मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Summer Special Drink: या उन्हाळ्यात ट्राय करा अननस पन्ह्याची ही रेसिपी, टेस्ट सोबत मिळेल एनर्जी

Summer Special Drink: या उन्हाळ्यात ट्राय करा अननस पन्ह्याची ही रेसिपी, टेस्ट सोबत मिळेल एनर्जी

Apr 26, 2023, 10:15 AM IST

    • Panna for Summer: उन्हाळ्यात कैरीचे पन्हे तर तुम्ही नेहमी पित असाल पण यावेळी ट्राय करा अननसच्या पन्ह्याची ही रेसिपी. ते चव आणि उर्जेने परिपूर्ण आहे.
अननस पन्हे (unsplash)

Panna for Summer: उन्हाळ्यात कैरीचे पन्हे तर तुम्ही नेहमी पित असाल पण यावेळी ट्राय करा अननसच्या पन्ह्याची ही रेसिपी. ते चव आणि उर्जेने परिपूर्ण आहे.

    • Panna for Summer: उन्हाळ्यात कैरीचे पन्हे तर तुम्ही नेहमी पित असाल पण यावेळी ट्राय करा अननसच्या पन्ह्याची ही रेसिपी. ते चव आणि उर्जेने परिपूर्ण आहे.

Pineapple Panna Recipe: उन्हाळ्यात उष्माघात टाळण्यासाठी आजी कैरीचं पन्हं पिण्याचा सल्ला देतात. आंबट-गोड चव असलेले हे पन्हे मोठ्यांप्रमाणेच लहान मुलांनाही आवडते. हे प्यायल्याने पोट आणि शरीर थंड राहते. जर तुम्ही दरवेळी कैरीचे पन्हे बनवत असाल तर यावेळी काहीतरी नवीन करून पहा आणि अननसाचे पन्हे बनवा. त्याची चव मस्त लागते. ते कसे बनवायचे ते येथे पहा.

ट्रेंडिंग न्यूज

ICMR weight loss Tips : वजन कमी करण्याची योग्य पद्धत कोणती? आयसीएमआरनं दिला 'हा' सुरक्षित वीकली प्लान

Ajwain Water Benefits: ओव्याचे पाणी पिण्याचे ‘हे’ जबरदस्त फायदे तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या...

Tamarind Benefits: केवळ जीभेचे चोचले पुरवत नाही, तर आरोग्यासाठीही लाभदायी आहेत चिंच! ‘असा’ करा वापर

PCOS Problem: मासिक पाळी नियमित आल्यानंतरही असून शकते पीसीओसची समस्या! जाणून घ्या काय आहेत लक्षणं

Mango Pickle Recipe: कैरीचं कोरडं लोणचं वाढवेल जेवणाची चव, पाहा ही सोपी रेसिपी

अननस पन्हे बनवण्यासाठी तुम्हाला लागेल...

- चिरलेला अननस

- पाणी

- मीठ

- हळद

- काळी मिरी

- काळे मीठ

- साखर

- लाल तिखट

- भाजलेले जिरे पावडर

- पुदिना

- बर्फाचे तुकडे

- थंड पाणी

Mint Drinks Recipe: पुदिनापासून बनवा देसी ड्रिंक्स, फक्त उष्णताच नाही तर ॲसिडिटीही होईल दूर

कसे बनवावे

अननसाचे पन्हे बनवण्यासाठी अननस, पाणी, साखर, हळद, लाल तिखट, काळी मिरी, भाजलेले जिरे पावडर, काळे मीठ आणि मीठ एका खोलगट पातेल्यात एकत्र करा. आता ते उकळायला ठेवा आणि चांगले उकळू द्या. कमीत कमी १५ मिनिटे किंवा अननस मऊ होईपर्यंत शिजवा. नंतर ते गॅसवरून काढून बाजूला ठेवा आणि पूर्णपणे थंड करा. थंड केलेले पन्हे ब्लेंडरमध्ये टाकून त्याची प्युरी बनवा.

Paneer Recipe: डिनरमध्ये बनवा आचारी पनीर, पराठा आणि नानसोबत वाढते लज्जत

कसे करावे सर्व्ह

अननस पन्हे सर्व्ह करण्यासाठी एका ग्लासमध्ये काही बर्फाचे तुकडे आणि काही पुदिन्याची पाने घाला. नंतर ४-५ चमचे अननसाची जाड प्युरी घाला आणि त्यावर थंड पाणी घाला. आता ते चांगले मिक्स करा आणि नंतर सर्व्ह करा.

विभाग

पुढील बातम्या