Fasting Snacks Recipe: महाशिवरात्रीला अनेक भक्त महादेवाला प्रसन्न करण्यासाठी उपवास करतात. उपवासात लोक सहसा खूप कमी खातात. किंवा फराळाचे विविध पदार्थ बनवतात. पण तुम्हाला जर फराळामध्ये तळलेले खायचे नसले तर तुम्ही पटकन हे टेस्टी उपवासाचे स्नॅक्स बनवू शकता. हे स्नॅक्स भगर किंवा वरईच्या भातापासून तयार केले जाते. हे बनवायला जास्त वेळ लागत नाही आणि ते अगदी कमी तुप किंवा तेलात बनवता येते. चला तर मग जाणून घ्या उपवासाठी स्नॅक्सची सोपी रेसिपी.
- एक कप भगर
- एक चमचा जिरे
- सैंधव मीठ
- बारीक चिरलेली कोथिंबीर
- बारीक चिरलेली हिरवी मिरची
- एक चमचा काळी मिरी पावडर
सर्वप्रथम एका पॅनमध्ये दोन चमचे तेल घ्या. त्यात एक लिटर पाणी टाका. तसेच चवीनुसार मीठ घालून एक चमचा काळी मिरी पावडर घाला. आता त्यात भगर किंवा वरईच्या तांदळाचे पीठ घालून मिक्स करा. लक्षात ठेवा की पाणी जास्त गरम नसेल तेव्हाच पीठ घाला. जेणेकरून पीठाच्या गुठळ्या होणार नाहीत आणि ते चांगले मिसळले जाईल. आता मंद आचेवर भाजून घ्या. हे पटकन घट्ट होते जेव्हा हे पीठ कढईच्या बाजू सोडून गोळा होईल तेव्हा गॅस बंद करा. आता हे एका प्लेटमध्ये काढून पसरवा आणि थंड करा. थंड झाल्यावर त्याचे चौकोनी तुकडे करा. आता तव्यावर देशी तूप टाकून गरम करा. आता सर्व तयार केलेले चौकोनी तुकडे या गरम तव्यावर ठेवा आणि मंद आचेवर नीट शिजवून घ्या. हे दोन्ही बाजूंनी सोनेरी तपकिरी होईपर्यंत शिजवा. तुमचे उपवासाचे स्नॅक्स तयार आहे. नेहमीच्या फराळाच्या पदार्थापेक्षा हे वेगळे आणि टेस्टी आहे.
संबंधित बातम्या