मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Summer Skin Care: उन्हात गेल्यावरही काळी पडणार नाही त्वचा, फक्त लक्षात ठेवा या गोष्टी

Summer Skin Care: उन्हात गेल्यावरही काळी पडणार नाही त्वचा, फक्त लक्षात ठेवा या गोष्टी

Apr 17, 2023, 10:34 AM IST

    • Skin Care For Summer: उन्हाळ्यात कडक उन्हामुळे त्वचा काळी पडते. जे तुमचे लूक पूर्णपणे खराब करू शकतात. त्वचेचा टोन मेंटेन ठेवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा.
उन्हाळ्यात त्वचा काळी पडू नये यासाठी टिप्स

Skin Care For Summer: उन्हाळ्यात कडक उन्हामुळे त्वचा काळी पडते. जे तुमचे लूक पूर्णपणे खराब करू शकतात. त्वचेचा टोन मेंटेन ठेवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा.

    • Skin Care For Summer: उन्हाळ्यात कडक उन्हामुळे त्वचा काळी पडते. जे तुमचे लूक पूर्णपणे खराब करू शकतात. त्वचेचा टोन मेंटेन ठेवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा.

Things to Avoid Skin Getting Dark in Summer: उन्हाळ्यात त्वचेची अधिक काळजी घ्यावी लागते. या ऋतूत घाम येणे, अतिरिक्त तेल यासारख्या त्वचेशी संबंधित समस्या खूप त्रासदायक असतात. यामुळेच या ऋतूत अधिक काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. त्वचेची काळजी न घेतल्यास ती काळी पडू लागते. आज आम्ही तुम्हाला स्किन केअरच्या काही महत्त्वाच्या टिप्स सांगत आहोत ज्यामुळे तुम्हाला त्वचा काळवंडणे टाळता येईल.

ट्रेंडिंग न्यूज

Fitness Mantra: तुमचे वजन जास्त असेल तर करा हे पायांचे व्यायाम, सोपे होईल वेट लॉस

ICMR weight loss Tips : वजन कमी करण्याची योग्य पद्धत कोणती? आयसीएमआरनं दिला 'हा' सुरक्षित वीकली प्लान

Ajwain Water Benefits: ओव्याचे पाणी पिण्याचे ‘हे’ जबरदस्त फायदे तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या...

Tamarind Benefits: केवळ जीभेचे चोचले पुरवत नाही, तर आरोग्यासाठीही लाभदायी आहेत चिंच! ‘असा’ करा वापर

स्क्रबने घासू नका

स्क्रबिंग केल्याने डेड स्किन साफ होते आणि चेहरा चमकू लागतो. पण उन्हाळ्यात ते कमी व्हायला हवे. वास्तविक उन्हात गेल्याने त्वचा खूप संवेदनशील होते. अशा परिस्थितीत त्वचेवर स्क्रब केल्याने नुकसान होऊ शकते. तुम्ही आठवड्यातून एकदा सौम्य स्क्रब वापरू शकता.

योग्य सनस्क्रीन निवडा

उन्हाळ्यात कडक उन्हामुळे त्वचा काळी पडते. अशा परिस्थितीत सनस्क्रीन लावणे आवश्यक आहे. किमान ५० SPF असलेले सनस्क्रीन निवडा. हे हानिकारक अतिनील किरणांपासून त्वचेचे संरक्षण करते.

व्हिटॅमिन सी लावा

चेहऱ्यावर व्हिटॅमिन सी क्रीम, फेसवॉश अशा गोष्टी वापरा. हे त्वचेला चमकदार बनवण्यास मदत करतात. तुम्ही व्हिटॅमिन सी असलेले फेस सीरम देखील वापरू शकता.

हेवी मेकअप टाळ

खूप हेवी मेकअप केल्याने देखील कडक उन्हात त्वचेचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे काहींच्या चेहऱ्यावर रिअॅक्शन येते. उन्हाळ्यात अशा गोष्टी केल्या पाहिजे ज्याने तुमची त्वचा दीर्घकाळ श्वास घेऊ शकेल.

क्लीनिंग आहे आवश्यक

उन्हाळ्यात त्वचा स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे. म्हणूनच सकाळी आणि संध्याकाळी आपला चेहरा स्वच्छ करणे आवश्यक आहे. जर त्वचा तेलकट असेल तर किमान तीन वेळा त्वचा स्वच्छ करा. त्वचा घाण राहिली तर त्यावर पिंपल्स, पांढरे दाणे आणि टॅनिंगची समस्या उद्भवते.

 

मॉइश्चरायझर लावावे

उन्हाळ्यात त्वचेवर चिकटपणा जाणवतो. त्यामुळे काही लोक मॉइश्चरायझर लावणे टाळतात. पण जेव्हाही तुम्ही तुमचा चेहरा धुता तेव्हा नेहमी मॉइश्चरायझर लावा. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही एलोवेरा जेल देखील लावू शकता.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

पुढील बातम्या