Palak Kabab Recipe: पोषक तत्त्वांनी समृद्ध पालक आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. पालक खालल्याने रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते. पालकामध्ये सर्व आवश्यक पोषक घटक आहेत, ज्यामुळे शरीराला आतून ताकद मिळते. पालकामध्ये प्रोटीन, कार्ब, फायबर, व्हिटॅमिन ए, सी, के१, फॉलिक अॅसिड, लोह आणि कॅल्शियम देखील आढळते. एवढे पौष्टिक असूनही पालक खायला अनेक जण कंटाळा करतात. पालकाची भाजी नाही तर यापासून विविध पदार्थ बनवता येतात. तुमच्या घरी सुद्धा पालक खाण्याचा कंटाळा करत असतील तर तुम्ही पालकापासून हे टेस्टी कबाब बनवू शकता. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत हे सर्वांना आवडेल. चला तर मग जाणून घ्या कसे बनवावे पालक कबाब
- पालक
- दही
- बेसन
- काजू
- ओवा
- जिरे पावडर
- कोथिंबीर
- तेल
- हिंग
- मीठ
हा टेस्टी नाश्ता बनवण्यासाठी प्रथम एका भांड्यात कापलेले रोस्टेड काजू, जिरा पावडर, हिंग आणि कोथिंबीर घेऊन मिक्स करा. कबाबसाठीचे स्टफिंग तयार करून बाजूला ठेवा. आता एका पॅनमध्ये थोडे तेल गरम करा. त्यात हिंग, जिरे आणि ओवा टाका. आता यात चिरलेले पालक टाकून काही मिनीटे शिजू द्या. हे एका ब्लाउल मध्ये काढा. आता यात दोन चमचे दही, बेसन आणि चवीनुसार मीठ टाकून नीट मिक्स करून घ्या. नंतर या मिश्रणाचा छोटा गोळा हातावर घेऊन याचे गोल बनवा. त्यात तयार केलेले स्टफिंग ठेवा आणि नीट चारही बाजूने कव्हर करून छोटे चापट करून घ्या. हे कबाब बनवताना स्टफिंग बाहेर निघणार नाही याची काळजी घ्या. अशा प्रकारे सर्व कबाब तयार करून घ्या.
आता एका पॅन मध्ये थोडे तेल घेऊन गरम करा. नंतर त्यात कबाब ठेवून ते शॅलो फ्राय करून घ्या. दोन्ही बाजूने गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत भाजून घ्या. तुमचे टेस्टी पालक कबाब रेडी आहे. गरमा गरम सर्व्ह करा.