मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Cookies Recipe: मुलांसाठी बेसन आणि ओट्सपासून बनवा टेस्टी कुकीज, नोट करा रेसिपी

Cookies Recipe: मुलांसाठी बेसन आणि ओट्सपासून बनवा टेस्टी कुकीज, नोट करा रेसिपी

Feb 27, 2024, 06:39 PM IST

    • Recipe for Kids: मुलांना कुकीज खायला आवडतात. पण जर तुम्हाला त्यांना मैदा आणि साखरेपासून बनवलेल्या कुकीज खायला द्यायच्या नसतील तर तुम्ही बेसन आणि ओट्सपासून टेस्टी कुकीज बनवू शकता. बनवण्यासाठी ही रेसिपी फॉलो करा.
बेसन आणि ओट्स कुकीज (unsplash)

Recipe for Kids: मुलांना कुकीज खायला आवडतात. पण जर तुम्हाला त्यांना मैदा आणि साखरेपासून बनवलेल्या कुकीज खायला द्यायच्या नसतील तर तुम्ही बेसन आणि ओट्सपासून टेस्टी कुकीज बनवू शकता. बनवण्यासाठी ही रेसिपी फॉलो करा.

    • Recipe for Kids: मुलांना कुकीज खायला आवडतात. पण जर तुम्हाला त्यांना मैदा आणि साखरेपासून बनवलेल्या कुकीज खायला द्यायच्या नसतील तर तुम्ही बेसन आणि ओट्सपासून टेस्टी कुकीज बनवू शकता. बनवण्यासाठी ही रेसिपी फॉलो करा.

Cookies With Besan and Oats Recipe: मुलांना कुकीज खूप आवडतात. पण मैदा आणि साखर घालून बनवलेल्या कुकीज बहुतेकदा आरोग्यासाठी हानिकारक असतात आणि लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना ते खाणे टाळावे असे म्हटले जाते. पण आता तुम्ही बेसन आणि ओट्स घालून टेस्टी आणि हेल्दी कुकीज बनवू शकता. मुलांना त्याची चव आवडेल आणि ते मैद्याच्या कुकीजसारखे अनहेल्दी देखील नाही. बेसन आणि ओट्सपासून कुकीज बनवणे सोपे आहे. चला तर मग जाणून घ्या याची रेसिपी.

ट्रेंडिंग न्यूज

Sandalwood Face Pack: उन्हाळ्यात घामोळ्या आणि पिंपल्सपासून आराम देईल चंदन, पाहा कसा बनवायचा फेस पॅक

Yoga Mantra: उन्हाळ्यात तुमचे शरीर थंड ठेवतील ही ३ योगासनं, जाणून घ्या फायदे आणि करण्याची योग्य पद्धत

Kedarnath Yatra: केदारनाथच्या आजूबाजूला आहेत ही सुंदर ठिकाणं, ती पाहिल्याशिवाय अपूर्ण राहील ट्रीप

Onion Pickle: जेवणासोबत सर्व्ह करा टेस्टी कांद्याचे लोणचे, प्रत्येक जण विचारेल रेसिपी

बेसन आणि ओट्सची कुकीज बनवण्यासाठी साहित्य

- अर्धा कप बेसन

- एक कप ओट्स

- १५-२० मनुके

- एक बार डार्क चॉकलेट

- दोन चमचे दूध

- अर्धा कप ब्राऊन शुगर किंवा पावजर गूळ

- ५० ग्रॅम अनसॉल्टेड बटर

- अर्धा चमचा बेकिंग पावडर

- अर्धा चमचा बेकिंग सोडा

- मीठ चिमूटभर

बेसन आणि ओट्सपासून कुकीज बनवण्याची पद्धत

सर्वप्रथम एका खोल भांड्यात ब्राऊन शुगर किंवा गूळ पावडर घ्या. त्यात ठराविक प्रमाणात अनसॉल्टेड बटर घाला. आता हे चांगले फेटून घ्या. फेटल्यानंतर त्यात बेसन, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा आणि चिमूटभर मीठ हे नीट गाळून मिक्स करा. आता या सर्व गोष्टी नीट मिक्स करा. वरुन मनुका घाला. तसेच डार्क चॉकलेटचे छोटे तुकडे करून टाका. एक कप ओट्स मिक्स करा. त्यात दोन चमचे दूध घालून हाताने मिक्स करून पीठ सारखे मळून घ्या. लक्षात ठेवा की ते खूप गुळगुळीत करण्याची गरज नाही. सर्व साहित्य नीट एकत्र बांधले जात नाही तोपर्यंत मिसळा. तयार केलेल्या मिश्रणाला लहान बिस्किटांचा आकार द्या. 

मायक्रोवेव्ह १८० अंशांवर सेट करा. आता एका प्लेटमध्ये बटर पेपर ठेवून त्यावर तयार कुकीज ठेवा. १५ ते २० मिनिटांत कुकीज तयार होतील. मुलांना टेस्टी आणि हेल्दी कुकीज खायला द्या.

विभाग

पुढील बातम्या