मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  National Walking Day 2024: दररोज केवळ ३० मिनिटे चाला, आरोग्याला मिळतील हे ६ आश्चर्यकारक फायदे

National Walking Day 2024: दररोज केवळ ३० मिनिटे चाला, आरोग्याला मिळतील हे ६ आश्चर्यकारक फायदे

Apr 03, 2024, 09:36 AM IST

    • Walking Benefits: फिट आणि निरोगी राहण्यासाठी दररोज चालण्याचा सल्ला दिला जातो. जाणून घ्या दररोज अर्धा तास चालण्याचे फायदे.
चालण्याचे फायदे (unsplash)

Walking Benefits: फिट आणि निरोगी राहण्यासाठी दररोज चालण्याचा सल्ला दिला जातो. जाणून घ्या दररोज अर्धा तास चालण्याचे फायदे.

    • Walking Benefits: फिट आणि निरोगी राहण्यासाठी दररोज चालण्याचा सल्ला दिला जातो. जाणून घ्या दररोज अर्धा तास चालण्याचे फायदे.

Benefits of 30 Minutes Walking: आजकाल व्यस्त जीवनशैलीमुळे आपण फारसे चालत नाही. खरं तर निरोगी आहारासोबत चांगली झोप आणि चालणे तुम्हाला आजारांपासून दूर राहण्यास मदत करू शकते. दररोज नियमितपणे १५ ते ३० मिनिटे चालण्याने व्यक्तीचे शारीरिक आरोग्य तर सुधारतेच, उलट मानसिक आरोग्यासाठीही ते फायदेशीर आहे. चालणे तुम्हाला अनेक प्रकारच्या आजारांशी लढण्यास मदत करते. एप्रिल महिन्याचा पहिला बुधवार हा नॅशनल वॉकिंग डे (national walking day) म्हणून साजरा केला जातो. या दिनानिमित्त जाणून घ्या रोज अर्धा तास चालण्याचे आश्चर्यकारक फायदे.

ट्रेंडिंग न्यूज

Vitamin B12 Deficiency: व्हिटॅमिन बी१२ च्या कमतरतेमुळे होऊ शकते पाठदुखी, जाणून घ्या कसे करावे उपचार

Litchi Shake: उन्हाळ्यात काही खास प्यावेसे वाटत असेल तर बनवा लिची शेक, खूप सोपी आहे रेसिपी

Sandalwood Face Pack: उन्हाळ्यात घामोळ्या आणि पिंपल्सपासून आराम देईल चंदन, पाहा कसा बनवायचा फेस पॅक

Yoga Mantra: उन्हाळ्यात तुमचे शरीर थंड ठेवतील ही ३ योगासनं, जाणून घ्या फायदे आणि करण्याची योग्य पद्धत

मेंदूमध्ये सकारात्मक बदल होतो

रोज नियमित चालणे मेंदूच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. एका अभ्यासानुसार कमी-प्रभावी एरोबिक व्यायाम जसे की चालणे हे स्मृतिभ्रंश प्रतिबंधित करते. अल्झायमर रोगाचा धोका कमी करते आणि एकूणच मानसिक आरोग्य सुधारते.

हृदयविकाराचा धोका कमी होतो

हृदयाच्या आरोग्यासाठी चालणे खूप प्रभावी ठरू शकते. अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या मते हृदयरोग किंवा स्ट्रोक टाळण्यासाठी चालणे हे धावण्यापेक्षा कमी प्रभावी नाही. ही क्रिया उच्च रक्तदाब आणि कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यास मदत करते. रक्ताभिसरण सुधारून हृदयाशी संबंधित समस्या टाळण्यास मदत होते.

फुफ्फुसांना ट्रेन करते

चालणे हा एरोबिक व्यायाम आहे, ज्यामुळे रक्तप्रवाहात ऑक्सिजनचा प्रवाह वाढतो. हे शरीरातील विषारी पदार्थ आणि कचरा काढून टाकण्यास मदत करते आणि फुफ्फुसांना चांगले ट्रेन करण्यास देखील मदत करते. चालताना चांगले आणि दीर्घ श्वास घेतल्याने फुफ्फुसाच्या आजाराशी निगडीत लक्षणे देखील कमी होऊ शकतात.

मधुमेही रुग्णांसाठी फायदेशीर

व्यायाम म्हणून चालणे, धावण्यापेक्षा मधुमेह रोखण्यासाठी अधिक प्रभावी सिद्ध झाले आहे. एका अभ्यासानुसार एका चालणाऱ्या गटाने ६ महिन्याच्या अंदाजे प्रायोगिक कालावधीत धावणाऱ्या गटाच्या तुलनेत ग्लुकोज सहिष्णुता (म्हणजेच रक्त साखर किती चांगले शोषून घेते) यात ६ पट सुधारणा दाखवली.

पचन सुधारते

दररोज नियमितपणे ३० मिनिट चालणे केवळ भविष्यातील पोटाच्या कर्करोगाचा धोका कमी करू शकत नाही तर ते पचन आणि बद्धकोष्ठता देखील सुधारू शकते. जे शरीराला आतड्यांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवण्यास मदत करते.

सांधे आणि हाडे मजबूत करते

चालण्याने सांध्यांमध्ये अधिक गतिशीलता मिळते. यामुळे हाडांची झीज प्रतिबंध करण्यास मदत करते. त्यामुळे फ्रॅक्चरचा धोकाही कमी होऊ शकतो. सांधेदुखी कमी करण्यासाठी दिवसातून किमान ३० मिनिटे चालण्याचा सल्ला दिला जातो. असे केल्याने सांध्यातील जडपणा आणि सूज कमी होण्यासही मदत होते.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

पुढील बातम्या