Coriander Leaves Bharta Recipe: तुम्ही कोथिंबीर पदार्थ गार्निश करण्यासाठी, चटणीसाठी बऱ्याचदा वापरली असेल. पण तुम्ही कोथिंबिरीच्या पानापासून बनवलेला भरीत कधी चाखला आहे का? कोथिंबिरीच्या पानापासून भरीत कसे काय बनवता येते हे ऐकून अनेकांना आश्चर्य वाटेल. पण बंगालची ही प्रसिद्ध डिश खायला खूप चविष्ट आहे. बंगालमध्ये ही डिश धोने पाता बाता म्हणून ओळखली जाते. तिथले लोक ही डिश भातासोबत सर्व्ह करतात. चला तर मग, जाणून घ्या बंगालची स्पेशल डिश कोथिंबीरचे भरीत कसे बनवायचे.
- १-२ जुळी ताजी कोथिंबीर
- ४-५ पाकळ्या लसूण
- ३-४ हिरव्या मिरच्या
- १ चमचा कलौंजी
- १-२ संपूर्ण लाल मिरच्या
- १-२ चमचे मोहरीचे तेल
- मीठ चवीनुसार
कोथिंबीरचे भरीत बनवण्यासाठी प्रथम कोथिंबीर, लसूण आणि हिरवी मिरची स्वच्छ करून मिक्सरमध्ये टाकून बारीक मऊ पेस्ट तयार करा. यानंतर कढईत तेल गरम करून त्यात कलौंजी आणि लाल मिरची टाका. आता कढईत कोथिंबीरीची पेस्ट टाका आणि ते पूर्ण सुकेपर्यंत शिजवा. कोथिंबीरीचा कच्चा वास निघून जाईल याची काळजी.
तुमचे चविष्ट कोथिंबीरचे भरीत तयार आहे. गरमागरम भातासोबत सर्व्ह करा. ही बंगाली रेसिपी खायला खूप टेस्टी आहे.
संबंधित बातम्या