मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Cooking Tips: वरण-भात, भाजीची चव वाढवण्यासाठी फॉलो करा या सोप्या टिप्स

Cooking Tips: वरण-भात, भाजीची चव वाढवण्यासाठी फॉलो करा या सोप्या टिप्स

Jan 10, 2023, 07:20 PM IST

    • साधा वरण भात सुद्धा काही ट्रिक्सने टेस्टी बनवता येतो. तुमचे नेहमीच्या जेवण बनवताना या काही टिप्स फॉलो करा आणि तुमच्या जेवणाची चव वाढवा.
कुकिंग टिप्स

साधा वरण भात सुद्धा काही ट्रिक्सने टेस्टी बनवता येतो. तुमचे नेहमीच्या जेवण बनवताना या काही टिप्स फॉलो करा आणि तुमच्या जेवणाची चव वाढवा.

    • साधा वरण भात सुद्धा काही ट्रिक्सने टेस्टी बनवता येतो. तुमचे नेहमीच्या जेवण बनवताना या काही टिप्स फॉलो करा आणि तुमच्या जेवणाची चव वाढवा.

Easy Cooking Tips: तुमची मुलं नेहमी भाजी, वरण खायला कंटाळा करतात का? जर असे असेल तर कदाचित तुमच्या वरणाच्या रंगामुळे किंवा वरणाला चांगली चव येत नसेल. अशा परिस्थितीत वरण मसालेदार बनवण्यासाठी तुम्ही काही टिप्स फॉलो करू शकता. वरण चविष्ट बनवण्याची पद्धत म्हणजे डाळ उकळल्यावर त्याला फ्राय करा. यासाठी कढईत देशी तूप किंवा तेल, हिंग, जिरे टाका आणि नंतर बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो घाला. या तडक्यामुळे वरणाची चव वाढेल. अशा आणखी काही कुकिंग टिप्स तुम्ही फॉलो करु शकता.

ट्रेंडिंग न्यूज

International Museum Day 2024: का साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन? जाणून घ्या इतिहास, महत्त्व आणि थीम

Egg Kofta Curry: अंडा कोफ्ता करी सोबत बनवा वीकेंड खास, बनवायला खूप सोपी आहे रेसिपी

Beauty Trend: तांदूळ आणि त्याच्या पाण्यापासून बनवलेले हे फेस पॅक होत आहे व्हायरल, तुम्ही ट्राय केले का?

World Hypertension Day 2024: ही आहेत हायपरटेन्शनची सुरुवातीची लक्षणं, व्यवस्थापित करण्यासाठी फॉलो करा या टिप्स

भाताला बनवा टेस्टी

भात जास्त चवदार बनवण्यासाठी भात बनवताना एक चमचा देशी तूप घाला. त्यामुळे भाताची चव वाढेल. तुम्ही ते भाजूनही जिरे टाकून गरम करू शकता.

भाजीची चव वाढवा

भाजीची चव वाढवण्याचा उत्तम उपाय म्हणजे भाजी बनवताना त्यात दोन चमचे दही टाकणे. तसेच याचा एक मार्ग म्हणजे त्यात ठेचलेला लसूण, आले आणि हिरवी मिरची घाला. त्यामुळे भाजीची चव वाढते.

कढीला चविष्ट बनवा

कढीला चविष्ट बनवण्याचा उत्तम मार्ग म्हणजे कढी बनवल्यानंतर त्यात कसुरी मेथी, हिरवी कोथिंबीर, सुकी लाल मिरची टाका. त्यामुळे कढीची चव वाढेल.

आलू पराठे कसे बनवायचे स्वादिष्ट

आलू पराठे अधिक टेस्टी बनवण्याचा उत्तम मार्ग म्हणजे बटाट्याच्या स्टफिंगमध्ये बारीक चिरलेला कांदा घाला. त्यामुळे आलू पराठ्याची चव वाढेल. तुम्ही यात थोटा चाट मसाला सुद्धा घालू शकता.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

 

विभाग

पुढील बातम्या