Rajasthani Pulao Recipe: जर तुम्हाला मसालेदार स्ट्रीट स्टाईल राजस्थानी पदार्थ खाण्याची आवड असेल तर त्यासाठी तुम्हाला प्रत्येक वेळी राजस्थानला जाण्याची गरज नाही. तुम्ही घरच्या घरी राजस्थानी पुलावची ही रेसिपी बनवू शकता. ज्या लोकांना भात खायला आवडते त्यांना ही रेसिपी खूप आवडेल. या रेसिपीचे वैशिष्ट्य म्हणजे राजस्थानी पुलाव जेवढा खायला चविष्ट आहे तेवढाच बनवायलाही सोपा आहे. चला तर जाणून घ्या पारंपारिक पद्धतीने राजस्थानी पुलाव कसा बनवायचा.
- १ वाटी बासमती तांदूळ
- उकडलेले वाटाणे
- डाळिंबाचे दाणे
- चिरलेली हिरवी मिरची
- ठेचलेले आले
- कोथिंबीर
- काही थेंब लिंबाचा रस
- कढीपत्ता
- तमालपत्र
- स्टार फूल
- लवंगा
- काळी मिरी
- काजू
- हळद
- जिरे
- मोहरी
- १ चमचा तूप
- तेल
- चिमूटभर हिंग
- चवीनुसार मीठ
पारंपारिक पद्धतीने राजस्थानी पुलाव बनवण्यासाठी सर्वप्रथम एक कप बासमती तांदूळ पाण्याने चांगले धुवून स्वच्छ करा. यानंतर अडीच कप पाण्यात तांदूळ ८० टक्के शिजवा. तांदूळ उकळताना पाण्यात एक चमचा तुपासह काही थेंब लिंबाचा रस घाला. आता तांदूळ झाकून ठेवा आणि ८० टक्के शिजू द्या. यानंतर गॅस बंद करून झाकण ठेवून बाजूला ठेवा. आता शिजलेला तांदूळ गाळून त्यावर थंड पाणी टाकून बाजूला ठेवा. आता शिजवलेल्या भातापासून पुलाव तयार करण्यासाठी त्यात तडका घाला. यासाठी एका कढईत तेल गरम करून त्यात जिरे, मोहरी, कढीपत्ता, तमालपत्र, स्टार फूल, लवंगा, ठेचलेली काळी मिरी, चिरलेली हिरवी मिरची, हळद, काजू, ठेचलेले आले, चिमूटभर हिंग आणि मीठ टाका. आधी बाजूला ठेवलेले उकडलेले तांदूळ चांगले मिक्स करून घ्या.
सर्व गोष्टी एकत्र करून झाल्यावर कढईत उकडलेले वाटाणे, डाळिंबाचे दाणे आणि चिरलेली कोथिंबीर घालून पुन्हा एकदा सर्व चांगले मिक्स करावे. तुमचा राजस्थानी पुलाव सर्व्ह करण्यासाठी तयार आहे.