Kerala Style Mushroom Curry Recipe: मशरूम भरपूर पोषक तत्त्वांनी समृद्ध आहे. यामध्ये फायबरपासून जीवनसत्त्वांपर्यंतचे घटक असतात. त्यातील पोषक तत्वांचा विचार करून ते रोज खाण्याचा सल्ला दिला जातो. तुम्ही मशरूमचे विविध पदार्थ बनवू शकता. तुम्हाला दुपारच्या जेवणासाठी मशरूमची भाजी बनवायची असेल तर तुम्ही ही केरळ स्टाईल रेसिपी ट्राय करू शकता. ही रेसिपी खूप सोपी असून घरी सहज बनवता येते. शिवाय याची चव लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल. चला तर मग जाणून घ्या केरळ स्टाईल मशरूम करी कशी बनवायची.
- मशरूम २५० ग्रॅम
- काजू १/४ कप
- नारळाचे दूध - १/२ कप
- कांदा १ चिरलेला
- टोमॅटो २ चिरलेले
- आले लसूण पेस्ट १ टेबलस्पून
- हिरवी मिरची १
- कढीपत्ता १०-१२
- कोथिंबीर
- काश्मिरी लाल मिरची पावडर १ टीस्पून
- हळद १/२ टीस्पून
- धने पावडर १ टीस्पून
- मोहरी १ टेबलस्पून
- नारळाचे तेल २ टेबलस्पून
- चवीनुसार मीठ
मशरूम करी बनवण्यासाठी प्रथम एका पॅनमध्ये तेल गरम करा. त्यात मोहरी, कढीपत्ता, कांदा टाकून भाजून घ्या. नंतर त्यात बारीक चिरलेली हिरवी मिरची घाला. कांदा शिजल्यानंतर त्यात आले-लसूण पेस्ट घाला. नीट मिक्स करून भाजून घ्या. नंतर टोमॅटो घालून मिक्स करा. त्यात थोडे मीठ टाका. टोमॅटो वितळल्यावर त्यात हळद, काश्मिरी लाल तिखट पावडर, धने पावडर घालून मिक्स करा. मसाले शिजल्यानंतर त्यात थोडे पाणी घाला. आता हे नीट भाजू द्या. तोपर्यंत काजूची पेस्ट तयार करा. यासाठी काजू आणि नारळाचे दूध घेऊन ब्लेंडरमध्ये बारीक करा. चांगले ब्लेंड करा आणि बाजूला ठेवा.
आता मसाले भाजले असतील तर त्यात मशरूम घाला. मशरूम चांगले शिजू द्या आणि शिजल्यानंतर त्यात काजूची पेस्ट घाला. नीट मिक्स करून नंतर कोथिंबीरने गार्निश करा. तुमची केरळ स्टाईल मशरूम करी सर्व्ह करण्यासाठी तयार आहे.
रेसिपी क्रेडिट - इंस्टाग्राम