मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Rice Cheela: रात्रीचा भात उरला? नाश्त्यात बनवा व्हेजिटेबल राईस चीला, टेस्टी आहे ही रेसिपी

Rice Cheela: रात्रीचा भात उरला? नाश्त्यात बनवा व्हेजिटेबल राईस चीला, टेस्टी आहे ही रेसिपी

May 27, 2023, 09:30 AM IST

    • Cheela From Leftover Rice: तुम्ही रात्री उरलेल्या भातापासून चविष्ट आणि आरोग्यदायी नाश्ता बनवू शकता. भातात काही भाज्या मिक्स करून झटपट चीला बनवा. ही रेसिपी खूप सोपी आहे.
व्हेजिटेबल राईस चीला

Cheela From Leftover Rice: तुम्ही रात्री उरलेल्या भातापासून चविष्ट आणि आरोग्यदायी नाश्ता बनवू शकता. भातात काही भाज्या मिक्स करून झटपट चीला बनवा. ही रेसिपी खूप सोपी आहे.

    • Cheela From Leftover Rice: तुम्ही रात्री उरलेल्या भातापासून चविष्ट आणि आरोग्यदायी नाश्ता बनवू शकता. भातात काही भाज्या मिक्स करून झटपट चीला बनवा. ही रेसिपी खूप सोपी आहे.

Vegetable Rice Cheela Recipe: अनेक वेळा रात्रीच्या जेवणात भात उरतो. काही लोक दुसऱ्या दिवशी त्याला फोडणी देऊन खातात तर काही लोक ते फेकून देतात. पण तुम्हाला माहीत आहे का, की तुम्ही रात्री उरलेल्या भातापासून चविष्ट आणि आरोग्यदायी नाश्ता बनवू शकता. होय, आणि या स्वादिष्ट रेसिपीचे नाव आहे व्हेजिटेबल राईस चीला. व्हेजिटेबल राईस चीला बनवायला खूप सोपा आहे आणि कमी वेळात तयार होतो. चला तर मग जाणून घेऊया काय आहे व्हेजिटेबल राईस चिला बनवण्याची पद्धत.

ट्रेंडिंग न्यूज

Thick Eyelashes: पापण्या दाट आणि लांब करण्यासाठी करा हे उपाय, वाढेल डोळ्यांचे सौंदर्य

Halim Seeds: वेट लॉस ते मासिक पाळी; महिलांच्या अनेक समस्यांवर गुणकारी आहेत अळीवाच्या बिया! वाचा याचे फायदे

Paneer Bhurji Recipe: लंचसाठी बनवा अमृतसरी पनीर भुर्जी, पराठ्यासोबत टेस्टी लागते ही रेसिपी

International Day of Light: का साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय प्रकाश दिवस? जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व

व्हेजिटेबल राईस चीला बनवण्यासाठी साहित्य

- शिजवलेला भात - १ कप

- रवा - ३ चमचे

- उडीद डाळीचे पीठ - १/४ कप

- किसलेले गाजर - १/४ कप

- किसलेला कोबी - १/४ कप

- चिरलेली शिमला मिरची - १/४ कप

- चिरलेली हिरवी मिरची - २

- चिरलेली कोथिंबीर - २ चमचे

- घट्ट ताक - १ कप

- लाल तिखट - १/२ टीस्पून

- तेल - आवश्यकतेनुसार

- मीठ - चवीनुसार

व्हेजिटेबल राईस चीला बनवण्याची पद्धत

व्हेजिटेबल राईस चीला बनवण्यासाठी प्रथम शिजवलेला भात हलका मॅश करा आणि एका मोठ्या बाऊलमध्ये कोबी, गाजर, हिरवी मिरची आणि कोथिंबीर घालून चांगले मिक्स करा. यानंतर या मिश्रणात रवा, उडीद डाळीचे पीठ, लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घाला. या मिश्रणात १ कप घट्ट ताक घाला आणि घट्ट द्रावण तयार करा. हे बॅटर आता १० मिनिटे बाजूला ठेवा. आता एक नॉनस्टिक तवा मध्यम आचेवर गरम करून त्यावर दोन चमचे तेल टाका आणि सगळीकडे पसरवा. यानंतर तयार केलेले बॅटर एका भांड्यात घ्या आणि तव्याच्या मध्यभागी ठेवा आणि गोल फिरवत पसरवा. 

काही वेळाने चीला पलटून दुसऱ्या बाजूने सुद्धा तेल लावून भाजा. हा चीला दोन्ही बाजूंनी सोनेरी तपकिरी होईपर्यंत भाजून घ्या. यानंतर चीला प्लेटमध्ये काढून हिरव्या चटणीसोबत सर्व्ह करा.

विभाग

पुढील बातम्या