मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  लहान असो वा मोठे सगळ्यांना आवडेल क्रीमी पालक कॉर्न भाजी, ट्राय करा ही रेसिपी

लहान असो वा मोठे सगळ्यांना आवडेल क्रीमी पालक कॉर्न भाजी, ट्राय करा ही रेसिपी

Jan 17, 2023, 08:37 PM IST

    • जर मुले पालकाच्या भाजीचं नाव ऐकून नाक मुरडत असतील तर त्यांना खायला द्या ही क्रीमी पालक कॉर्नची भाजी. मुलांसोबत मोठेही ही भाजी आवडीने खातील. पहा ही सोपी रेसिपी.
क्रीमी पालक कॉर्न भाजी

जर मुले पालकाच्या भाजीचं नाव ऐकून नाक मुरडत असतील तर त्यांना खायला द्या ही क्रीमी पालक कॉर्नची भाजी. मुलांसोबत मोठेही ही भाजी आवडीने खातील. पहा ही सोपी रेसिपी.

    • जर मुले पालकाच्या भाजीचं नाव ऐकून नाक मुरडत असतील तर त्यांना खायला द्या ही क्रीमी पालक कॉर्नची भाजी. मुलांसोबत मोठेही ही भाजी आवडीने खातील. पहा ही सोपी रेसिपी.

Creamy Spinach Corn Recipe: हिरव्या पालेभाज्यांमधील पालक आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. पण मुलं नेहमी ते खाण्यास कंटाळा करतात. पालकाची भाजी खाण्यासाठी नखरे करत असतील तर त्यांना एकदा क्रीमी ट्विस्टसह पालकाची ही भाजी खायला द्या. तीच कंटाळवाणी आलू पालक भाजी खाण्यापासून मुलं अनेकदा पळून जातात, पण जेव्हा तुम्ही नवीन चवीने पालक बनवता तेव्हा त्यांना नक्कीच आवडेल. चला तर मग जाणून घेऊया क्रीमी पालक कॉर्न भाजी कशी बनवायची.

ट्रेंडिंग न्यूज

World Hypertension Day 2024: ही आहेत हायपरटेन्शनची सुरुवातीची लक्षणं, व्यवस्थापित करण्यासाठी फॉलो करा या टिप्स

Mango Shake: उन्हाळ्यात प्या थंडगार मँगो शेक, घरी बनवण्यासाठी फॉलो करा रेसिपी

World Telecommunication Day 2024: जागतिक दूरसंचार दिवस साजरा करण्याचा उद्देश काय? काय आहे यावर्षीची थीम?

joke of the day : मूडमध्ये असलेल्या नवऱ्यानं बनवलेल्या जेवणाला बायकोनं कशी दाद दिली पाहाच!

पालक कॉर्न भाजी बनवण्यासाठी साहित्य

- २०० ग्रॅम पालकाची पाने

- १ कप स्वीट कॉर्न (उकडलेले)

- अर्धा टीस्पून देशी तूप

- अर्धा टीस्पून जिरे

- २ चमचे बारीक चिरलेल्या आठ ते दहा लसूण कळ्या

- २ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या

- २ इंच आल्याचा तुकडा (चांगले बारीक करून घ्या)

- चवीनुसार मीठ

- २ चमचे फ्रेश क्रीम किंवा साय

- १ टीस्पून गरम मसाला

- अर्धा चमचा लाल तिखट

क्रीमी पालक कॉर्न बनवायची पद्धत

सर्वप्रथम पालक नीट धुवून प्रेशर कुकरमध्ये एक शिट्टी घेऊन शिजवून घ्या. कुकर थंड झाल्यावर उकडलेला पालक बाहेर काढून ग्राइंडरच्या भांड्यात टाकून बारीक करून घ्या. पालक प्युरी तयार आहे. आता गॅसवर पॅन गरम करून त्यात तेल घाला. तेल गरम झाल्यावर जिरे तडतडून द्या. नंतर त्यात बारीक चिरलेला लसूण, हिरवी मिरची आणि आले घालून परतावा. पालक प्युरी टाकून मिक्स करा आणि मंद आचेवर परतवा. आता गरम मसाला, तिखट आणि मीठ घाला. तेल वेगळे होईपर्यंत मंद आचेवर शिजू द्या. त्यात उकडलेले कॉर्न आणि फ्रेश क्रीम घालून ढवळावे. थोडेसे पाणी घालून शिजू द्या. दोन ते तीन मिनिटे मोठ्या आचेवर शिजू द्या आणि गॅस बंद करा. टेस्टी क्रीमी पालक कॉर्न करी तयार आहे. वर थोडे क्रीम टाकून सर्व्ह करा.

 

पुढील बातम्या