मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Winter Special Recipe: हिवाळ्यात पराठ्यासोबत टेस्टी लागते आलू-मेथीची भाजी, डिनरसाठी आहे बेस्ट

Winter Special Recipe: हिवाळ्यात पराठ्यासोबत टेस्टी लागते आलू-मेथीची भाजी, डिनरसाठी आहे बेस्ट

Jan 16, 2023, 08:42 PM IST

    • Dinner Ideas: हिवाळ्यात मेथीचे विविध पदार्थ आवडीने खाल्ले जातात. त्यातील एक म्हणजे बटाटा मेथीची सुकी भाजी. तुम्ही हे डिनरमध्ये पराठ्यासोबत खाऊ शकता. पहा ही सोपी रेसिपी.
आलू-मेथीची भाजी

Dinner Ideas: हिवाळ्यात मेथीचे विविध पदार्थ आवडीने खाल्ले जातात. त्यातील एक म्हणजे बटाटा मेथीची सुकी भाजी. तुम्ही हे डिनरमध्ये पराठ्यासोबत खाऊ शकता. पहा ही सोपी रेसिपी.

    • Dinner Ideas: हिवाळ्यात मेथीचे विविध पदार्थ आवडीने खाल्ले जातात. त्यातील एक म्हणजे बटाटा मेथीची सुकी भाजी. तुम्ही हे डिनरमध्ये पराठ्यासोबत खाऊ शकता. पहा ही सोपी रेसिपी.

Aloo-Methichi Bhaji Recipe: हिवाळा सुरू झाला की बहुतांश घरांमध्ये आलू-मेथीची सुकी भाजीची मागणी वाढते. ही भाजी खायला चविष्ट तर आहेच पण आरोग्याच्या दृष्टीनेही खूप फायदेशीर मानली जाते. या चविष्ट भाजीची चव पराठ्यासोबत आणखी वाढते. या भाजीचे वैशिष्ट्य म्हणजे ही बनवायलाही खूप सोपी आहे. चला तर मग वाट कसली पाहताय, जाणून घेऊया हिवाळ्यातील स्पेशल आलू- मेथीची भाजी बनवण्याची सोपी पद्धत.

ट्रेंडिंग न्यूज

joke of the day : तू अजून लग्न का केलं नाहीस, असं जेव्हा कोकिळा कावळ्याला विचारते…

Mango Lassi Recipe: उन्हाळ्याच्या दिवसांत ट्राय करा ७ प्रकारची मँगो लस्सी! मूडही फ्रेश होईल अन् शरीर थंड राहील!

International Museum Day 2024: का साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन? जाणून घ्या इतिहास, महत्त्व आणि थीम

Egg Kofta Curry: अंडा कोफ्ता करी सोबत बनवा वीकेंड खास, बनवायला खूप सोपी आहे रेसिपी

आलू- मेथी भाजी बनवण्यासाठी साहित्य

- चिरलेली मेथी - ४ वाट्या

- उकळलेले बटाटे - २ कप

- लसूण चिरलेला - १ टीस्पून

- आले चिरून - १ टीस्पून

- हिरवी मिरची चिरलेली - १

- सुकी लाल मिरची - २

- हळद - १/२ टीस्पून

- जिरे - १ टीस्पून

- धने पावडर - १ टीस्पून

- जिरेपूड - १ टीस्पून

- हिंग - १ चिमूटभर

- तेल- ३-४ टेबलस्पून

- मीठ - चवीनुसार

बटाटा मेथीची भाजी बनवण्याची पद्धत

आलू मेथीची कोरडी भाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम मेथी स्वच्छ धुवून घ्यावी. आता मेथीची पाने बारीक चिरून घ्या. बटाटे उकळून सोलून त्याचे चौकोनी तुकडे करा. यानंतर आले, लसूण आणि हिरवी मिरची बारीक चिरून घ्यावी. आता एका बाउलमध्ये चिरलेली मेथी टाका, त्यात थोडे मीठ टाका, चांगले टॉस करा आणि १५ मिनिटे बाजूला ठेवा. आता कढईत तेल टाकून मध्यम आचेवर गरम करा. तेल गरम झाल्यावर त्यात जिरे आणि हिंग काही सेकंद परतून घ्या. यानंतर त्यात चिरलेला लसूण, आले, हिरवी मिरची आणि लाल मिरची घालून ३० सेकंद परतून घ्या. यानंतर त्यात हळद आणि बटाट्याचे तुकडे टाकून चांगले मिक्स करा. ढवळत असताना बटाटे ३-४ मिनिटे शिजवा. आता बटाट्यात मेथीची पाने, धनेपूड, जिरेपूड आणि चवीनुसार मीठ घालून सर्व चांगले मिक्स करा. यानंतर भाजी झाकून ठेवा आणि आणखी ४-५ मिनिटे शिजू द्या. मध्ये मध्ये भाजी चमच्याने परतवा. मेथी मऊ झाली की गॅस बंद करा. तुमची टेस्टी बटाटा मेथीची भाजी तयार आहे. तुम्ही पोळी किंवा पराठ्यासोबत सर्व्ह करा.

 

विभाग

पुढील बातम्या