Instant Chocolate Cake Recipe: जगभरात दरवर्षी ८ मार्च हा जागतिक महिला दिन (womens day) म्हणून साजरा केला जातो. महिलांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देण्यासाठी आणि त्यांच्या सामाजिक उन्नतीसाठी हा दिवस साजरा केला जातो. प्रत्येकाच्या आयुष्यात अशा काही स्त्रिया असतात, ज्या त्यांच्यासाठी खूप महत्त्वाच्या असतात. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यातील अशा खास महिलांसाठी हा दिवस खास बनवायचा असेल तर तुम्ही घरच्या घरी चॉकलेट केक बनवू शकता. विशेष म्हणजे हा केक तुम्ही कुकरमध्ये झटपट तयार करू शकता. चला तर मग जाणून घ्या कुकरमध्ये झटपट तयार होणाऱ्या चॉकलेट केकची रेसिपी.
- एक कप मैदा
- अर्धा कप साखर
- ३/४ चमचे बेकिंग सोडा
- ३ टेबलस्पून कोको पावडर
- ३ टेबलस्पून बटर
- १/४ कप पाणी
- १/४ कप दूध
- १/२ चमचा लिंबाचा रस
- १/२ टीस्पून व्हॅनिला अर्क
- अर्धा टीस्पून मीठ
- एक पॅकेट इनो
केक बनवण्यासाठी एका भांड्यात मैदा, मीठ आणि बेकिंग सोडा चांगले मिक्स होईपर्यंत फेटून घ्या. नंतर एका भांड्यात बटर आणि साखर एकत्र होईपर्यंत फेटा. हे थोडे फुगेपर्यंत फेटून घ्या. आता त्यात पाणी आणि कोको पावडर टाकून मिक्स करा. त्यात लिंबाचा रस आणि व्हॅनिला अर्क घाला. आता पुन्हा नीट मिक्स करून घ्या. नंतर त्यात दूध घालून मिक्स करा. आता पिठात इनो घाला. आता केक पॅनला बटरने ग्रीस करा आणि त्यात पिठ घाला. आता प्रेशर कुकरमध्ये खाली प्लेट किंवा ट्रे ठेवा आणि झाकन ठेवून गरम करा. कुकर गरम झाल्यावर केक पॅन प्रेशर कुकरमध्ये हलक्या हाताने ठेवा. आता झाकण बंद करा आणि आच अगदी मंद ठेवा. आता केक सुमारे ५० मिनिटे शिजवा. शिजल्यावर कुकरमधून काढून केक पॅन थंड होऊ द्या. नंतर एका प्लेटमध्ये काढा. तुम्ही हा केक चॉकलेट सिरप, चोको चिप्सने सजवू शकता.
संबंधित बातम्या