रव्यापासून टेस्टी वडे कसे बनवायचे.
- एक वाटी पोहे किंवा चिवडा
- अर्धी वाटी रवा
- अर्धी वाटी दही
- बारीक चिरलेली कोथिंबीर
- बारीक चिरलेली हिरवी मिरची
- कढीपत्ता
- गरम मसाला
- काश्मिरी लाल मिरची
- हळद
- जिरे पावडर
- तेल
- मोहरी
- पाणी
- मीठ चवीनुसार
सर्वप्रथम पोहे किंवा चिवडा नीट धुवून घ्या. मग ते मिक्सरच्या भांड्यात टाका. त्यात रवा आणि दही घालून बारीक करा. या पेस्टमध्ये कढीपत्ता आणि मीठ मिक्स करा. आता या पेस्टमध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर, हिरवी मिरची आणि लाल तिखट घाला. हे सर्व चांगले मिक्स करा. आता स्टीमरमध्ये छिद्रे असलेल्या प्लेटला तेलाने ग्रीस करा. हाताला तेल लावून तयार पेस्टला गोल आकार द्या. बोटाच्या किंवा एखाद्या काडीच्या मदतीने मध्यभागी एक छिद्र करा. वड्याला आकार द्या आणि स्टीमर प्लेटवर ठेवा. आता झाकण ठेवून शिजवा. वाफवल्यानंतर हे वडे ताटात काढा. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही हे वडे असेच चटणीसोबत खाऊ शकता. किंवा याला तडका देण्यासाठी कढईत तेल गरम करा. तेल गरम झाल्यावर जिरे तडतडून घ्या. तसेच मोहरी, हिरवी मिरची आणि लसूण घाला. हे नीट भाजल्यावर त्यात कांदा घालून परता. कांदा परतून झाल्यावर त्यात बारीक चिरलेला टोमॅटो घाला.
नंतर गरम मसाला, धनेपूड, काश्मिरी लाल तिखट घालून परतून घ्या. थोडे दही मिक्स करा. आता त्यात सर्व तयार केलेले वडे टाका आणि मंद आचेवर भाजून घ्या. तुमचे टेस्टी वडे तयार आहे.