मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Chaitra Navratri 2024: नवरात्री उपवासात खाण्यासाठी बनवा टेस्टी साबुदाणा खिचडी, नोट करा रेसिपी

Chaitra Navratri 2024: नवरात्री उपवासात खाण्यासाठी बनवा टेस्टी साबुदाणा खिचडी, नोट करा रेसिपी

Hiral Shriram Gawande HT Marathi
Apr 07, 2024 07:09 PM IST

Fasting Recipe: जर या चैत्र नवरात्रीत तुम्हालाही नवीन पद्धतीने साबुदाणा खिचडी बनवून त्याची चव दुप्पट करायची असेल, तर ही रेसिपी ट्राय करा. खूप सोपी आहे.

Chaitra Navratri 2024: नवरात्री उपवासात खाण्यासाठी बनवा टेस्टी साबुदाणा खिचडी, नोट करा रेसिपी
Chaitra Navratri 2024: नवरात्री उपवासात खाण्यासाठी बनवा टेस्टी साबुदाणा खिचडी, नोट करा रेसिपी (freepik)

Sabudana Khichdi Recipe: हिंदू धर्मात नवरात्रीच्या ९ दिवसांचे विशेष महत्त्व मानले जाते. गुढीपाडव्यापासून सुरु होणाऱ्या चैत्र नवरात्रीच्या ९ दिवसांमध्ये माँ दुर्गेच्या नऊ वेगवेगळ्या रूपांची पूजा आणि उपवास केला जातो. पंचांगानुसार यंदा चैत्र नवरात्रीचे व्रत ९ एप्रिलपासून सुरू होऊन १७ एप्रिल रोजी संपणार आहे. नवरात्रीच्या उपवासात फराळाचे पदार्थ खाण्याचे काही नियम सांगण्यात आले आहेत. नवरात्रीच्या उपवासात फराळ करताना काही खास गोष्टींचा आहारात नक्कीच समावेश करावा. अशाच एका पदार्थाचे नाव आहे साबुदाणा खिचडी. नवरात्रीच्या उपवासात हा पदार्थ सर्वाधिक खाल्ला जातो. या नवरात्रीत तुम्हालाही नवीन पद्धतीने साबुदाणा खिचडी बनवून त्याची चव दुप्पट करायची असेल, तर साबुदाणा खिचडी बनवण्याची ही नवीन रेसिपी नक्की ट्राय करा. ही रेसिपी बनवायला सोपी आणि खायला टेस्टी आहे.

ट्रेंडिंग न्यूज

साबुदाणा खिचडी बनवण्यासाठी साहित्य

- १ कप साबुदाणा

- १/२ कप शेंगदाणे (भाजलेले आणि साले काढून बारीक केलेले)

- १ टीस्पून जिरे

- ३-४ संपूर्ण लाल मिरची

- कढीपत्ता

- २ चमचे सैंधव मीठ

- १ टीस्पून लाल तिखट

- १ टीस्पून कोथिंबीर

- १ टीस्पून हिरवी मिरचीचे तुकडे

- १ टीस्पून लिंबाचा रस

- २ चमचे तूप

साबुदाणा खिचडी बनवण्याची पद्धत

साबुदाणा खिचडी बनवण्यासाठी प्रथम साबुदाणा स्वच्छ पाण्याने धुवून तासभर पाण्यात भिजत ठेवा. तुम्हाला हवे असेल तर तु्म्ही ते अजून थोडा वेळ भिजत ठेवू शकता. साबुदाणा नीट भिजून नरम झाल्यावर साबुदाणा चाळणीने गाळून घ्या. त्यातील पाणी काढून जाड कापडावर पसरवा आणि तासभर राहू द्या. साबुदाणामधून पाणी पूर्णपणे निघाल्यावर त्यात शेंगदाणे, मीठ आणि लाल तिखट मिक्स करा. आता कढईत तूप गरम करून त्यात जिरे, लाल मिरची आणि कढीपत्ता घाला. मिरची हलकी गडद रंगाची झाली की त्यात साबुदाणा घालून मंद आचेवर शिजवा. 

साबुदाणा थोडा वेळ शिजवल्यानंतर तो गॅसवरून काढून त्यात लिंबाचा रस टाकून मिक्स करा. साबुदाणा खिचडी सजवण्यासाठी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि हिरवी मिरची घाला. तुमची टेस्टी साबुदाण्याची खिचडी तयार आहे.

WhatsApp channel