मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Paneer Bread Pakoda: संध्याकाळच्या नाश्त्यासाठी बनवा पनीर ब्रेड पकोडा, नोट करा शेफ वरुणची रेसिपी

Paneer Bread Pakoda: संध्याकाळच्या नाश्त्यासाठी बनवा पनीर ब्रेड पकोडा, नोट करा शेफ वरुणची रेसिपी

Mar 07, 2024, 06:32 PM IST

    • Evening Snacks Recipe: संध्याकाळच्या नाश्त्यामध्ये काहीतरी चटपटीत खायची इच्छा असेल तर शेफ वरुण इनामदारची ही रेसिपी ट्राय करू शकता. पनीर ब्रेड पकोडाची ही रेसिपी खूप सोपी आहे.
पनीर ब्रेड पकोडा

Evening Snacks Recipe: संध्याकाळच्या नाश्त्यामध्ये काहीतरी चटपटीत खायची इच्छा असेल तर शेफ वरुण इनामदारची ही रेसिपी ट्राय करू शकता. पनीर ब्रेड पकोडाची ही रेसिपी खूप सोपी आहे.

    • Evening Snacks Recipe: संध्याकाळच्या नाश्त्यामध्ये काहीतरी चटपटीत खायची इच्छा असेल तर शेफ वरुण इनामदारची ही रेसिपी ट्राय करू शकता. पनीर ब्रेड पकोडाची ही रेसिपी खूप सोपी आहे.

Paneer Bread Pakoda Recipe: लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच पनीर खायला आवडते. पनीरपासून काहीतरी चटपटीत आणि टेस्टी पदार्थ बनवण्याचा विचार करत असाल तर शेफ वरुण इनामदारची ही रेसिपी तुमच्यासाठी आहे. पनीर ब्रेड पकोडा हे खायला टेस्टी आणि बनवायला सोपे आहे. विशेष म्हणजे हे संध्याकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट स्नॅक्स आहे. चला तर मग जाणून घ्या कसे बनवयाचे पनीर ब्रेड पकोडा.

ट्रेंडिंग न्यूज

Vitamin B12 Deficiency: व्हिटॅमिन बी१२ च्या कमतरतेमुळे होऊ शकते पाठदुखी, जाणून घ्या कसे करावे उपचार

Litchi Shake: उन्हाळ्यात काही खास प्यावेसे वाटत असेल तर बनवा लिची शेक, खूप सोपी आहे रेसिपी

Sandalwood Face Pack: उन्हाळ्यात घामोळ्या आणि पिंपल्सपासून आराम देईल चंदन, पाहा कसा बनवायचा फेस पॅक

Yoga Mantra: उन्हाळ्यात तुमचे शरीर थंड ठेवतील ही ३ योगासनं, जाणून घ्या फायदे आणि करण्याची योग्य पद्धत

पनीर ब्रेड पकोडा बनवण्यासाठी साहित्य

बॅटरसाठी साहित्य

- १ कप बेसन (न भाजलेले)

- अर्धा कप ज्वारीचे पीठ, न भाजलेले

- २ चमचे तांदळाचे पीठ

- पाव चमचा हळद

- चवीनुसार मीठ

- एक कप पाणी

- ब्रेडचे ८ स्लाइस

- तळण्यासाठी सनफ्लॉवर तेल

 

फिलिंगसाठी साहित्य

- एक कप जर्सी पनीर, पनीर कुस्करून घ्यावे

- अर्धा चमचा लसणाची पेस्ट

- पाव चमचा हळद

- अर्धा चमचा लाल तिखट

- पाव चमचा गरम मसाला

- अर्धा चमचा चाट मसाला

- मीठ चवीनुसार

- २ चमचे ताजी बारीक चिरलेली कोथिंबीर

पनीर ब्रेड पकोडा बनवण्याची पद्धत

पनीर ब्रेड पकोडा बनवण्यासाठी प्रथम त्याचे फिलिंग किंवा सारण तयार करून घ्या. यासाठी फिलिंगसाठी आवश्यक असलेले सर्व साहित्य एका बाउलमध्ये घ्या आणि मिक्स करा. त्यात लाल तिखट, मीठ योग्य प्रमाणात आहे का याची चव पहा. हे सारण काही वेळ बाजूला ठेवा. आता बॅटर तयार करण्यासाठी बॅटरसाठी सांगितलेले सर्व साहित्य एका बाउलमध्ये घेऊन नीट मिक्स करून घ्या. बॅटर तयार करताना त्यात गुठळ्या राहणार नाहीत याची काळजी घ्या. ते नीट फेटून घ्या.

आता पनीर ब्रेड पकोडा बनवण्यासाठी एक ब्रेड स्लाइस घ्या. त्यावर तयार केलेले सारण एक चमचा नीट पसरवून लावा. दूसरा ब्रेड घेऊन आधीच्या ब्रेड वर व्यवस्थित सँडविच प्रमाणे ठेवा. या बनविलेल्या सँडविचचे त्रिकोणी किंवा चौकोनी आकारात चार भाग करा. सर्व ब्रेडचे असेच सँडविच बनवून त्यांचे लहान काप करून बाजूला ठेऊन द्या. आता एका कढईत सनफ्लॉवर तेल घेऊन ते गरम करा. 

तेल गरम झाल्यावर ब्रेडच्या एका एका तुकड्याला तयार केलेल्या बॅटर मध्ये घोळवून हळूच गरम तेलात सोडा. सोनेरी रंग येईपर्यंत आणि ब्रेड कुरकरीत होईपर्यंत मध्यम आचेवर तळा. तुमचे पनीर ब्रेड पकोडा तयार आहे. तुमच्या आवडत्या केचअप, सॉस किंवा चटणी आणि तळलेल्या हिरव्या मिरच्यांसोबत सर्व्ह करा.

विभाग

पुढील बातम्या