मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Palak Malai Kofta: लंच असो वा डिनर बनवा पालक मलाई कोफ्ता, झटपट तयार होते ही रेसिपी

Palak Malai Kofta: लंच असो वा डिनर बनवा पालक मलाई कोफ्ता, झटपट तयार होते ही रेसिपी

Jan 30, 2023, 12:09 PM IST

    • Lunch and Dinner Recipe: आठवड्याची सुरूवात खास करण्यासाठी दुपारच्या जेवणात काहीतरी खास खायचं असेल तर बनवा पालक मलाई कोफ्ता. विशेष म्हणजे ही रेसिपी झटपट तयार होते.
पालक मलाई कोफ्ता

Lunch and Dinner Recipe: आठवड्याची सुरूवात खास करण्यासाठी दुपारच्या जेवणात काहीतरी खास खायचं असेल तर बनवा पालक मलाई कोफ्ता. विशेष म्हणजे ही रेसिपी झटपट तयार होते.

    • Lunch and Dinner Recipe: आठवड्याची सुरूवात खास करण्यासाठी दुपारच्या जेवणात काहीतरी खास खायचं असेल तर बनवा पालक मलाई कोफ्ता. विशेष म्हणजे ही रेसिपी झटपट तयार होते.

Palak Malai Kofta Recipe: वेगवेगळ्या भाज्यांनी बनवलेला कोफ्ता तुम्ही अनेकदा खाल्ला असेल, पण पालक मलाई कोफ्ता इतर सर्व कोफ्त्यांच्या रेसिपीपेक्षा वेगळा आहे. या रेसिपीचे वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही कोणत्याही त्रासाशिवाय घरी सहज बनवू शकता. ही भाजी पोळी किंवा पराठा या दोन्हींसोबत छान लागतो. चला तर मग जाणून घेऊया कशी बनवायची टेस्टी पालक मलाई कोफ्ता करी.

ट्रेंडिंग न्यूज

International Museum Day 2024: का साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन? जाणून घ्या इतिहास, महत्त्व आणि थीम

Egg Kofta Curry: अंडा कोफ्ता करी सोबत बनवा वीकेंड खास, बनवायला खूप सोपी आहे रेसिपी

Beauty Trend: तांदूळ आणि त्याच्या पाण्यापासून बनवलेले हे फेस पॅक होत आहे व्हायरल, तुम्ही ट्राय केले का?

World Hypertension Day 2024: ही आहेत हायपरटेन्शनची सुरुवातीची लक्षणं, व्यवस्थापित करण्यासाठी फॉलो करा या टिप्स

पालक मलाई कोफ्ता बनवण्यासाठी साहित्य

- ५०० ग्रॅम पालक

- २०० ग्रॅम पनीर (किसलेले)

- १० ग्रॅम काजू (चिरलेले)

- १/२ वाटी दही

- १/२ वाटी मलई

- ५० ग्रॅम कांदा

- ५ ग्रॅम आले

- ५ ग्रॅम लसूण

- अर्धा चमचा मेथी

- २ चमचे लाल मिरची

- २ चमचे धने पावडर

- १/२ चमचा हळद

- २ चमचे पिवळी मिरची पावडर

- १ चमचा गरम मसाला

- २ चमचे जिरेपूड

- २ चमचे शाही जिरे

- २ चमचे तेल

- चवीनुसार मीठ

पालक मलाई कोफ्ता बनवण्याची पद्धत

पालक मलाई कोफ्ता बनवण्यासाठी प्रथम पालक पाण्यात उकळून २ मिनिटे थंड पाण्यात ठेवा. त्यानंतर पालक बारीक करून त्याची पेस्ट बनवा. एका भांड्यात पनीर, काजू, पिवळी मिरची, शाही जिरा आणि मीठ घालून मिक्स करा. यानंतर हे मिश्रण पिठासारखे मळून त्याचे छोटे गोळे बनवा. दुसरीकडे गोळे झाल्यावर हे गोळे तळून घ्या. आता याच कढईत मेथी दाणे टाकून कांदा टाका आणि भाजून घ्या. नंतर त्यात आले, लसूण आणि जिरेपूड, लाल मिरची, धने पावडर, आणि हळद घालून मिक्स करा. यानंतर त्यात बारीक केलेला पालक, मलई आणि मीठ घालून थोडा वेळ शिजू द्या. नंतर त्यात तळलेले कोफ्ते घाला. तुमची चविष्ट पालक मलाई कोफ्ता करी तयार आहे. तुम्ही पोळी किंवा पराठ्यासोबत सर्व्ह करू शकता. हे तुम्ही लंच किंवा डिनरमध्ये ट्राय करु शकता.

 

पुढील बातम्या